Tuesday, April 27, 2010

ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यात सामील होणा-या ब्लॉगर्सची यादी

प्रतिक्रिया: 
नमस्कार ब्लॉगर मित्रांनो,

आजची ही पोस्ट तुम्हाला समर्पित! कारण या पोस्टचं कारण तुम्ही आहात.

मराठी ब्लॉगर्सच्या स्नेह मेळाव्याचं मुंबई येथे आयोजन करण्याचा विचार जेव्हा पुढे आला, तेव्हा जेमतेम पन्नास ब्लॉगर्स नोंदणी करतील असं वाटलं होतं. पण आमचा हा अंदाज तुम्ही सपशेल चुकीचा ठरवलात. दि. २६ एप्रिल २०१०, दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या नोंदणीनुसार, ९ मे २०१० रोजी दादर, मुंबई येथे संपन्न होणा-या ब्लॉगर्स मेळाव्यासाठी तब्बल १०१ ब्लॉगर्स/वाचकांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे, म्हणजेच आमचा अंदाजापेक्षाही दुपटीने नावनोंदणी झालेली आहे. ही गोष्ट अभिमानास्पद तर वाटतेच आहे पण त्यासोबत जबाबदारीचं ओझंही आता जाणवायला लागलंय. इतक्या प्रचंड संख्येने नावनोंदणी केल्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी ’धन्यवाद’ हा शब्द कधीही कमीच पडेल. मेळाव्याआधीच स्नेहबंध दृढ होऊ लागतील असं वाटलं नव्हतं.

काही ब्लॉगर्स/वाचकांना आपल्या नाव नोंदणीबाबत संदेह होता. त्यांच्यासाठी आम्ही आतापर्यंत उपलब्ध असलेली नाव नोंदणी जाहिर करत आहोत. आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की प्रत्येकाच्या ईमेल आयडीवर दिवसातून किमान एक तरी स्पॅम ईमेल येतंच. ही यादी त्या स्पॅम ईमेलचं निमित्त ठरू नये म्हणून कुठल्याही ब्लॉगर/वाचकाचा ईमेल आयडी व फोन क्रमांक प्रसिद्ध न करता, केवळ ब्लॉगर/वाचकाचे नाव ब्लॉगची माहिती प्रसिद्ध करत आहोत. आपलं नाव या यादीत नसल्यास कृपया mogaraafulalaa@gmail.com या ईमेलवर आपल तपशील कळवावा. फोन क्रमांक नाही दिला तरी चालेल. ईमेल आयडी मात्र नेहमीच्या वापरातीलच हवा आहे.

ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यात सामील होणा-या ब्लॉगर्सची यादी
या यादीव्यतिरिक्त ज्यांचं नाव शेवटचं नोंदवलं गेलं आहे, त्यांच्या ब्लॉगचं नाव आहे. ’माझ्या मराठीसाठी मी मराठी’. ज्या ब्लॉगर्स/वाचकांनी अजून नाव नोंदवलं नसेल, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा निवेदन: नाव नोंदणी अजूनही सुरू आहे. अंतिम दिनांक आहे ४ मे २०१०. कृपया नोंद घ्यावी, ४ मे २०१० रोजी सायंकाळी ५ वाजता नावनोंदणी बंद करण्यात येईल. मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व नाव नोंदणी करण्यासाठी येथे टिचकी द्या. धन्यवाद. कळावे, आपले ब्लॉगर मित्र, रोहन चौधरी, महेंद्र कुलकर्णी आणि कांचन कराई

21 comments:

 1. १०१??? एन्ट्रीलाच सेंच्युरी !!!! जब्बरदस्त !!! अभिनंदन... !!

  ReplyDelete
 2. लय भारी!!! कांचन... मस्तच ना... :)

  ReplyDelete
 3. धन्यवाद हेरंब.
  मला या गोष्टीचं कौतुक वाटतंय की अजूनही नोंदणी होतेच आहे.

  रोहन,
  मस्तच! कुठे आपण पन्नासचा आकडा डोळ्यासमोर ठेवून विचार करत होतो आणि...

  ReplyDelete
 4. अरे व्वा... क्या बात है! अभिनंदन :-)

  ReplyDelete
 5. धन्यवाद सौरभ. मला तर खूप आनंद झाला आहे.

  ReplyDelete
 6. कॉन्ग्रॅट्स, तुझ्या प्रयत्नांना बरंच यश लाभलंय... सोहळासुद्धा असाच यशस्वी करण्याचा प्रयत्न करा... शुभेच्छा!

  ReplyDelete
 7. कांचनजी,

  अगदी खरे सांगायचे तर ह्या स्नेह मेळाव्याचे सुतोवाचं मी मुंबईत असतांना मी, महेंद्रजी व सलील जी एकत्र भेटलो होतो तेव्हाच झाले होते व मी ह्या मेळाव्याला यायचेच असे मनोमन ठरवून पहील्या पहील्यानेच येतो म्हणून कळवूनही टाकले होते........पण....!
  पण जसा दिवस जवळ येऊ लागला माझे येणे धूसर होत चालले ! ... असेच एक अपरिहार्य कारण .....आता तर मी येऊ शकत नाही हे नक्की झाले व म्हणून नाईलाजाने आपणाल कळवणे भाग पडत आहे.
  असे असले तरी माझे लक्ष तेथील होणाऱ्या मेळाव्या कडे लागलेले असणार ह्यात शंकाच नाही.तेव्हा जास्तीत जास्त माहीती + फोटो लवकरात लवकर उपलब्ध कराल अशी खात्री वाटते.

  ReplyDelete
 8. कांचन

  मी नोंदणी केली तेंव्हा माझा ब्लॉग ब्लॉगरवर होता. नंतर मी तो वर्डप्रेसवर हलवला. त्यामुळं आता माझ्या ब्लॉगचा url http://ramalkhuna.wwordpress.com असा आहे. नोंदणीच्या यादीत बदल करता येणं शक्य आहे का?

  Sorry, त्रास देतोय.

  - विवेक.

  ReplyDelete
 9. धन्यवाद विशाल,
  सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी असल्यावर सोहळा यशस्वी होणारच.

  पेठेकाका,
  आपलं काम तितकंच महत्त्वाचं असल्याशिवाय आपण येणं रद्द करणार नाही, हे माहित आहे. आपलं भेटणं आता थोडं लांबलं पण हरकत नाही. मेळाव्याचे फोटो आणि वृत्तांत तुम्हाला मिळेलच.

  ReplyDelete
 10. विवेक,
  त्रास कसला? तुमच्या ब्लॉगचा पत्ता मी बदलून घेते. काळजी करू नका.

  ReplyDelete
 11. Abhinandan,Mazza blog nahi pan mi wachk aahe,Mazya shubecha

  ReplyDelete
 12. धन्यवाद विवेकजी,
  आपण नाव नोंदवलेलं आहे का? जर येणं शक्य असल्यास नावनोंदणी अवश्य करा.

  ReplyDelete
 13. इथे नोंदणी केलेल्यांपैकी काही खोटी नाव आणि पत्ते असण्याची शक्यता आहे....
  एक उदाहरण सांगतो..मिपावर चुचु नावाने लिहिणार्‍या पर्नल नेने-मराठे....ह्यांची स्वत:ची जालनिशी नाहीये...त्यंनी स्वत: नाव नोंदवलेले नाहीये...कारण त्या परदेशात असतात..तरीही त्यांच्या नावावर कुणी तरी जाणीवपूर्वक,खोटेपणा करून त्यांचे नाव आणि जालनिशीचा पत्ता(तो ही खोटा आहे) नोंदवलाय...तेव्हा कांचन खरा आकडा आणि खर्‍या व्यक्ती किती हे त्या दिवशीच कळेल.
  मी चुचुताईंना ह्याबद्दल विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की...हा कुणाचा तरी फाजिलपणा आहे.

  ReplyDelete
 14. काका धन्यवाद. तुमचं सर्व लक्ष मेळाव्याच्या तयारीकडे लागून आहे हे कळतं मला. असं काही तरी होईल याचा विचार आधीच करून ठेवला होता. काळजी करू नका. अशांचा बंदोबस्त करू आपण.

  ReplyDelete
 15. कांचन मी माझ्याब्ळोग चा पत्ता बदलला आहे.

  http://www.lekhaankan.co.cc/

  कृपया तो अपडेट करा  प्रथमेश

  ReplyDelete
 16. कांचनताय एकदम सही..खूप खूप धावपळ करतेस तू आणि तुझ्या प्रयत्नाना यश ही मिळाल..एवढा उदंड प्रतिसाद..अभिनंदन कांचन..मनापासून अभिनंदन

  ReplyDelete
 17. प्रथमेश,
  आपल्या ब्लॉगचा पत्ता अद्ययावत केला आहे.

  सुहास,
  धन्यवाद! आता ब्लॉगर्स मेळाव्याचा दिवस कधी उजाडतो, त्याकडे डोळे लागले आहेत.

  ReplyDelete
 18. कांचन

  मेळाव्याच्या निमित्तानं गेल्या दोन महिन्यांत ब्लॉग्जना दिलेल्या भेटी आणि झालेला संवाद यांच्या आठवणी आल्या आणि लेख लिहिल्यावाचून राहवेना, म्हणून आत्ताच ही पोस्ट लिहिलीये.
  http://wp.me/pTqlJ-Q

  तुला वेळ झाला तर जरूर वाच. त्यात तुम्हां सर्वांचं कार्यक्रमाआधीच आगाऊ (म्हणजे advance, दुसर्‍या अर्थानं नव्हे!) अभिनंदन केलं आहे.

  - विवेक.

  ReplyDelete
 19. विवेक, पोस्ट वाचली.


  ब्लॉग आणि ब्लॉगिंगचा तुझा प्रवास खूप रंजक आहे. मी सुरूवातीला वर्डप्रेसवर ब्लॉग बनवला होता. एक दोनच लेख होते पण त्यानंतर त्यात दोन वर्षांचा खंड पडला आणि मग मला वर्डप्रेस समजेनाच. मग मी ब्लॉगस्पॉटवर ब्लॉग बनवला. तो ब्लॉग बनवताना आपण मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा आयोजित करण्यापर्यंत मजल मारू असं वाटलं नव्हतं. या ब्लॉगिंगने मला बरंच काही शिकवलं आणि बरंच काही दिलं. हे एक व्यसन आहे हे मात्र खरं. शिवाय इतर कुठलंही व्यसन लावून घेण्यापेक्षा हे व्यसन चांगलंच, नाही का?

  ReplyDelete
 20. मस्त फोटो आहेत. धन्यवाद. त्यातल्या काही फोटोंचा उपयोग माझ्या ब्लॉगवर करणार आहे. संमती गृहीत धरली आहे.

  ReplyDelete
 21. काका, केव्हाही फोटो घेऊ शकता.

  ReplyDelete