Sunday, October 31, 2010

प्रकाशित झाला मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०

प्रतिक्रिया: 
नमस्कार मित्रमैत्रीणींनो,

ज्याची आपण प्रदीर्घ प्रतिक्षा केलीत, ज्या अंकासाठी आपल्या सदिच्छा कायम सोबत होत्या, तो मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० प्रकाशित झाला आहे. अंकाची लिंक आहे http://mfdiwaliank.blogspot.com


केवळ ललित लेख, कथा आणि कविताच नव्हे, तर चविष्ट पाककृती, व्यंगचित्र, छायाचित्रे व आणखी काही आकर्षक साहित्याने सजलेला असा हा अंक अवश्य वाचा व आपला अभिप्रायही आवर्जून द्या.

ज्यांना या अंकाची माहिती आपल्या संकेतस्थळावरून / ब्लॉगवरून द्यायची असेल, त्यांनी या ब्लॉगवर सर्वात वर दिलेला दिवाळी अंकाचा कोड कॉपी पेस्ट करून घ्यावा.

धन्यवाद.

आपली स्नेहांकित,
कांचन कराई
संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०