Tuesday, May 25, 2010

कसाब का निकाह

प्रतिक्रिया: 
आता हे पहायला मिळालं तर नवल नाही.

सध्या टि.व्ही. चॅनलवाले काहीही करू शकतात. दोन स्वयंवरं त्यांनी पार पाडली. (त्यातलं एक सगाईवर येऊन थांबलं, ही गोष्ट निराळी) पण आपल्या चॅनलचा टी.आर.पी. वाढवण्यासाठी पारंपारिक संस्कार विधींचाही वापर करायला चॅनलवाले मागे पुढे बघत नाहीत. आता मानवता संदेश नि देश जोडो अभियानही त्यांना राबवता येईल. कसाबने तर त्यांना एक मोठी संधी दिलीय. त्याला हल्ली कसंसंच होतंय म्हणे.हंऽऽऽ! इतर काही नाही पण मरण्यापूर्वी कुणाचीही शेवटची इच्छा पूर्ण केली जावी म्हणतात. तेव्हा स्वयंवरवाल्यांनाही पूर्ण संधी आहे. ही न्यूज कव्हर करायला सगळेच न्यूजचॅनलवाले सरसावतील. म्हणजे कसं एका दगडात दोन पक्षी; निकाह झाला तरी आणि नाही झाला तरी...

... आणि असं फक्त भारतातच होऊ शकेल.