Wednesday, August 18, 2010

साहित्यचोर – बोक्या सातबंडे

प्रतिक्रिया: 
बोक्या सातबंडे - सुप्रसिद्ध अभिनेते व लेखक श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या मानसपुत्राचं हे नाव . बोक्या सातबंडे म्हणजे लहान मुलांच्या गोजि-या विश्वातला हिरो. त्याच्या गोष्टींतून लहान मुलांना सकारात्मक प्रेरणा मिळते. पण हेच नाव धारण करून एक भामटा मराठी ब्लॉग जगतातील लेखाकांसाठी उपद्रव ठरला आहे. या तोतया... हो, मी या भामट्याला तोतयाच म्हणते कारण लहान मुलांच्या विश्वातील हिरो बोक्या सातबंडे हा काल्पनिक असला तरी त्याच्यामुळे मिळणारे सुसंस्कार खरे आहेत आणि या भामट्याकडून जर कुणाला काही शिकायला मिळणार असेल, तर ते विघातकच असेल.

या तोतया बोक्या सातबंडेची स्वत:ची एक साईट आहे - http://www.bokyasatbande.com नावाची. स्वत:ला धड दोन ओळीही लिहिता येत नसाव्यात म्हणूनच मराठी ब्लॉगर्सचे लेख हा चोरून आपल्या साईटवर टाकतो. याला प्रतिक्रिया द्या, विनंती करा, काही फरक पडत नाही. उलट बेशरमपणे हा आणखी चो-या करतो. बरं, ही एकच साईट आहे याची असं नाही. ब-याच साईट्स, ब्लॉग्स, गुगलग्रुप्स आणि याहूग्रुप्सही आहेत याचे पण उद्योग एकच - साहित्यचोरी! काल महेंद्रदादांच्या ब्लॉगवर तुम्ही या बोक्याबद्दलचा पहिला भाग वाचलाच असेल. आज दुसरा आणि शेवटचा भाग इथे.

मराठी अस्मिता डॉट कॉम या साईटवर कुणीतरी माझे व महेंद्रदादांचे लेख प्रकाशित करतंय असं मला कळलं. ’चोरून’ हा शब्द मी मुद्दामच इथे वापरत नाही कारण प्रथमदर्शनी जरी ती चोरी वाटत असली तरी केवळ साहित्याची आवड म्हणून ईमेलद्वारे आलेले लेखही काही हौशी ब्लॉगर्स आपल्या ब्लॉगवर टाकतात. त्याला निदान माझी तरी ना नाही. अट एकच – मूळ लेखकाने त्या हौशी ब्लॉगरला संपर्क केल्यानंतर लेखक म्हणून त्याचं नाव लेखाखाली देत चला.
खरं तर यात शहानिशा करावं असं विशेष काही नाही. लेखाची लिंक व खालच्या प्रतिक्रियांमधून आपोआपच लेखावर हक्क सांगणा-याचा खरेपणा सिद्ध होत असतो. लेखातला काही अंश गुगल सर्च केला तर मिळणा-या लिंक्समधून मूळ लेखक समोर येत असतो. असे असतानाही जर मूळ लेखकाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून कुणी जर आपलंच नाव त्या लेखासोबत द्यायला लागलं. वाचकांच्या प्रतिक्रियांवर ’मला हा देवाचाच आशिर्वाद आहे,’ अशा छापाची खोटी उत्तरं द्यायला लागलं तर मूळ लेखकाची सहनशक्ती संपुष्टात येईल, यात नवल ते काय? या मराठी अस्मिता साईटवर जेव्हा माझे लेख प्रकाशित होत आहे असं मला कळलं तेव्हा मी तिथे माझी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर येत्या दोन दिवसांत तिथून तो लेख काढून टाकण्यात आला. लेख तिथे १७ फेब्रुवारीला प्रकशित झाला होता आणि मला हे कळलं २४ एप्रिलला. तारखा मुद्दाम का देतेय ते तुम्हाला पुढे कळेलच.
लेख काढून टाकण्यात आला तेव्हा प्रकरण इथेच संपलं असं समजून मी पुढे काही हालचाल केली नाही. मात्र या मराठी अस्मिता साईटच्या चालकाला उपद्रव देण्याचा किडाच चावलेला असावा. या महाशयांनी मला मराठी सुपरस्टार हे नाव धारण करून ईमेल पाठवलं. त्या सुपरस्टार आणि माझ्यात झालेल्या ईमेल संवादाचा गोषवारा असा की या सुपरस्टारला त्याच्या मराठी अस्मितावर मी माझे लेख टाकायला हवे होते पण त्याला स्वत:ला मात्र मराठी टायपिंगही येत नव्हतं. जेव्हा मी त्याला बराहा वापरण्याची विनंती केली, तेव्हा हे महाशय माझ्या वैयक्तिक माहितीवर घसरले आणि शेवटी स्वत:चं खरं स्वरूप त्यांनी उघड केलं.

त्यानंतरही मला या व्यक्तीचा शोध घ्यावासा वाटला नाही. साहित्यचोर म्हणून माझ्या ब्लॉगवर त्याच्या नावाची नॉनलिंक माहिती दिली कारण आपल्याला प्रसिद्धी मिळावी हाच त्याचा हेतु होता. मात्र त्याची अशी प्रसिद्धी होणं त्याच्या अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं. मिडीयाला स्वत:ची साईट बंद करण्याचं कारण सांगताना त्याने जी मल्लीनाथी केली ती खालच्या ईमेजमधे दिलेली आहे. ही इमेज ज्या वेबपेजची आहे, त्याची लिंक इथे - http://news.indiainfo.com/c-83-145893-1282880.html आहे. या लिंकमधे साहेबांनी मराठी अस्मिता ही साईट जागतिक मराठी दिनी म्हणजे २७ फेब्रुवारीला सुरू केली आहे असं म्हटलंय. माझा लेख मला तिथे १७ फेब्रुवारीला प्रकशित झालेला दिसला. म्हणजेच लेख कुणाचा आहे हे शहानिशा करण्याइसाठी पुरेसा वेळ त्याच्याकडे होता पण त्याने ते केलं नाही. का? या प्रश्नाचं उत्तर त्यालाच ठाऊक!या वरच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे या नगाने ती साईट खरंच विकली की नुसता लूक बदलला हे त्याचं त्यालाच माहित पण स्वत:ची इतकी केविलवाणी अवस्था करून घेण्याचं खरं तर त्याला काहीच कारण नव्हतं. दुस-यांचेच लेख छापायचे आहेत ना? छाप की! पैसेही कमाव! तुझ्याकडून त्यात वाटा मागावा इतकी वाईट अवस्था अजून आलेली नाही. पण लेखकाची रितसर परवानगी घे, लेखाखाली मूळ लेखकाचं नाव छाप. मग कोण नाही म्हणेल तुला? पण चोरी करण्याची ज्याला सवयच लागली त्याला सच्चाईने, इमानाने वागणं खूप कठीण जातं. एक साईट बंद करावी लागली ना, हरकत नाही. आपण दुसरी साईट सुरू करू आणि हेच लेख पुन्हा चोरु असा निर्धार करून या सुपरस्टारने स्वत:ची सर्व अक्कलहुशारी पणाला लावून बोक्या सातबंडे डॉट कॉम तयार केली. स्वत:ची खरी ओळख लपवलेली, मराठी अस्मिता डॉट कॉम आणि बोक्या सातबंडे डॉट कॉमचा काही संबंध आहे याचा कुठे मागमूस नाही, साईटवर चोरीचे लेख, गुगल आणि अॅबड्स फॉर इंडियनच्या जाहिराती शिवाय रोजचे हजार हिट्स... और क्या चाहिए! काम तर एकदम मस्त जमून आलं होतं. पण चोरी करणं जितकं सोपं असतं तितकं चोरी लपवणं नाही, हे त्याला अजून कळलेलं नसावं.

तुम्ही म्हणाल नमनालाच घडाभर तेल झालं, आता अजून किती वाचायचं आहे? हे सर्व लिहिण्याचं कारण पुढे या महाशयांनी कशा कोलांट्या उड्या मारल्या आणि आपण अस्तनितला निखारा आहोत, हे कसं सिद्ध केलं हे तुम्हाला कळणं सोपं जावं.

बोक्या सातबंडे डॉट कॉमवर सर्वप्रथम महेंद्रदादांचे लेख चोरून प्रकाशित केल्याचं उघडकीला आलं. तेव्हाच मी या माणसाचा शोध घ्यायला सुरूवात केली होती. काही दिवसांनी माझेही लेख तिथे प्रकशित होत आहेत असं दिसल्यावर मी नेहमीप्रमाणे तिथे प्रतिक्रिया दिली. पण साईटच्या मलकाला फरक अर्थातच पडणार नव्हता. चौर्यकर्म सुरूच राहीलं. उलट शेफारून त्याने गुगलच्या जाहिराती लावणंही सुरू केलं. आता मात्र या व्यक्तीचा शोध घेणं भाग होतं.

सर्वप्रथम या साईटचा मालक कोण आहे, हे शोधणं आवश्यक होतं. http://who.is/ या साईटवर सर्च मधे जर साईटचं नाव टाकलं तर साईटची सर्व माहिती मिळते. http://who.is/whois/bokyasatbande.com/ हा बोक्याचा साईट सर्च रिझल्ट होता. तुम्ही देखील या लिंकवर क्लिक करून ती माहिती पाहू शकता. वेबपेजवर स्क्रोल करत अगदी खाली पोहोचलं की जी माहिती मिळते ती अगदी तुटपुंजी होती. अभिषेक पाटीलला सर्च करताना मोबाईल नंबरही सापडला होता, जो मला दिसला नाही. मी त्या फोन नंबरवर फोन केला पण बोलणा-याने आपलं नाव संतोष पवार आहे व साईटशी त्याचा काही संबंध नाही असं सांगितलं. मी शोध सुरूच ठेवला. सोबतच ट्विटरवर त्याच्या साहित्यचोरीची बातमी ट्विट केली शिवाय बोक्याच्या ट्विटर आयडीवर bokyasatbande इथे ती पोहोचेल असंही पाहिलं. माझ्यासोबत ब-याच ब्लॉगर्सनी ही बातमी ट्विट केली पण स्वारी काही बधेना!

या साईटचा आधीचा लूक असा होता:बोक्या सातबंडे या दिलीप प्रभावळकरांच्या व्यक्तीरेखेसाठी लोकसत्तावर वापरलेले चित्र याने सरळ सरळ स्वत:च्या ब्लॉगचं ओळखचिन्ह बनवलं. पण चोरीची बातमी सर्वांना कळाली आहे, हे त्याला समजल्यावर त्याने साईटचा लूक बदलला.

आता पुढे मी जे काही लिहीणार आहे, त्यात तुम्हाला सर्च करायचा झाला तर अचूक शोधासाथी तुमच्या कीबोर्डचं कंट्रोल + एफ हे फंक्शन वापरा. ’शोधा’ असं लिहून मी जो शब्द दिलेला असेल, तो शब्द कंट्रोल + एफ च्या खिडकीत टाईप करा. म्हणजे तुमचं तुम्ही नक्की कराल की तुम्ही योग्य दिशेने शोध घेत आहात.

निरनिराळ्या प्रकारे गुगल सर्च करून मला जी माहिती मिळाली, त्यात बोक्या सातबंडेच्या ब-याच ब्लॉग्स व साईटलिंक्स मिळाल्या त्यांची यादी पुढे देत आहे:

पहिली लिंक - ज्यामुळे मला बोक्या सातबंडेचा ईमेल आयडी मिळाला - http://mazi-marathi1.blogspot.com/
(शोधा – bokyasatbande)

दुसरी लिंक - http://mazi-marathi1.blogspot.com/2010/05/abridged-summary-of-mazi_27.html
(शोधा - बोक्या सातबंडे) या लिंकवर तुम्ही कंट्रोल एफ चा वापर करून बोक्या सातबंडे हे दोन शब्द टाकून नुसतं एंटर मारत जा. तुम्हाला खूप मौलिक माहिती मिळेल. खास करून बझ्झकरांना.

तिसरी लिंक - http://mazi-marathi1.blogspot.com/2010/05/abridged-summary-of-mazi_27.html लिंक तीच आहे. पण यावेळेस(शोधा - pooja.mane86@gmail.com) तुम्हाला www.marathiguide.com ची लिंक मिळते का पहा बरं! मिळाली की या मराठी गाईच्या लिंकवर जा आणि पहा कोणती साईट उघडते. इथे तीन लिंक्सचा एकमेकांशी असलेला संबंध आपोआप स्पष्ट होतो.

चौथी लिंक – गुगल मधे bokyasatbande wordpress हे दोन शब्द टाकून शोध घ्या. सर्च तसाच ठेवा व कंट्रोल + एफ ने (शोधा – marathiguide). तुम्हाला http://whois.domaintools.com/marathiguide.com ही लिंक मिळेल.

इथे आपण जिथे सर्च सुरू करण्याआधी ज्या मोबाईल नंबरबद्द बोलत होतो तिथे आलो. तिथे तुम्हाला फोन नंबर +91.9923559908 मिळेल.

पाचवी लिंक - आता गुगल सर्च मधेच +91.9923559908 sanketsthal@gmail.com जिमेल आय. डी. टाका. हे असंच्या असं कॉपी पेस्ट करून टाका. (शोधा – Vijaysagar). http://www.whoisbucket.com/view/tphitp.in या लिंकवर जा आणि माऊसने स्क्रोल करत खाली या किंवा पुन्हा कंट्रोल + एफ चा वापर करत Pune हा शब्द शोधा. तुम्हाला पत्ता मिळेल.

आतापर्यंत तुम्हाला बोक्याचं नाव काय आहे कळलं असेलच. नसेल तर थोडं थांबा. मी तुम्हाला सुरूवातीला एवढं जे पाल्हाळ लावलं ते का, हे सांगायची आता वेळ आली आहे. मगाशी मी sanketsthal हे नाव आणि बोक्या सातबंडे यांचा संबंध कसा आहे हे सांगितलं आता पुढे जाऊ. गुगल सर्च मधे http://marathiebooks.com/ sanket sthal हे असंच्या असं कॉपी पेस्ट करून सर्च करा. सर्चमधे फार पर्याय मिळत नाहीत. सर्वात शेवटी www.istatz.com/www.marathiebooks.com या नावाची जी लिंक मिळते त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला पुन्हा तीच माहिती मिळेल जी बोक्या सातबंडेच्या साईटसाठी मिळाली होती. जर खात्री करून घ्यायची असेल, तर www.istatz.com/www.bokyasatbande.com या लिंकवर जाऊन पहा. दोन्ही सर्च जर जुळत असतील तर www.marathiebooks.com या साईटवर जा आणि posted by च्या ठिकाणी कुणाचं नाव आहे ते पहा. जर सर्च मिळाला नाही तर या इमेजवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या साईटचा स्क्रिनशॉट बघता येईल.नाव मिळालं; दोन्ही लिंक्स एकाच मालकाच्या आहेत हे कळलं. पण उगाच घाईघाईत कशाला एखाद्यावर आरोप करायचा म्हणून मी थोडा आणखी शोध घेतला.

ही लिंक - http://www.janabhaaratii.org.in/contests/marathi-website/details.php मला गुगल सर्च करताना सापडली. तुम्ही सर्वप्रथम तुमच्या स्वत:च्या ब्लॉगचं नाव टाकून तुमच्या ब्लॉगची लिंक दिसतेय का पहा बरं. इथेही तुम्ही कंट्रोल+एफ चा वापर करून स्वत:च्या ब्लॉगची लिंक खिडकीत टाईप करा आणि एंटर करा. जर नसेल मिळत तर हरकत नाही. आता याच कंट्रोल+एफ च्या खिडकीत जरा www.marathiasmita.com ही लिंक जशीच्या तशी टाईप करून बघता का?

काय मिळालं ते मला सांगू नका. साईटच्या मालकाचं नाव, ईमेल आयडी, नवा फोन नंबर तुमच्या समोर आहे. या सर्च मधे मिळालेला ईमेल आय. डी. पुन्हा कंट्रोल+एफ च्या खिडकीत टाका आणि एंटर करा. तुम्हाला आणखी एक साईट मिळेल. आता तुम्हाला जो जिमेल आय.डी. मिळालेला आहे तो कॉपी करा. तुमच्या गुगल बझ्झवर जा आणि सर्वात वर जिथे Search Buzz असं लिहिलेलं असतं तिथे पेस्ट करा व एंटर करा. बझ्झवरचं गुगल प्रोफाईल चेक करण्यासाठी जिथे पहिलं नाव दिसत आहे तिथे क्लिक करा. जे नवीन पान उघडेल तिथे Google profile लिहिलेलं सापडेल, त्यावर क्लिक करा. एक नवीन खिड़की उघडेल, ज्यात उजव्या बाजूला या व्यक्तीची वेबसाईट, ब्लॉग इ. इ. माहिती सापडेल.

अरे हो, तुम्हाला आणखी एक सांगायचं राहिलंच! मागे जो फोन नंबर मिळाला होता (आठवत नसेल तर http://who.is/whois/marathiebooks.com/ आणि http://who.is/whois/bokyasatbande.com/ या दोन्ही साईटसर्च वर स्क्रोल डाऊन करा आणि शोधा), तो फोन नंबर आणि http://www.janabhaaratii.org.in/contests/marathi-website/details.php इथे मिळालेल्या फोन नंबरचे शेवटचे चार क्रमांक एकच आहेत! आता हे दोन्ही फोन नंबर जर तुम्ही गुगल मधे वेगवेळे शोधलेत आणखी नवी माहिती मिळेल. मला त्यातला हा - http://www.plex86.org/computer_2/projects-needed.html सर्च जास्त आवडला.

तर, आता मी नाव जाहीर करतेय – बोक्या सातबंडे हे विजय कुडळचं दुसरं नाव आहे. विजय कुडळ (Vijay Kudal) हा एक हॅकर आहे. त्याची माहिती त्याच्या लिंक्ड इन प्रोफाईलवर आहे – http://in.linkedin.com/in/vijaykudalही आहे त्याच्या ऑर्कुट प्रोफाईलची लिंक - http://www.orkut.co.in/Main#Profile.aspx?uid=7590025591898816511हा अस्तनीतला निखारा मला मराठी सुपरस्टार या नावाने ईमेल पाठवतो. या लिंकवर क्लिक करा - Marathi Superstar Email

मग याची दुर्बुद्धी याला गप्प बसू देईना म्हणून स्वत:च्या ख-या नावाने मला ईमेल करतो. या लिंकवर क्लिक करा - Viajy Kudal Email Copy हे ईमेल तर तुम्ही वाचाच.

एवढं करून भागत नाही म्हणून तो मला रोहित खिरापते या नावाने फॉलो करतो. माझा लेख चोरून स्वत:च्या साईटवर प्रकाशित करतो. पूजा माने या नावाने बझ्झवर सर्वांना स्पॅम्स पाठवतो. पूजा माने याच आय.डी.चा वापर करून मराठी कट्टावर माझे लेख चोरून प्रकशित करतो.

सायबर गुन्हे अन्वेषण विभाग मुख्यालयात जाऊन मी याची रितसर तक्रार करून आले आहे. पोलिसात जाऊन तक्रार करण्याआधीसुद्धा मी याला समजावलं. ट्विटरवरही तो संदेश पाठवला. मध्यंतरी माझ्या फेसबुकवरून सर्वांना आय पॅड व आय फोनची आमंत्रणे जात होती. मी असे प्रकार करत नाही हे ज्यांना ठाऊक आहे, त्यांनी ती आमंत्रणे डिलीट करून टाकली पण काहीजणांनी ते आमंत्रण स्पॅम म्हणून नोंदवण्यासाठी पाऊल उचलले होते. याचा परिणाम अर्थातच माझ्या फेसबुक प्रोफाईलवर झाला असता. मी जेव्हा माझं फेसबुक अकाउंट तपासून पाहिलं तेव्हा मला माझं अकाऊंट हॅक झाल्याचा संशय आला. या प्रसंगाआधी काही दिवसांपूर्वी माझं जिमेल खातं हॅक झालं होतं. जिमेलच्या बाबतीत तोच प्रकार या १४ ऑगस्टला देखील घडला. माझ्या पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत अर्थातच या गोष्टींचा अंतर्भाव आहे.

पोलिस त्यांच काम करतीलच. पण मला सहकार्य हवं आहे तुमच्या सगळ्यांकडून. कृपा करून स्वत:ला अंडरएस्टीमेट करू नका. आमचं लेखन कुणी चोरावं इतकं चांगलं नाही असं म्हणू नका. तुमच्या लेखणीत काय ताकद आहे, हे वाचकांना जास्त माहित आहे. जी वेळ माझ्यावर आली, ती कुठल्याही ब्लॉगरवर येऊ शकते. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात, हे मला माहित आहे. पण जेव्हा कुणाचं लेखन चोरीला जातं आणि तो ब्लॉगरच लेखाचा मूळ लेखक आहे, हे माहित असतं, तेव्हा संघटीत होऊन चोर ब्लॉगरच्या त्या लिंकवर प्रतिक्रिया देत जा. रिपोर्ट अब्यूज वर क्लिक करत जा. ट्विटर आय.डी. असल्यास संदेश पाठवत जा. गुगल बझ्झसारख्या ठिकाणी विचित्र टोपण नावं धारण करणा-या व स्वत:ची खरी ओळख लपवणा-या प्रोफाईकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. शक्य असल्यास अशा प्रोफाईल्सना ब्लॉक करा. ज्यांना विचित्र टोपणनावं धारण करायला आवडतात त्यांनी आपल्या प्रोफाईलवर कृपया स्वत:चं खरं नाव देखील जाहिर करत जावं म्हणजे संशयाची सुई त्यांच्याकडे वळणार नाही.

एकीचं बळ काय करू शकतं, हे आपण मोठं होण्याआधी खूप खूप आधी शिकलो आहोत. जर संघटीत राहिलो तरच या महाजालावर तरू नाहीतर विजय कुडळसारखे बोके आपल्या ताटातला घास कसा पळवून नेतील हे कळणारही नाही.

शेवटी विजय कुडळला एकच संदेश द्यायचा आहे – तुला तू हॅकर असण्याचा गर्व आहे, मला मी स्किपट्रेसर असल्याचा अभिमान आहे.

1 comment:

  1. इथे प्रतिक्रिया देता येतील.

    ReplyDelete