Wednesday, March 30, 2011

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा २०११

प्रतिक्रिया: 
मराठी ब्लॉगर्स व वाचक मित्र मैत्रिणींनो,

मराठी ब्लॉगर्स केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात व भारताबाहेरही आहेत. २०१० साली पुणे व मुंबई येथे दोन ब्लॉगर्स मेळावे झाले, त्यानंतर महाराष्ट्रातील इतर शहरांमधेही ब्लॉगर्स मेळावे भरवले जावेत, अशा आशयाचे प्रस्ताव येऊ लागले. भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात व भारतातील प्रत्येक राज्यात मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा आयोजित केला जाऊ शकतो, या गोष्टीची जाणीव ठेवून http://marathibloggersmeet.blogspot.com/ हा ब्लॉग बनवला आहे. जेणेकरून सर्व शहरातील मराठी ब्लॉगर्स मेळाव्याची माहिती एकाच ठिकाणी संकलित होईल व इतर शहरांतील ब्लॉगर्सनाही त्याची इत्यंभूत माहिती मिळू शकेल. यापूर्वी भरलेल्या दोन ब्लॉगर्स मेळाव्यांची सचित्र महिती काही दिवसांतच संकलित करून इथे प्रकाशित करण्यात येईल.

२०११ सालचा मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा कुठे आयोजित करावा, यासाठी अनेक शहरांचे पर्याय समोर येत आहेत. तसेच अशा कार्यक्रमांसाठी आयोजकांचीही गरज आहे. त्या अनुषंगाने एक मतपत्रिका http://marathibloggersmeet.blogspot.com/2011/03/mbm-2011-prearrangement-1.html येथे तयार करण्यात आली आहे. आपले मत येथे अवश्य नोंदवा. मतपत्रिका भरण्याचा शेवटचा दिनांक अद्याप निश्चित केलेला नाही. मात्र पुढच्या दोन-तीन दिवसांताच तो जाहीर करण्यात येईल. कृपया मोबाईल क्रमांक, ब्लॉगची लिंक व ईमेल आयडी व्यतिरिक्त सर्व फॉर्म मराठीत भरावा.

ब्लॉग मेळाव्याच्या आयोजकांना या ब्लॉगचे व्यवस्थापक म्हणून त्या-त्या वर्षी काम पहाता येईल.