Saturday, April 23, 2011

विशलिस्टमधली दोन पुस्तके येतायंत

प्रतिक्रिया: 
आह! गेल्या कित्येक दिवसांपासून माझ्या विशलिस्टमधे असलेली दोन पुस्तके सरतेशेवटी येताहेत. इथल्या बर्‍याच दुकानांमधे शोधली ही पुस्तके पण नाही मिळाली. शेवटी अ‍ॅमेझॉनवरून मागवावी लागली. भरतकामाची उत्कृष्ट माहिती असलेलं एक पुस्तक म्हणजे - Doodle Stitching ’The motif collection’. याचा पहिला भाग सुद्धा आहे आणि हे दुसरं पुस्तक ’One Yard Wonders’. एक यार्ड कपडयामधे आपण कोणकोणते शिवणकलेचे प्रकार करू शकतो याची माहिती देतं.

माझ्यासारख्या क्रोशे, शिवणाची आवड असलेल्यांसाठी एक प्रकारची मेजवानीच आहे ही पुस्तकं म्हणजे. एकदा का ही दोन्ही पुस्तकं हातात पडली की त्यांची आणखीन माहीती आणि काही फोटोसुद्धा देईन इथे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही बनवलं तर ते सुद्धा पोस्ट करेनच, नव्हे केलंच जाईल कारण ही पुस्तक मिळाल्यावर त्याच्यातील एक-दोन प्रकार ताबडतोब करून पाहिल्याशिवाय मलाच चैन पडणार नाही. पण तोपर्यंत इंतजार!

तशी माझी विशलिस्ट खूप मोठी आहे आणि काही वस्तू इथे मिळत नाहीत आणि मागवताही येत नाहीत, अशी अडचण आहे. उदा. रोटरी कटर. फिस्कारचं रोटरी कटर इथे मिळत नाही आणि मागवायचं म्हटलं तर नियम आडवे येतात. इथे रोटरी कटर्स मिळत नाहीत असं नाही पण एकाला हॅन्डल नसतं, एकाला असतं तर पात्यांचे स्क्रू ढिले असतात म्हणजे कापडाऐवजी आपल्याच हाताचं कटींग व्हायचं, त्यामुळे सध्यातरी मला जड कात्री हातात घेण्यावाचून गत्यंतर नाही. पण मला विश्वास आहे यावरही काहीतरी चांगला मार्ग निघेलच.

*****