Sunday, August 19, 2012

एक था टायगर (२०१२)

प्रतिक्रिया: 
पदार्थ - एक था लव्हर

Ek Tha Tiger review on mogaraaphulala.blogspot.com

मुख्य साहित्य:
१ पाकिट मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस स्मिथ सिनेमा
१ आख्खा सलमान (जून असावा)
१ आख्खी कतरिना (फार कोवळी नको)
संवाद चवीपुरते

फोडणीसाठी:

१/४ टेबलस्पून इंग्रजी ट्वेन्टी फोर सिरीजचे स्टंट्स
२ टेबलस्पून इराक किंवा टर्कीचं लोकेशन
४/५ प्रेमळ गाणी
१ टिस्पून क्यूबाचं लोकेशन

कृती:
१. सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात सलमान व कतरिना व्यवस्थित ढवळून किमान ३ ते ४ वर्षे बाजूला ठेवून द्यावेत. म्हणजे ते चांगले मुरतात.
२. आता या मुरलेल्या मिश्रणात एक पाकिट मिस्टर अॅ न्ड मिसेस स्मिथ घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
३. फोडणीसाठी ३ तास शिजण्यास मावेल एवढ्या मोठ्या कढईत ट्वेन्टी फोर सिरीजचे स्टंट्स गरम करावेत. त्यात इराक किंवा टर्कीचं लोकेशन टाकावे.
४. तडतड असा आवाज झाला की एक गाणं बाजूला काढून इतर सर्व गाणी यात टाकावीत व मिश्रण चांगलं परतून घ्यावं.
४. आता यात १ टिस्पून क्यूबाचं लोकेशन टाकावं व पुन्हा परतून घ्यावं.
५. सर्वात आधी मोठ्या पातेल्यात जे मिश्रण ढवळून ठेवलं होतं, ते या कढईत ओतावं व नीट परतून घ्यावं व किमान तीन तास हा पदार्थ शिजवावा.
६. शेवटी चवीपुरते संवाद टाकावेत.
७. जे एक गाणं बाजूला काढून ठेवलं होतं, त्या गाण्याने ही डीश सजवावी व प्रेक्षकांना गरम-गरम वाढावी.

या पदार्थाला किंचीत रॉ व आय एस आय सारखा वास येतो, त्यामुळे तरूण वर्ग या डिशवर चटकन ताव मारेल. मात्र हा पदार्थ खास लहान मुलांसाठी बनवलेला आहे. सलमान आणि कतरिनाच्या मुरलेल्या मिश्रणामुळे या पदार्थात काही विशेषता नसूनदेखील हा पदार्थ चटकन संपवला जाईल.

टीप:
१. चिमूटभर असोका वापरायला हरकत नाही पण तो फक्त संतोष सिवनचाच असावा.
२. कतरिना या पदार्थाला गाणं सहन होत नाही त्यामुळे ढवळताना काळजी घ्यावी.
३. सजवण्यासाठी बाजूला काढलेलं गाणं जर माशाल्ला माशाल्ला असेल, तर आणखीनच छान.

*****

12 comments:

 1. हाहाहा खुमासदार लिहिलंय!! :-)

  ReplyDelete
 2. उद्वेगाने लिहिलं रे. डोंगर पोखरून उंदीर...
  मला ’व्हॉट्स युवर राशी पाहिल्यावर’ देखील एवढं डिप्रेशन आलं नव्हतं.

  ReplyDelete
 3. जीवनिकाAugust 19, 2012 at 12:41 PM

  व्हॉट युवर राशी पेक्षा ही वाईट आहे ? बापरे
  खुपच छान लिहील आहे बाकी

  ReplyDelete
 4. जीवनिका, अगं दोन्ही सिनेमे सारखेच वाईट आहेत. पण ... राशीच्या वेळेस नवर्‍याने तिकिटं काढली होती. या वेळेस मी. ;P

  ReplyDelete
 5. हा हा हा _/\_

  ReplyDelete
 6. तुझ्या सहनशीलतेला सलाम कांचनतै :)
  तू ’व्हॉट्स युवर राशी’ आणि आता तर ’एक था ..." पण बघू शकतेस. :P
  त्रिवार मुजरा !!

  ReplyDelete
 7. आवडते कलाकार असले की फिल्लमबाजांना चॉईस नसतो बाबा. तिकीट काढायचं आणि... भोग भोगायचे :(

  ReplyDelete
 8. हा...हा...हा...चांगलाच डोक्याला शॉट झालाय वाटत ;)

  ReplyDelete
 9. चां ग ला ?? हा सिनेमा पाहून आल्यावर मला इतकं नैराश्य आलंय की मी दुसरा कुठलाच सिनेमा अजून पाहिला नाहिये.

  ReplyDelete
 10. स.न.वि.वि
  सदर लेखक/लेखिका यांस,


  (विषय - मराठी ब्लॉगर्स संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रण)

  मराठी ब्लॉगर्स संघ हा नावाप्रमाणेच मराठी ब्लॉगर्संना एकत्र आणण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. यात सर्वांना सहभागी होता येईल. (आपला ब्लॉग वर्डप्रेस, ब्लॉगर अथवा इतर कुठेही असला तरी). मराठी ब्लॉगर्सं या व्यासपीठावर आपल्या ब्लॉगिंग संदर्भात समस्या मांडु शकतील, इतरांच्या समस्यांना उत्तरे देऊ शकतील. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे आप-आपल्या ब्लॉग पोस्ट दुवे येथे सर्वांसमोर मांडु शकतील.

  सहभागी होण्यासाठी टिचकी द्या..


  मराठी ब्लॉगर्स संघ


  आजच सहभागी व्हा आणी आपल्या मित्र-मैत्रीणीना सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवा..!!

  एकमेका साह्य करू, अवघे धरु ब्लॉगर पंथ..

  टिप्पणीस परवानगी दिल्याबद्दल आभार..!!

  ईन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे

  ReplyDelete