Monday, July 19, 2010

धन्यवाद!

प्रतिक्रिया: 
ही पोस्ट मोगरा फुललाच्या सर्व वाचकांना समर्पित.

गेल्या महिन्याभरात मोगरा फुललावर एकही नवी पोस्ट प्रकाशित झालेली नसतानादेखील तुम्ही सर्वांनी मोगरा फुललाशी आपलं नातं कायम ठेवलंत. आपल्या सर्वांचे शतश: धन्यवाद!

खरंतर धन्यवाद हा शब्द आभार मानायला कमीच पडेल पण आत्तातरी मला त्यापेक्षा चांगला शब्द सापडत नाहीये आणि आभार तरी कसले मानायचे? मोगरा फुलला हा ब्लॉग मी सुरू केला तेव्हा तो माझा होता पण माझ्या अनुपस्थितीत त्याला वारंवार भेट देऊन तो फुलत ठेवलात तुम्ही सर्वांनी! आता हा ब्लॉग तुमचा झाला आहे. मी फक्त त्याची जपणूक करणार.

नवीन कथा व लेखांसह पुन्हा आपल्या भेटीला लवकरच येईन. माझ्या अनुपस्थितीतही मला पाठींबा देऊन, प्रतिक्रिया देऊन तुम्ही जो लोभ दाखवलात, तो कायम रहावा आणि वृद्धींगत व्हावा ही देवी सरस्वतीचरणी प्रार्थना!