Wednesday, August 31, 2011

अटी - मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ साठी

प्रतिक्रिया: 
. एका सहभागी व्यक्तीला कितीही साहित्य सदरांसाठी नोंदी पाठवता येतील. मात्र एका साहित्यसदरासाठी जास्तीत जास्त दोनच नोंदी पाठवाव्यात (उदा. एकाच व्यक्तीकडून दोन ललित लेख, दोन कविता दोन अभिवाचने असं साहित्य स्विकारलं जाईल, याप्रमाणे).

२. साहित्य पाठविताना आपली संपूर्ण माहिती देणे आवश्यक नसले तरी पूर्ण नाव जाहीर करणे आवश्यक आहे. (मोबाईल क्रमांकाची सक्ती नाही मात्र दिल्यास त्वरित संपर्कासाठी उपयुक्त.)

. ज्यांना आपले साहित्य टोपणनावाने प्रसिद्ध व्हावे असे वाटते, त्यांचे साहित्य टोपणनावानेच प्रसिद्ध केले जाईल. मात्र साहित्य ईमेलने पाठविताना आपले खरे नाव जाहीर करणे अनिवार्य आहे.

४. पूर्वप्रकाशित साहित्य पाठविल्यास त्याच्या पूर्वप्रकाशनाचा संदर्भ ईमेलमधे द्यावा.

५. अक्षरी साहित्य ईमेलचाच एक भाग (Body Text), .doc, htm स्वरूपात या स्वरूपात अथवा त्या स्वरूपातील अटॅचमेंट म्हणून पाठवावे. पाठवावे. PDF, JPEG स्वरूपात रूपांतरित करून पाठविलेले अक्षरी साहित्य स्विकारार्ह नाही.

६. मोठ्या स्वरूपाचे अक्षरी साहित्य (उदा. दीर्घकथा) पाठविण्यासाठी वर्ड्स इ. सुविधा उपलब्ध नसल्यास ते साहित्य Body Text म्हणून एकापेक्षा जास्त ईमेल्समधे पाठवावे.

७. ज्या सदरासाठी साहित्य पाठवणार आहात (उदा. दीर्घकथा, लघुकथा, कविता, पाककृती इ.) त्या सदराचा उल्लेख ईमेलमधे आवर्जून करावा. साहित्याच्या शिर्षकाचाही उल्लेख ईमेलमधे (सब्जेक्टमधे नव्हे) करावा.

८. साहित्य सदरांपैकी फोटो, इमेजेस, ध्वनिमुद्रीत अभिवाचन (रेकॉर्डींग), ध्वनिचित्रमुद्रण (व्हिडीओ रेकॉर्डींग), व्यंगचित्र अशा स्वरूपाचे साहित्य हे अटॅचमेंट स्वरूपात पाठवावे. अभिवाचन, व्हिडीओ, फोटो किंवा इमेजेस त्रयस्थ ठिकाणी अपलोड करून (यूट्युब, ईस्निप्स, फोटोबकेट, स्वत:ची गुगल साईट किंवा ब्लॉगवर अपलोड करून) त्याची लिंक ईमेलमधून पाठविल्यास तसे साहित्य स्विकारार्ह नाही.

९. फोटोसोबत फोटो काढल्याची तारीख व स्थळ यांचा उल्लेख असणंही अत्यावश्यक आहे.
  • फोटो किंवा इमेज प्रकारातील साहित्य हे JPEG PNG व TIFF स्वरूपातील असावे (साईज जास्त असल्यास कमी करून घेतली जाईल). वॉटरमार्कसोबत फोटो पाठविल्यास उत्तम.
  • ध्वनिचित्रमुद्रण (व्हिडीओ) flv, mp4 किंवा avi स्वरूपात पाठवावे व त्यांची लांबी (पार्श्वसंगीत व नामावलीसह) १० (दहा) मिनिटांपेक्षा जास्त असू नये.
  • ध्वनिमुद्रीत अभिवाचन स्वत:च्या पूर्वप्रकाशित लेखाचे असल्यास चालेल. हे mp3 किंवा wave स्वरूपात पाठवावे. मात्र अभिवाचनाची लांबी (पार्श्वसंगीतासह) १० (दहा) मिनिटांपेक्षा जास्त असू नये.
  • अभिवाचनाच्या सुरूवातीला स्वत:ची ओळख करून देणारे ध्वनिमुद्रण असणे अनिवार्य आहे. (नाव, कथानकाचे नाव, कथानकाचा मूळ लेखक त्रयस्थ असल्यास त्यांच्या नावाचा उल्लेखही अनिवार्य आहे.)
  • अभिवाचन दुस-या व्यक्तीसाठी करत असल्यास अभिवाचन करणारी व्यक्ती व मूळ लेखक यांची परस्परांना संमती व सहमती असल्याचा पुरावा mogaraafulalaa@gmail.com येथे अभिवाचनासोबतच पाठवला जावा.
  • चित्रपट परिक्षण, पुस्तक परिक्षण अशा विषयांवरील लेखांसाठी इंटरनेटवरून सहज उपलब्ध होणारी छायाचित्रे पाठवू नयेत. अशी छायाचित्रं प्रताधिकारमुक्त असतातच असे नाही. अशा लेखांसाठी छायाचित्र जोडायचे की नाही, याचा निर्णय संपादन समितीशी चर्चा करून घेतला जाईल.

१०. विनोद, कोडी, उखाणे अशा प्रकारचे साहित्य हे संकलित म्हणून प्रकाशित करण्यात येईल. म्हणजेच विनोद किंवा कोड्याची निर्मिती सहभागी व्यक्तीने केलेली आहे, असे जाहीर करण्याऐवजी सहभागी व्यक्तीने हे विनोद, उखाणे किंवा कोडी संकलित (संग्रहीत - compiled) करून ’मोगरा फुलला दीपावली अंक २०११’ साठी’ पाठविली आहेत, असे जाहीर करण्यात येईल. विनोदामधे सरदारजी, संता-बंता, किंवा कोणत्याही जाती-धर्माचा उल्लेख नसावा.

११. पाककृती व कलाकुसर इ. सदरांसाठी पाठविलेले फोटो व व्हिडीओही स्वत:च्याच कलाकृतीचे असावेत. फोटो व व्हिडीओंसाठी वर दिलेल्या सर्व अटी या फोटो व व्हिडीओंनाही लागू आहेत. (अट क्र. ९ व उप-अटी)

१२. ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ मधे साहित्य प्रकाशित करण्यासाठी mogaraafulalaa@gmail.com याच ईमेल आय.डी.वर पाठवावे. मोगरा फुललाशी संबंधित अन्य ईमेल आय.डी. वर पाठवलेले साहित्य स्विकारार्ह नाही.

१३. लेखन पाठविण्यासाठी केवळ मंगल फॉन्ट (देवनागरी - बराहा, गमभन, क्विलपॅड तत्सम) चा वापर करावा. शिवाजी, वरूण, आकृती इ. फॉन्टमधील लेखन स्विकारार्ह नाही.

१४. साहित्य पाठविताना ईमेलमधे सुरूवातीलाच खालील जाहीरनामा जोडणे अनिवार्य आहे. या जाहीरनाम्यामुळे आपण जे साहित्य पाठविता आहात, ते ’मोगरा फुलला दीपावली अंक २०११’ मधे प्रकाशित करण्यासाठी आम्हाला परवानगी देत आहात हे स्पष्ट होईल. (हा जाहीरनामा डाऊनलोड किंवा कॉपी करून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

जाहीरनामा

मी____________________________________________________________
     स्वत:चे नाव                   आई / वडील / पतीचे नाव                                आडनाव

असे घोषित करतो/ते की, ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ साठी पाठवलेले साहित्य पाठविण्यासंबंधीचे सर्व नियम व अटी मी वाचले आहेत आणि ते मला मान्य आहेत. या ईमेलद्वारे ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ या अंकासाठी पाठविलेले खालील साहित्य (विनोद, कोडी आणि उखाणे याव्यतिरिक्त) मी स्वत: निर्मिलेले आहे आणि ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी मी ते पाठवित आहे. या अंकात ते प्रसिद्ध करायला माझी अनुमती आहे.

___________________
(नाव)
(ईमेल आयडी)

१५. इंटरनेटवर या वर्षी प्रसिद्ध होत असलेल्या इतर कुठल्याही दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य मोगरा फुलला ई-दीपावली अंकासाठी पाठवू नये.

१६. वरील सर्व अटींचे व नियमावलीचे पालन होणे बंधनकारक आहे.


********************

No comments:

Post a Comment