Thursday, August 18, 2011

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९(अ)

प्रतिक्रिया: 
Directive under Section 79(A) of Maharashtra Co-operative Societies Act 1960 - Read in English.

पुनर्विकास प्रक्रियेमधे बर्‍याचदा अपारदर्शकता आढळून येते. सभासदांना विश्वासात न घेणं, स्वत:च्या इच्छेनुसार एखाद्या विकासकाची नियुक्ती करणं अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे राज्यात विविध ठिकाणांहून फार मोठ्या प्रमाणावर नोंदवल्या गेल्या होत्या. पुनर्विकास प्रक्रियेसंबंधी फारशी माहिती नसल्यामुळे सोसायटीच्या सभासदांमधे वाद होणे, पदाधिकार्‍यांनी चुकीचे निर्णय घेणं असे प्रकारही घडून येतात. यासाठी राज्य सरकारच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या पुनर्विकासाकरिता एक नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे काटेकोरपने पालन होणार असेल, तरच यापुढे पुनर्विकास प्रक्रियेला मंजुरी मिळणार आहे. या नियमावलीमुळे पुनर्विकास प्रक्रियेमधे जास्तीत जास्त पारदर्शकता निर्माण होण्यास मदत झाली आहे. तेव्हा मागाहून फसवणूक झाल्यासारखी भावना मनात बाळगण्यापेक्षा आपल्या सोसायटीचा पुनर्विकास होत असताना या नियमावलीमधे दिलेल्या निदेशांचे पालन होते आहे की नाही, याकडे लक्ष देणे जास्त उपयुक्त ठरेल. ही नियमावली खाली डाऊनलोडींग साठी उपलब्ध करून दिलेली आहे.*****

No comments:

Post a Comment