Wednesday, August 31, 2011

नियमावली - मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ साठी

प्रतिक्रिया: 
१. ’मोगरा फुलला दीपावली अंक २०११’ मधे प्रकाशित होणारी विविध साहित्य सदरे पुढीलप्रमाणे:

अ. दीर्घकथा
आ. आ. ललित लेख, माहितीपर लेख किंवा लघुकथा
इ. पाककृती (फोटोसह)
ई. कलाकुसर किंवा सर्जनशील माहिती (फोटोसह)
उ. कविता, चारोळ्या, मुक्तक व मुक्तछंद
ऊ. विनोद, कोडी, उखाणे
ऋ. ध्वनिमुद्रीत अभिवाचन (कमाल लांबी १० मिनिटे)
ऌ. ध्वनिचित्रमुद्रण (व्हिडीओ रेकॉर्डींग) (कमाल लांबी १० मिनिटे)
ऍ. फोटो अथवा प्रतिमा (कमाल आकार (Size) ५०० के.बी.)
ऎ. व्यंगचित्र (कमाल आकार (Size) ५०० के.बी.)

२. ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ साठी अक्षरी साहित्य पाठविताना शब्दमर्यादेचे बंधन पाळण्याची आवश्यकता नाही. मात्र, सहभाग्यांनी पाठविलेले सर्व साहित्य हे संपादन सहाय्य मंडळाकडून तपासले जाणार आहे. आक्षेपार्ह शब्द/मजकूर, शुद्धलेखन इ. तपासूनच साहित्य प्रकाशित केले जाईल. त्यामुळे सहभाग्यांनी पाठविलेले सर्वच साहित्य अंकात समाविष्ट केले जाईल असे नाही. शेवटच्या चार साहित्यप्रकारांना आकाराच्या मर्यादेचे बंधन आहे.

३. अप्रकाशित साहित्यास प्राधान्य दिले जाईल.

४. नियम क्र. १ मधे उल्लेखिलेल्या साहित्य सदरांव्यतिरिक्त अवगत असलेल्या इ. कोणत्याही साहित्यप्रकारासाठी साहित्य पाठविता येईल.

५. साहित्यचोरी संपूर्णत: निषिद्ध. पाठविलेले साहित्य स्वनिर्मित म्हणजेच स्वत:चे असावे. दुसर्‍याचे साहित्य स्वत:च्या नावावर, अगर मूळ निर्मात्याच्या परवानगीशिवाय पाठविल्यास पुढील परिणामांसाठी ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ चे संपादक मंडळ जबाबदार रहाणार नाही.

६. अश्लील विषय, पक्षीय राजकारण तसेच धार्मिक किंवा जातीय विषय, प्रक्षुब्ध लेखन, वैयक्तिक उणी दुणी काढणारे लेखन, प्रचारात्मक लेखन, तसेच बोचक टीका इ. गोष्टी वर आधारित साहित्य पाठवणे टाळावे.

७. स्वत:च्या वैयक्तिक ईमेल आयडी मार्फतच साहित्य पाठवावे. कार्यलय, संस्था इ.च्या आय.डी. मार्फत पाठविलेले साहित्य आणि संपर्क स्विकारार्ह नाही.

८. साहित्य पाठविल्यानंतर सहभागी व्यक्तीला त्याच ईमेलला रिप्लाय म्हणून पोच पावती दिली जाईल. तसेच अंकाच्या प्रकाशनाची लिंकदेखील अंक प्रकाशित होण्याच्या एक दिवस आधी ईमेल केली जाईल.

९. अप्रकाशित साहित्य पाठविणारे सहभागी ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ प्रकाशित झाल्यावर दोन दिवसांनंतर आपले साहित्य स्वत:च्या ब्लॉगवर प्रकाशित करू शकतात.

१०. वाढत्या साहित्यचोरीचे प्रकार पहाता अंकातील साहित्याची चोरी होऊ नये व ते इतरत्र त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने प्रकाशित केले जाऊ नये म्हणून जास्तीत जास्त खबरदारी घेतली जाणार आहे. मात्र या खबरदारीमुळे साहित्यचोरी न होण्यची १०० टक्के खात्री देता येत नाही. तरी अंकातील साहित्य काही कालावधीनंतर इतरत्र प्रकाशित झालेले आढळल्यास ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’चे संपादक व संपादन सहाय्य मंडळास जबाबदार धरू नये.

११. सहभागी व्यक्तीने पाठविलेल्या स्वनिर्मित साहित्यावर सहभागी व्यक्तीचाच संपूर्ण अधिकार असेल. मात्र साहित्यचोरांनी गैरफायदा घेऊ नये व साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे अधिकार साहित्यकाराकडेच सुरक्षित रहाण्यास मदत व्हावी म्हणून मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ मधेदेखील कॉपीराईट कायद्याची सूचना देणार तळटीप दिली जाणार आहे. या सूचनेमधे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License चा समावेश असेल.

१२. साहित्य पाठविण्यासाठी ईमेल पत्ता diwaliank@mogaraafulalaa.com असा आहे. मोगरा फुललाशी संबंधित इतर कुठल्याही आयडीवर साहित्य पाठवू नये.

१३. हा अंक संपूर्णत: मनोरंजनासाठी तयार केला जाणार आहे. त्यात जाहिरातींचा समावेश असणार नाही.

१४. सहभागी व्यक्तींना ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१११ मधे साहित्य प्रकाशित करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचे मानधन अथवा आर्थिक मोबदला दिला जाणार नाही.

१५. मोगरा फुलला ई-दीपावली अंकासाठी साहित्य पाठविण्याची मुदत आहे दि. १ सप्टेंबर २०११ ते ३० सप्टेंबर २०११. मुदतीनंतर आलेले साहित्य विचारात घेतले जाणार नाही.

१६. मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ मधे कोणते साहित्य प्रसिद्ध करायचे याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही.

**अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.**
********************

No comments:

Post a Comment