Sunday, April 26, 2015

वाचकांसाठी जाहीरनामा

प्रतिक्रिया: 
अनेक वाचकांना अजूनही mogaraafulalaa dot com हे डोमेन माझ्या मालकीचे आहे असे वाटत आहे. सदर डोमेन पूर्वी माझ्या मालकीचे होते, ही सत्यपरिस्थिती आहे. हा ब्लॉग -मोगरा फुललादेखील पूर्वी mogaraafulalaa dot com ह्याच डोमेनवर दिसत असे.

आता अचानक mogaraafulalaa dot com डोमेनवर इतर ब्लॉगर्सचं लेखन चोरून किंवा परवानगीशिवाय प्रकाशित केलं जात आहे, असं निदर्शनास आल्यावर अनेक ब्लॉगर्सनी माझ्याशी मेसेज किंवा फोनवर संपर्क साधून सत्यपरिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात गैरसमज दूर व्हावा म्हणून मी एक निवेदन काही दिवसांपूर्वी माझ्या एका गुगल साईटवर प्रकाशित केलं आहे. निवेदनाची लिंक उघडण्यासाठी इथे क्लिक करा..

मोगरा फुललाच्या सर्व वाचकांनी व ज्यांना त्या डोमेनवरील साहित्यचोरीबाबत उत्सुकता आहे, त्यांनी हे निवेदन अवश्य वाचावे व योग्य तो निर्णय घ्यावा. ज्यांना मोगरा फुललावरील कथांची काही वर्षांपूर्वी चोरी झाल्याची घटना स्मरत असेल, त्यांना विशेष काही फोड करून सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.

साहित्यचोरी किंवा वाङमय चोरीसारखे निंद्यनीय व घृणास्पद कृत्य करून त्यावर आपली उपजिवीका भागवण्याची गरज मला कधीही भासलेली नाही व भासणार नाही. परमेश्वराच्या कृपेने लेखन, व्हॉईस ओव्हर, ट्रान्सलेशनची कामे करून दोन घास सुखाचे खाता यावेत इतपत अर्थार्जन करता येते. डोक्यावर हक्काचं छप्पर आहे. आईवडील व इतर ज्येष्ठांनी दिलेली शिकवण व संस्कार आयुष्यात पावलोपावली मदत करत असतात. त्यामुळे इतर कुणाचीही बौद्धिक वा इतर कुठल्याही प्रकारची संपदा त्याच्या मनाविरूद्ध ओरबाडून त्यावर आपली गुजराण करावी, इतके कर्मदरिद्री विचार माझ्या मनालादेखील शिवणार नाहीत.

मोगरा फुललाच्या दोन्ही ब्लॉग्जना व ई-दीपावली अंकांना वाचकांनी भरभरून प्रेम व आशिर्वाद दिलेले आहेत. ह्या शुभेच्छा पुढेही सोबत करतील अशी आशा आहे. बरेच प्रकल्प आणि योजना डोक्यात आहेत. जसा वेळ मिळेल, तसं काम करत आहे.

No comments:

Post a Comment