Monday, March 26, 2012

सफाई कामगार

प्रतिक्रिया: 
एक साधं गणित असतं बघा - कचरा काढताना, गोळा झालेला कचरा उचलून केराच्या टोपलीत टाकण्यासाठी सूपाचा वापर करतात.

महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना हे असं सूप पुरवलं जात नाही का? त्याऐवजी हे पुठ्ठे का पुरवले जातात? की ते सुद्धा हे सफाई कामगारच मिळवतात कुठूनतरी? गणवेशाचं काय? सर्वांना गणवेश देत नाहीत का?


"आपलं शहर स्वच्छ ठेवा" आशयाचे फलक महानगरपालिकेतर्फे प्रत्येक शहरात लावलेले असतात. पण खुद्द सफाई कामगारांनी स्वत:ची स्वच्छता बाळगण्यासाठी त्यांना बूट, मास्क इ. काही पुरवलं जात नाही का?

...की या सर्व सुविधा सफाई कामगारांना पुरवलेल्या असतात आणि काही पैशांसाठी ते त्या वस्तू बाहेर विकतात? मग त्या वस्तू त्यांच्याकडे आहेत की नाहीत याची माहिती ठेवली जात नाही का?

काही कळत नाही. कुणी देईल का याची उत्तरं?
*****

No comments:

Post a Comment