Wednesday, April 29, 2015

हसा लेको

प्रतिक्रिया: 
मागे एकदा Whatsapp संगणकावर वापरण्यासाठी चर्चा करत असताना "खुद्द Whatsapp ने अद्याप कोणतेही अॅप्लिकेशन दिलेले नाही, त्यामुळे इतर कुठल्याही app द्वारे संगणकावर Whatsapp वापरल्यास व्हायरस लागण्याची शक्यता वाढते असं मी म्हटलं होतं." त्यावर एका दीडशहाण्याने अकलेचे तारे तोडले होते की "समजा मी Whatsapp साईट विकत घेतली आणि तिथे फोनवर Whatsapp वापरता येणारा पर्याय ठेवून त्यात व्हायरस दिला, तर लोक विश्वास ठेवून ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करतीलच." वर पुन्हा स्वत:ची अक्कल किती घोड्यापुढे दाखवते हे दर्शवणारं he he he.

तर असं आहे बाळा, मांजर कितीही डोळे मिटून दूध पीत असलं तरी जगाचे डोळे उघडे असतात. चोरी केल्यामुळे मांजराच्या पाठीत लाटणं बसायचं ते बसतंच. तसंच Whatsapp एखाद्या प्रतिष्ठीत कंपनीने विकत घेऊन तिथे नवीन सेवा पुरवणं हा वेगळा भाग झाला. पण तुझ्यासारख्या भुक्कड माणसाने, Whatsapp वाल्यांनी त्यांची सेवा बंद केल्यावर, साईट सोडून दिली म्हणून ती साईट स्वत: विकत घेऊन, तिथे आपले गारूड्याचे खेळ दाखवणं आणि इंटरनेटच्या जगाची फारशी माहिती नसलेल्या माणसांसोबत "कस्सं फसवलं he he he" चे चाळे करणं ह्याला सायबर क्राईम म्हणतात. मूठभर लोकांना तू फसवलंस तरी इथे इंटरनेटवर तुझे बाप वावरत असतात. तू चूक कधी करतोस, ह्याची वाटच पहात बसलेले असतात ते. तू संधी मिळाली म्हणून त्यांना त्रास देतोस की तू काहीतरी गुन्हा करावास म्हणून त्यांनी सापळे रचलेले असतात, हे समजून घेणं तुझ्यासारख्या "mastermind" च्या बुद्धीच्या पलिकडचं आहे.

डोमेनचा पूर्वीचा आणि आताचा मालक शोधण्यासाठी डोमेन हिस्टरी ही तर फक्त झलक असते. तिथे आपलं नाव बदलता येतं. स्वत:च्या फेसबुक प्रोफाईलवर Male असं लिहिलेलं असलं तरी डोमेनचा मालक म्हणून बायकांच्या नावामागे दडता येतं. असे शिकाऊ जादूचे प्रयोग पाळण्यात असताना करायचे असतात. डोमेनचा मूळ मालक शोधण्यासाठी आणखी बर्‍याच सुविधा आहेत. कदाचित तुला त्या माहित नसाव्यात.

दुसरं असं बाळा, एखाद्या प्रसिद्ध साईटचं डोमेन कुणी वापरून सोडून दिलं ना कि डोमेन विक्रीच्या बाजारात त्याची किंमत वाढलेली असते. ते डोमेन लिलावात देखील विक्रीला निघू शकतं पण तिथेही त्याची किंमत तुझ्यासारख्या भणंगाना परवडू नये इतकी गगनाला भिडलेली असते. ते डोमेन मूळ किंमतीला पुन्हा विकत घेण्यासाठी किमान पाच वर्षं वाट पहावी लागते. कारण लिलावामध्ये अस्मानाला भिडलेल्या किंमतीला कुणी ते डोमेन विकत घेतलं नाही तर अजूनही गिर्‍हाईक येईल, ह्या आशेवर रजिस्ट्री ते स्वत:कडे ठेवून घेते. डोमेनचा आधीचा खरेदीदार किंवा इतर कुणीही ते डोमेन विकत घेणार नाही, ह्याची खात्री जेव्हा रजिस्ट्रीला पटते, तेव्हाच ते डोमेन मूळ किंमतीला म्हणजे ५०० ते ६०० रूपये इतक्या दराला पुन्हा विक्रीसाठी बाहेर काढलं जातं.

चार-पाच वर्षं अशा महागड्या डोमेनवर नजर ठेवून मग ते स्वस्त झालं की विकत घेणं ह्यात तुझा संधीसाधूपणा नाही दिसत बाळा. तुला त्या डोमेनच्या आधीच्या मालकामुळे आलेला प्रचंड न्यूनगंड (Inferiority complex माहित असेलच कदाचित) आणि नैराश्य दिसून येतं. त्या नैराश्याच्या आहारी जाऊन "काहीतरी करून दाखवतोच" ह्या तिरीमिरीतून तू ते विकत घेऊन स्वत:ला सिद्ध करण्याचा एक दयनीय प्रयत्न करतोस.

थोडक्यात, तू जर अशाप्रकारे स्वत:चा शहाणपणा दाखवून एखादं प्रसिद्ध डोमेन जर विकत घेतलंस, तर त्यात तुझं obsession आणि थेंबाने गेलेली इज्जत हौदाने भरून काढण्याचा हव्यास दिसतो. तुझं अशा प्रकारे डोमेन विकत घेणं हे त्रासाचं किंवा रागाचं कारण नसून प्रचंड मोठा विनोद आहे आणि तुला आतून किती असुरक्षित वाटतंय हे लक्षात येऊन पब्लिक हसतंय तुझ्यावर.

तेव्हा whatsapp ने त्यांचं डोमेन सोडून दिलं की घे तू विकत, जर ऐपत असेल तर.

ता.क. माझं mogaraaphulalaa.com हे डोमेन सध्या ₨ 32,894.74 इतक्या अत्यल्प किंमतीमध्ये लिलावात उपलब्ध आहे. घेतोस का विकत? मी वापरलेलं डोमेन तुला आवडतच नाही, असं तर तुला म्हणता येणार नाही. काय? ;)

1 comment: