Tuesday, August 2, 2011

त्यांची एरर आणि आमचं अर्रर्र!

प्रतिक्रिया: 
स्वप्न आणि सत्य यात केऽऽऽऽवढी तफावत असते नै? रिडर्स काउंटरवालेदेखील आमच्या भावनांशी खेळू शकतात!
स्वप्न


सत्य

नाही, मान्य आहे की मी इतकं काही चांगलं लिहीत नाही. स्वत:ला साहित्यिक वगैरे म्हणवून घेण्याचा वेडेपणा तर मी स्वप्नातदेखील करणार नाही. माझ्या ब्लॉगवर केवळ दोनच वाचक उपस्थित आहेत (त्यातली एक मी स्वत:च आहे, दुसरा दुर्दैवी कोण ते देवच जाणे!), ही वस्तूस्थिती मी नाकारतेय का? पण याचा अर्थ माझा ब्लॉग वाचला जाऊच नये इतकं वाईटही मी लिहीत नाही.सटीसहामाशी एखादी पोस्ट टाकल्यावर वरच्या स्वप्नातल्या चित्रात दिसते तितकी नसली तरी वाचकसंख्या बरी असते माझ्या ब्लॉगवर. मग कशाला उगाच "तुला टुकटुक" सारखे हे फसवे आकडे दाखवायचे? आनंदातिशयाने मला चक्कर तेवढी यायची बाकी होती ना! नशीब की मी पान ताबतोब रिफ्रेश केलं (तेवढाच एक पेज काउंट वाढला ;-)) आणि वास्तवात आले. नाहीतर हा "सोनियाचा दिवस" मी घरात गोडाधोडाचे पदार्ध बनवून साजरा केला असता.*****

No comments:

Post a Comment