Saturday, May 2, 2015

विवाहांतर्गत बलात्कार

प्रतिक्रिया: 
संदर्भ:- लोकसत्तामधील ही बातमी.

मला खात्री नाही की लोकसत्ता माझी प्रतिक्रिया छापेलच. त्यामुळे हा लेखनप्रपंच. हाच लेख फेसबुकवर माझ्या टाईमलाईन वर शेअर केला आहे.

विवाहांतर्गत बलात्कार ही निश्चितपणे खेदाची व शरमेची बाब आहे. पण सगळा रोख हिंदू धर्म आणि संस्कृतीकडे का आहे, ह्याचं उत्तर मिळेल का? "हिंदू स्त्रियांना प्रत्येकी चार चार पोरे झाली पाहिजेत असे साक्षात साक्षी महाराज वदले" असं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा एक मुसलमान माणूस चार बायकांशी लग्न करून आठ मुले जन्माला घालतो हे सत्य तुम्ही नजरेआड कसं करू शकता? तिथे स्त्रीच्या हक्कांची, स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही का?

विवाहसंस्था, विवाहाआधी, विवाहानंतर होणारी फसवणूक ह्या गोष्टी फक्त हिंदू धर्मातच असतात का? स्त्री-भ्रूण हत्या ही फक्त हिंदू समाजातच होते? "हुंडा देणे" हा शब्दप्रयोग वापरला नाही तर इतर समाजामध्ये विवाहादरम्यान घडणारी देणी-घेणी तुम्ही बाद ठरवणार का? की हिंदू समाजात "फक्त एक नारळ आणि मुलगी द्या, बाकी काही नको" असं म्हणतात त्याप्रमाणे "फक्त एक बकरं द्या किंवा फक्त एक डझन अंडी आणि मुलगी द्या" असं म्हणतात?

भारतीय स्त्रिया, भारतीय समाज असे भारी भरकम शब्द वापरताना जर तुमच्या डोळ्यांसमोर फक्त हिंदूच येत असतील तर मग भारताला हिंदूराष्ट्र म्हणताना तुमच्यासारख्या धर्मनिरपेक्षींची जीभ का कचरते?

"गेल्या शंभर-दीडशे वर्षांच्या शिक्षणाच्या रेटय़ामुळे स्त्रियांना आलेले आत्मभान, त्यांचे आर्थिक स्वावलंबन यातून आपला समाज बदलतो आहे" हे जे तुम्ही लिहिलं आहे, ते हिंदू धर्मातील स्त्रियांकडे अंगुलीनिर्देश करूनच ना? इतर धर्मातील स्त्रियांची शैक्षणिक आणि मानसिक प्रगती किती झाली आहे, ह्याचा आढावा तुम्ही कधी घेणार?

विवाहांतर्गत बलात्कार हा अत्यंत संवेदशनशील विषय आहे. मागच्या सरकारकडून काही अपेक्षा करणंच चुकीचं होतं पण ह्या सरकारकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण तुम्ही हा विषय शब्दांचे खेळ करून धर्माच्या चौकटित बसवू नका. तुम्ही जर धर्मनिरपेक्ष भावनेने हा लेख लिहिला असेल तर हिंदूएतर धर्मांमधील स्त्रियांचं स्थान ह्या विषयावर देखील डोळ्यांमध्ये अंजन घालणारा एक लेख लिहाच

No comments:

Post a Comment