Monday, September 27, 2010

दीपावली अंकासाठी साहित्य येऊ द्या

प्रतिक्रिया: 
दसरा आणि कोजागिरीची धमाल करण्याआधी...

चला मित्रमैत्रीणींनो, आपला कीबोर्ड सज्ज करा. लक्षात आहे ना! मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० साठी तुम्ही साहित्य पाठवायचं आहे. अर्थात, आपापले उद्योग सांभाळून!

दीर्घकथा, लघुकथा, ललित लेख, कविता, चारोळ्या, उखाणे, कोडी, विनोद............. आपलं लेखनकौशल्य आजमावण्यासाठी आणखीही भरपूर साहित्यप्रकार आहेत तुमच्यापाशी. साहित्यासाठी विषयाचं आणि शब्दमर्यादेचं अजिबात बंधन नाही आणि जर लेखनासाठी कीबोर्ड वापरायचा कंटाळा आला असेल, तर तुमच्या आवाजात एखादं छानसं रेकॉर्डींग किंवा तुम्ही शूट केलेल्या व्हिडीओची एखादी छोटीशी झलक पाठवून द्या.

साहित्य शक्यतो अप्रकाशित असावं. पूर्वप्रकाशित साहित्य पुन्हा दीपावली अंकात प्रकाशित केलं तर वाचकांना तुमचे नवीन लेख कसे वाचायला मिळतील बरं? तेव्हा आता वेळ दवडू नका. तुमचं अप्रकाशित साहित्य mogaraafulalaa@gmail.com या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवा. साहित्य पाठविण्याची शेवटची तारीख आहे २० ऑक्टोबर २०१०. साहित्य कसं पाठवायचं याची माहिती इथे दिलेली आहेच.

इतर सविस्तर माहिती साठी या लिंकवरचा लेख वाचा. कुणाला आपल्या ब्लॉगवरून या दीपावली अंकाची माहिती द्यायची असल्यास खालचा कोड Ctrl+C आणि Ctrl+V ने कॉपी पेस्ट करून आपल्या ब्लॉगवर लावता येईल.


धन्यवाद.