Saturday, September 11, 2010

मोगरा फुलला दीपावली अंक २०१०!

प्रतिक्रिया: 
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणींनो,

गेल्या दीड वर्षापासून आपण ’मोगरा फुलला’च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहून सुसंवाद साधत आहोत. आपल्यातीलच काही ब्लॉगर मित्रांच्या आग्रहावरून E-दीपावली अंकाची कल्पना आकार घेऊ पहात आहे. हा E-दीपावली अंक आपल्या सहकार्याने आणि सहभागाने संपन्न व्हावा याकरिता तुम्हा सर्वांकडून या अंकासाठी विविध सदरांसाठी स्वनिर्मित साहित्य मागवण्यात येत आहे. आपण आपले लेख, कथा, कविता, अभिवाचन इ. साहित्य दि. २० ऑक्टोबर २०१० पर्यंत पाठवून सदर उपक्रम यशस्वी करावा, ही विनंती. आपण आपल्या मित्रांनाही या अंकासाठी साहित्य पाठवायला सांगू शकता. मराठीतून विचार करू शकणा-या व मराठी लिहू शकणा-या १८ वर्षांवरील कुठल्याही व्यक्तीला या अंकासाठी साहित्य पाठवता येईल.

कोणतंही विधायक कार्य म्हटलं की अर्थातच त्यात नियोजनाची नितांत आवश्यकता असते. तसेच, अशा प्रकारची निर्मिती ही नियमांच्या बंधनात राहूनच करावी लागते हे वेगळ सांगायची गरज नाही. त्यामुळे आपले साहित्य या अंकात प्रसिध्द होण्यापूर्वी काही नियम व अटींचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. आपले साहित्य आमच्याकडे पाठवण्यापूर्वी हे नियम व अटी जरूर वाचावेत व त्यानंतरच फॉर्म डाऊनलोड करून आपली माहिती भरून साहित्य आमच्याकडे पाठवावे. पाठविलेल्या साहित्याचे संपादन, तपासणी, निवड संपादन-सहाय्य विभागाकडून केली जाईल.

हा अंक स्वतंत्र ब्लॉग म्हणून प्रकशित केला जाईल. अंकाची URL (लिंक) प्रत्येक सहभागी व्यक्तीला ईमेलने पाठवली जाईल. अंकाची प्रत डाऊनलोडींगसाठी उपलब्ध करून दिली जाणार नाही. या अंकामधे जाहिरातींचा अंतर्भाव केला जाणार नाही. सबब जाहिरातदारांनी, वेबसाईटधारकांनी किंवा ब्लॉगर्सनी या अंकात स्वत:ची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधू नये.

या दीपावली अंकाचा उद्देश दीपावलीच्या उत्सवी वातावरणात सर्वांना मनोरंजनपर व माहितीपूर्ण साहित्य वाचण्यास मिळावे असा आहे. तेव्हा आपल्या सर्वांकडून तशाच प्रकारचे हलके फुलके, मन आनंदीत करू शकणारे, सकारात्मक व प्रेरणादायी विचारांचे साहित्य येणे अभिप्रेत आहे.

’मोगरा फुलला दीपावली अंक २०१०’ मधे प्रकाशित होणारी विविध साहित्य सदरे पुढीलप्रमाणे :

१. दीर्घकथा
२. ललित लेख किंवा लघुकथा
३. पाककृती (फोटोसह)
४. कलाकुसर किंवा सर्जनशील माहिती (फोटोसह)
५. कविता
६. चारोळ्या
७. विनोद, कोडी, उखाणे
८. ध्वनिमुद्रीत अभिवाचन (कमाल लांबी ७ मिनिटे)
९. ध्वनिचित्रमुद्रण (व्हिडीओ रेकॉर्डींग) (कमाल लांबी ७ मिनिटे)
१०. फोटो अथवा प्रतिमा
११. व्यंगचित्र

कृपया साहित्य पाठविण्यापूर्वी सर्व नियम व अटी व्यवस्थित वाचाव्यात. नियम व अटी हा प्रकार वाचण्यास व पालन करण्यास थोडासा त्रासदायी वाटतो मात्र अंक दर्जेदार व वाचनीय व्हावा यासाठी त्यांची योजना केली आहे.

नियम व अटी वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी इथेइथे उपलबध आहेत. नियम व अटी वाचल्यानंतर साहित्य पाठवायचे असल्यास जाहिरनाम्याचा जो फॉर्म ईमेलमधे पाठवायचा आहे, तो डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. हा फॉर्म ईमेलचे Body Text म्हणूनच पाठवावा.

’मोगरा फुलला दीपावली अंक २०१०’ साठी साहित्य पाठविताना admin@mogaraafulalaa.com या ईमेल आय.डी.वर पाठवावे. सब्जेक्ट मधे MFDA असे लिहावे म्हणजे हे साहित्यासंबंधीचे ईमेल आहे असे आम्हाला सहज समजेल.

धन्यवाद.

आपली स्नेहांकित,
कांचन कराई
संपादक
मोगरा फुलला दीपावली अंक २०१०

गणपती बाप्पा मोरया!