Sunday, March 28, 2010

मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई

प्रतिक्रिया: 
मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई


ब्लॉगर दोस्तांनो,

पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्यानंतर दुसरा ब्लॉगर मेळावा तुमच्या, आमच्या, सर्वांच्या - आपली मुंबई येथे आयोजित होतो आहे. रविवार, दिनांक ९ मे २०१० रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा ब्लॉगर मेळावा संपन्न होईल. एकमेकांशी ओळख करून घेऊन स्नेहबंध आणखी घट्ट करावे या उद्देशाने हा ब्लॉगर मेळावा आयोजित होतो आहे. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत तर ज्यांना मराठी ब्लॉग सुरू करायची इच्छा आहे अशा भावी मराठी ब्लॉगर्सचे व ब्लॉग वाचकांचेही या मेळाव्यात स्वागत आहे.

मुंबईच्या कानाकोपर्‍यातून व मुंबईबाहेरूनही ब्लॉगर्स/वाचक उपस्थित राहतील असे गृहीत धरून भेटीसाठी दादर, मुंबई हे मध्यवर्ती ठिकाण निवडले आहे. आपली उपस्थिती मोठ्या संख्येने नोंदवून आपण हा ब्लॉगर मेळावादेखील यशस्वी कराल याची खात्री आहे.

आपल्या उपस्थिती संख्येनुसारच भेटीचे नेमके स्थळ निश्चित करता येईल. आपल्या उपस्थितीची संमती म्हणून इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनी या पोस्टखालील प्रतिक्रियांमधे आपले नाव, ब्लॉगचे नाव (वाचक अथवा भावी ब्लॉगर असल्यास ब्लॉगचे नाव आवश्यक नाही), संपर्कासाठी ईमेल पत्ता द्यावा. कृपया नोंद घ्यावी: नाव नोंदणीची अंतिम तारिख ४ मे २०१० (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)आहे.

या नाव नोंदणीसाठी एक गुगल डॉकही तयार करण्यात आले आहे. येथेदेखील नाव नोंदणी करता येईल.मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई (सायंकाळी ५ ते ८ पर्यंत)

नाव नोंदणीचा फॉर्म दृश्यमान होणार नाही कारण आपण नाव नोंदणीची मुदत संपल्यानंतर या पानाला भेट देत आहात. आपले नाव मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यासाठी नोंदवले जाऊ शकत नाही याबद्दल दिलगीर आहोत.

या ब्लॉगर्स मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त मराठी ब्लॉगर्स व वाचकांना मिळावी म्हणून खाली दिलेली विजेट कॉपी पेस्ट करून आपल्या ब्लॉगवर लावा.वाचक अथवा भावी ब्लॉगर (http://mogaraafulalaa.blogspot.com/2010/03/blog-post_29.html) ही लिंक आपल्या ईमेलमधून आपल्या स्नेह्यांना पाठवू शकतील.

आपल्या शंका, सूचना व सल्ले खालील ईमेल पत्त्यावर अवश्य पाठवा:

रोहन चौधरी - chaudhari.rohan@gmail.com
महेंद्र कुलकर्णी - kbmahendra@gmail.com
कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com

धन्यवाद,
आपले ब्लॉगर मित्र,
रोहन चौधरी, महेंद्र कुलकर्णीकांचन कराई

88 comments:

 1. आपल्या या मेळाव्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा ! माझ्या कुंडलीत आपली भेट नाही असे मला वाटते. मी १७-४-२०१० ला NY-USA ला जात आहे.मेळाव्यास हजर राहू शकत नाही. क्षमस्व!
  savadhan.wordpress.com

  ReplyDelete
 2. शुभेच्छा. मी येण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
  -पंकज

  ReplyDelete
 3. मुंबईतच असल्याने नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन. सध्यातरी ’हो’च आहे. बाकी तेव्हाच्या कार्यस्थितीवर अवलंबून आहे.

  ReplyDelete
 4. प्रयत्न नक्की करेल, मेळाव्यासाठी शुभेच्छा!

  ReplyDelete
 5. गूगल डॉकचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय...
  आल्हाद महाबळ
  alhadmahabal.wordpress.com
  9920075126

  येणार.

  ReplyDelete
 6. मराठी ब्लॉगर मेळाव्यास मनःपूर्वक शुभेच्छा !!

  ReplyDelete
 7. उत्तम सुरुवात कांचन ... :) सर्वाना भेटण्यास उत्सुक आहे... :)

  ReplyDelete
 8. सगळ्यांना भेटायला नक्कीच आवडेल..आणि नेमकं मी तेव्हा मुंबईत आहे तेव्हा नक्कीच येईन....काही मदत हवी असल्यास मेल करा..

  ReplyDelete
 9. मेळाव्याला शुभेच्छा! पुण्याहून कोण कोण येतंय? पोटापाण्याची काही सोय आहे का? ;)

  ReplyDelete
 10. माझी जागा धरून ठेवा, रुमाल टाकून ठेवला तरी चालेल

  ReplyDelete
 11. hi KFK, Count me in ...

  and nice stuff....All the best...

  For any help please feel free to contact 09769987884

  ReplyDelete
 12. विजेट जोडले आहे आमच्या ब्लॉगवर ...

  http://blogsohamcha.blogspot.com/

  कळावे... लोभ असावा..

  :- सोहम

  ReplyDelete
 13. Mi jarur yenyacha prayatna karen.

  ReplyDelete
 14. आपल्या सर्वांची उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. आता नवीन फॉर्म पोस्टमधे जोडला आहे. तिथे नावनोंदणी केल्यास आमच्याकडे आपला तपशील राहील. अल्पोपहाराबद्दल सध्या विचार सुरू आहेत. नक्की काय ते लवकरच कळवू. धन्यवाद!

  ReplyDelete
 15. व्वा! खूपच छान. असे मेळावे आपापल्या गावातून संपन्न करण्यासाठी पुढाकार घ्या. ही चळवळ जिकडॆ तिकडे फैअलावयाला हवी. माझ्या सुभेच्छा ! अर्थातच मी येतो आहेच !!

  ReplyDelete
 16. हैत्तीऽऽच्या... मागच्या वेळी पुण्यात होता, आता मुंबईत... किती लांब हाये ते.. असो.. माझ्याही मेळाव्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

  मी या मेळाव्याची सगळीकडे जाहिरात करण्यास सुरुवात केलेली आहे.. ब्लॉगवरही विझेट जोडलंय!

  - विशल्या!

  ReplyDelete
 17. malahi khup aavdel aaplya saglyana bhetayla..
  parantu thodi far mahiti kalali aasati tar far bar zal aasat...
  jamlyas kalavalat tar bar hoil

  aaplich maitrin
  VIDYA SHINDE

  ReplyDelete
 18. धन्यवाद काका,
  तुम्ही बरोबर म्हणालात. आता ब्लॉगर्सनी ही चळवळ सुरू ठेवायला हवी. नक्की या.

  विशल्या,
  तू आलास तर खूप बरं वाटेल. प्रयत्न कर येण्याचा. विजेट जोडल्यामुळे तुझ्या ब्लॉगवरून आता ब-याच जणांना माहिती कळत असेल.

  विद्याजी,
  आपण दाखवलेल्या उत्सुकतेसाठी आभार!
  या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे एकमेकांना भेटणे, गप्पागोष्टी, या गप्पागोष्टींमधेच प्रस्थापित ब्लॉगर्स, नविन ब्लॉगर्स व वाचक यांना एकमेकांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेता येईल. ब्लॉग बनविण्यासाठी आवश्यक असलेली काही तांत्रिक माहितीही मिळेल. आपण नुसत्या ब्लॉगवाचक असलात तरी हरकत नाही. आपलंही या मेळाव्यात स्वागत आहे. मेळावा दादर मुंबई येथेच असेल मात्र प्रत्यक्ष हजर राहू शकणा-या ससदस्यांचा संख्येचा अंदाज घेऊनच मेळाव्यासाठी जागा निश्चित करता येईल. आपले नाव अवश्य नोंदवा.

  ReplyDelete
 19. उपक्रम फारच चांगला आहे. www.sobati-vileparle.blogspot.com हा ज्येष्ठ नागरिक संघ, विले पार्ले या संस्थेचा ब्लॉग आहे व त्यावर मी व माझे सहकारी मराठीत लिखाण करतो. मी व शक्य झाल्यास माझे एक दोन सहकारी आपल्या मेळाव्याला उपस्थित राहू. पुढील तपशील माझ्या खालील इ मेलवर पाठवावा. मुंबईत मेळावा होत आहे. त्यामुळे मुंबईकराना उपस्थित रहाणे सोयीचे होईल.

  धन्यवाद.

  म.ना. काळे
  ए-मैल: mnkale1935@gmail.com

  ReplyDelete
 20. काळेसाहेब (काका म्हटलं तर चालेल का?),
  धन्यवाद, आपली नाव नोंदणी मिळाली. कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला पाठवण्यात येईल.

  ReplyDelete
 21. मी ब्लॉगर्स मेळाव्यासाठी नाव नोंदवलंय पण या वेळी येता येण्याची शक्यता कमी आहे. पण पुढच्या वेळी यायला नक्की आवडेल.

  विवेक.

  ReplyDelete
 22. येण्याचा प्रयत्न करा.

  ReplyDelete
 23. आपण सर्वांनी हॉलसाठी व अल्पोपहार साठी पैसे काढुया. छबिलदास समोरुन बटाटॆवडॆ आणायला हरकत नाही.

  ReplyDelete
 24. आणि हो, हे वर्तमानपत्रात द्यायला हवे. कारण ब्लॉगविश्वाबद्दल ज्याना उत्सुकता आहे ते येथे येवु शकतील.

  ReplyDelete
 25. मुंबई ला येण्याचा आवश्यक प्रयत्न करेन . कौन कहता है आसमान में छेद हो नहीं सकता, एक पत्थर तो तबियत से उच्चालो यारों ."

  ReplyDelete
 26. हरेकृष्णजी,

  अल्पोपहारासाठी सर्वांकडून पैसे घेणं आम्हाला योग्य वाटलं नाही. अजून अल्पोपहार आणि वर्तमानपत्रातील प्रसिद्धी यावर चर्चा सुरू आहे.

  ReplyDelete
 27. ठणठणपाळ,
  आपण आलात तर आनंदच होईल. आपलं स्वागत आहे.

  ReplyDelete
 28. I will get something from Dayaram Damodar

  ReplyDelete
 29. मराठी ब्लॉगर मेळाव्यास मनःपूर्वक शुभेच्छा !
  सर्वाना भेटण्यास उत्सुक आहे
  मी येणार

  ReplyDelete
 30. मराठी ब्लॉगर मेळाव्यास मनःपूर्वक शुभेच्छा !!

  ReplyDelete
 31. मी नविन आहे ब्लॉग विश्वात .. माझी कोणाशीच ओळख नाही ... मी पण येऊ का ? :) माझं पेंटिंग वर्कशॉप चुकवता आलं पाहिजे फक्त :)

  -( द न्यु) टारझन

  ReplyDelete
 32. हरेकृष्णजी,
  खाण्यापिण्याची सोय आयत्या वेळीही करता येईल. काही आणायचं असेल, तर तुम्हाला सांगूच.

  नागेशजी,
  आपली नावनोंदणी झाली आहे. आम्हीही सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत. धन्यवाद.

  स्वप्निल,
  धन्यवाद. आपण याल अशी अपेक्षा आहे.

  टारझन,
  विचारताय काय? अहो तुमचं स्वागत आहे. ह्या पोस्टमधे फॉर्म आहेच. तो भरून पाठवून द्या.

  ReplyDelete
 33. मराठी ब्लॊगर्सच्या स्नेह मेळाव्यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा...!!!

  ReplyDelete
 34. धन्यवाद बिरूटे साहेब. आपल्या येण्याची अपेक्षा आहे.

  ReplyDelete
 35. ashich upasthiti vadhat javo ani Shivaji park chi garaj pado ashich shubhechcha..

  ReplyDelete
 36. चांगला प्रतिसाद मिळत आहे हे पाहून खूप आनंद झाला. मला यायलाच पाहिजे. बरीच मंडळी दुरून येणार असल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचे तेवढे पहा. त्यासाठी निधी गोळा करण्यात मला तरी कांही गैर वाटत नाही. एकादा प्रायोजक मिळाला तर फारच छान.

  ReplyDelete
 37. marathi bloggers pudhe yevun ase kahi karat aahet he pahun far chan vatale.
  me suddha www.marathisuchi.com var hi post takali aahe.
  http://www.marathisuchi.com/upcoming.php

  ReplyDelete
 38. नचिकेत,
  शुभेच्छांसाठी धन्यवाद! ब्लॉगर्स मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तर आम्हालाही खूप बरं वाटेल.

  आनंद काका,
  तुम्ही नोंदणी केलीत हे मी पाहिलं. खाण्यापिण्याची व इतर मुलभूत गोष्टींची काळजी आम्ही घेणार आहोत. प्रायोजकदेखील शोधत आहोत.

  मराठीसूची,
  आपल्या संकेतस्थळावर माझ्या ब्लॉगचा दुवा दिलात, हे पाहिलं. धन्यवाद. आपले सहकार्य मिळाले. आता आपण ब्लॉग मेळाव्यास उपस्थितही रहाल, अशी अपेक्षा आहे.

  ReplyDelete
 39. मराठी ब्लॉगर मेळाव्यास मनःपूर्वक शुभेच्छा !!

  आपला मेळावा मुंबईतच आहे त्यामुळे येण्याचा नक्की प्रयन्त करू

  "मी डोंबिवली" कर.
  ऑर्कुट व इतर इंटरनेट वरून मराठीचा प्रचार आणि प्रसार हे आपले काम

  ठिकाण / काळ / वेळ कळावी
  आपलाच
  शुभेच्छुक
  दत्तप्रसाद बेंद्रे

  ReplyDelete
 40. दत्तप्रसादजी,
  आपले नाव उपस्थितांच्या यादित समाविष्ट केले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला ईमेलद्वारे मिळेल.

  ReplyDelete
 41. कांचन, कार्यक्रमाची रुपरेषा ठरली आहे का? असल्यास मला मेल करशील का?
  प्रायोजकत्व आणि तत्सम मदतीसाठी स्टारमाझाच्या प्रसन्न जोशीची काही मदत घेता आली तर पाहा.

  ReplyDelete
 42. पंकज, तुला ईमेल केलं आहे.

  ReplyDelete
 43. mala hi meet tari chukavayachi nahi............ agrah karat raha ... lol.......... bhetuya sarva...... details mail karata yetil ka?

  ReplyDelete
 44. I would like to attend the event as a blog reader. I am not able to register thru' the form given as blog name/link fields are mandetory.

  ReplyDelete
 45. प्रथम तुमचे मनापासुन आभार,
  तुम्ही सर्व मराठी ब्लोग सभासदाच्या
  एकत्र मेळावा अयोजीत केला.
  मराठी भाषा लोप होतीय असे म्हणणारे लोकांना
  या मेळाव्यामुळे योग्य उत्तर मिळेल.
  आपण एकत्र येउन आपली मराठी भाषा,संक्रुती पुढे
  नेउन आपले श्रेष्टत्व प्रस्थापित करु हिच अपेक्षा
  पंरतु या शिवबाला
  बाजी सारखी लढय्येगिरी
  तानाजी सारखी स्वामीनिष्ठा
  अन्याय दिसला की पेटुन उठणारा
  तुमच्या सारखा मावळा पाहिजे

  गरज इतिहासाची वेध विज्ञानाचा
  http://garajetihasachi.blogspot.com/

  ReplyDelete
 46. अखिल,
  कार्यक्रमाची रुपरेषा सर्वांना ईमेलने पाठवता यावी म्हणूनच ही नावनोंदणीमधे ईमेलचा पर्याय दिला आहे. एकदा का रूपरेषा तयार झाली की ती आम्ही ईमेलने पाठवूच.

  Ap____M ,
  सर्वांसाठी भ्रमणध्वनी क्रमांक सोडून इतर सर्व पर्याय अनिवार्य आहेत. ब्लॉगर्सनी आपल्या ब्लॉगचे नाव व लिंक दिल्याशिवाय त्यांच्या उपस्थितीची आम्हाला कल्पना येणार नाही. ज्यांचा ब्लॉग नाही (किंवा जे वाचक आहेत) त्यांनी ब्लॉगचे नाव व लिंक या दोन पर्यांयामधे वाचक असे नमूद करावे. आपला कोड्यांची दुनिया नावाचा ब्लॉग आहे तेव्हा आपण एक ब्लॉगर म्हणून उप़स्थित रहाणार आहात, असे गृहीत धरते.

  प्रशांतजी,
  मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि संवर्धनासाठी हा आमचा खारीचा वाटा आहे. आपणही त्याला हातभार लावाल अशी अपेक्षा आहे.

  ReplyDelete
 47. कांचन ताई , मराठी ब्लॉगरच्या मेळाव्यास उपस्थित रहाण्यासाठीचा Widget मी माज्या ब्लोग्वर चिकटविला आहे .

  परंतु मी परीक्षा असल्याने येऊ शकणार नाही त्याबद्दल माफी , तसेच मी माज्य पद्धतीने जमेल तेवढी publicity करीत आहे

  ReplyDelete
 48. धन्यवाद प्रितेश. तुझी परिक्षा जास्त महत्त्वाची आहे, तू व्यवस्थित अभ्यास कर आणि चांगल्या मार्कांनी पास हो. ब्लॉगर्स मेळाव्याचा वृत्तांत तुला वाचायला नक्की मिळेल. तुला परिक्षेत उदंड यश लाभो ही शुभेच्छा!

  ReplyDelete
 49. ॥ श्री स्वामी समर्थ॥

  नमस्कार,

  नुकतेच या मेळावाबद्दल श्री. विशाल रणदिवे यांच्याकडून कळले व त्यांनीच दुवा दिला. दुव्यावरील लेखात नावनोंदणीची तारीख ७ एप्रिल असल्याचे वाचले. आज तारीख ११ एप्रिल.

  ज्योतिषशास्त्रातील कुंडलीत शनी लग्नस्थानी बलवान असेल तर सर्व गोष्टी उशीरा घडतात/समजतात या शास्त्रवचनाची ही रोकडी प्रचिती. असो. :)

  मेळाव्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा. मराठीवर प्रेम करणार्‍या सर्व प्रतिभावान लेखक,कवींना आमच्या हार्दिक शुभेच्छा.

  आम्ही या दिंडीत आपल्या बरोबर आहोत. मेळाव्याला उपस्थित असलो तरी, नसलो तरीही.

  आपला,
  (शुभचिंतक) धोंडोपंत

  ReplyDelete
 50. धन्यवाद. सर्वात आधी जागेची व्यवस्था करणे भाग होते, त्यामुळे नावनोंदणीसाठी मर्यादीत कालावधी निश्चित केला होता. प्रशस्त जागा मिळाल्यावर मग नाव नोंदणीची मुदत वाढवून ४ मे २०१० अशी केली. या मेळाव्यास उपस्थित रहाण्याचा शक्यतो प्रयत्न करा. आम्हाला आपल्याला भेटण्याची उत्सुकता आहे. विशाल रणदिवे यांनी आपल्या ब्लॉगबद्दल सांगितले, त्याच्याही आधी एक दोन वेळा आपला ब्लॉग वाचला होता.

  ReplyDelete
 51. सांगलीहून येण तस अवघडच वाटतंय
  तरीही येण्याचा प्रयत्न करेन . .
  या मेळाव्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा !

  http://www.marathiscraps123.com

  ReplyDelete
 52. धन्यवाद. आपण आलात तर एक भेट होऊन जाईल. येण्याचा प्रयत्न करा. मराठी स्क्रॅप्ससाठी शुभेच्छा!

  ReplyDelete
 53. I will attend. But the registration date is already over!

  Interesting event it will be.

  Vivek Patwardhan

  ReplyDelete
 54. विवेकजी, तुमची नाव नोंदणी झाली आहे. अंतिम तारिख वाढवून ४ मे करण्यात आली होती, त्यामुळे तुमची नोंदणीसाठी काहीच अडचण आली नाही. अवश्य या. आपली प्रतिक्षा राहिल. धन्यवाद.

  ReplyDelete
 55. मेळाव्यास येण्याचा प्रयत्न करेन..

  अनेक शुभकामना..

  तात्या.

  ReplyDelete
 56. धन्यवाद तात्या. आपली प्रतिक्षा राहील.

  ReplyDelete
 57. नमस्कार कांचन,

  मी मेळाव्याला नक्कीच उपस्थित राहीन.

  आशा आहे त्यावेळी माझ्या मराठी वाचकांसाठीच्या उपक्रमाबद्दल (आपल्याला त्याची माहिती दिली आहे मी ) देखील आपल्याला चर्चा करता येईल थेट.

  नक्कीच येईन मी.

  मला वाटतं माझं नाव नोंदवले आहे मी ...कृपया एकदा खात्री करुन घ्या.

  ReplyDelete
 58. Khup intresting event honaar ashi khatri aahe.. eka utsahi goup cha utsah share karayla naaki yenaar.
  Navnavin upakramanchi nandi ya melavaytun hovo hich saditcha

  ReplyDelete
 59. प्रथमेश,

  तुझं नाव ३० मार्चला रात्री ९:१८ ला नोंदवलं गेलेले आहे. मेळाव्यामधे तू आपल्या ब्लॉगची माहिती इतरांना देऊ शकतोस.

  निवेदिता,
  हा मेळावा खूप रंगतदार व्हावा अशीच सर्वांची इच्छा आहे. या मेळाव्यानंतर काही आणखी चांगली घडामोडी घडण्याची अपेक्षाही सर्वांना आहे. आपलं या मेळाव्यात स्वागत आहे.

  ReplyDelete
 60. KANCHAN TAI MI NAGPUR VARUN NAKKI YET AAHE...
  MAJHA BLOG www.koyotevishwas.co.cc
  pan majhe naav nondani jhalay ki naahi te kalale tar bar hoil...
  majha e-mail address: vishwasamr@gmail.com
  tumhi marathi sathi yedhe prayatna ghet aahe he pahun chan vatle...

  ReplyDelete
 61. विश्वास, तुझं नाव मी स्वत: नोंदवते आहे. काळजी करू नकोस.

  ReplyDelete
 62. Vishwas, मेळाव्याला भेटूच.

  ReplyDelete
 63. कांचन ताई ज्यांची ज्यांची नाव नोंदणी झाली आहे त्यांना एक confirmation mail पाठवायची सुविधा केली तर नाव नोंदणी बद्दल काही शंकाच राहणार नाही अर्थात मलाही माझी नाव नोंदणी झाली आहे का नाही ह्याची शंका आहे म्हणून हे सुचवलं ..
  बाकी मेळावा तर झक्कास होणार ह्यात काहीच वाद नाही
  धन्यवाद.

  ReplyDelete
 64. सागर, तुझी नाव नोंदणी १२ एप्रिलला दुपारी साडेतीनच्या दरम्यान झालेली आहे. सर्वांना ईमेल पाठवायचे आहे, पण ते अंतिम तारिख (मुदत) संपल्यानंतर पाठवायचे आहे. कन्फर्मेशन म्हणजे काय पाठवायचं विचार करून ठेवला आहे.

  ReplyDelete
 65. धन्यवाद कांचन ताई...

  ReplyDelete
 66. Aajach kalal anuja kadun nahitar mahitach navhat.
  taarikh waadhawalyabaddal thank u. Nakki yenar.
  Venue aani wel kaay aahe?

  ReplyDelete
 67. सोनाली,
  मेळाव्याची इतर माहीती http://www.mogaraafulalaa.com/2010/04/blog-post_06.html या दुव्यावर आहे. तुमची नाव नोंदणी झालेली पाहिली. दादरच्या दादर सार्वजनिक वाचनलयाच्या तिस-या मजल्यावरील सभागृहात मेळावा संपन्न होणार आहे. वेळ कदाचित पाच ते आठ अशी ठेवावी लागेल.

  ReplyDelete
 68. प्रिय रोहन, महेंद्र आणि कांचन
  सुमारे १५ ते २० दिवसांन पुर्वी मोगरा फ़ुलला येथे भेट देउन ९ मे २०१० ला होणार्‍या मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा साठी नोंदणी केली आहे. पण आपण माझे नाव नोंदवुन घेतलं आहे का या बद्दल कळत नाही. माझ्या मेल आयडीवर कळवाल का?
  या १ मेला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५० वर्ष पुर्ण होणार आहेत याच औचित्य या प्रसंगी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे . अर्थात हे आपल्याला माहित आहे याची मला कल्पना आहे. तरीही सांगावस वाटल म्हणून उल्लेख केला ईतकच
  जय महाराष्ट्र जय मराठी
  कळावे
  मैत्रेय१९६४
  व्दारा देवेंद्र मराठे , मोबाईल ९८६९३९८३६३
  मेल आयडी maitrey1964@gmail.com
  ब्लॉगचा पत्ता http://maitrey1964.blogspot.com

  ReplyDelete
 69. Marathi blog merava fakta marathi blogger saathi cha aahe ka. jar Marathi blogger pan English blogging site asel tar..

  ReplyDelete
 70. मैत्रेय,
  आपल्या नाव नोंदणीचा तपशील आपल्याला कळवला आहे.

  रविंद्रजी,
  या मेळाव्यात ज्या मराठी भाषिक लोकांचे इंग्रजी ब्लॉग्स आहेत व जे मराठी ब्लॉग सुरू करू इच्छितात, तेही सामील होऊ शकतात. वाचक म्हणूनही सामील होता येईल.

  ReplyDelete
 71. माझी नाव नोंदणी जाली आहे का?
  नाव- महेश सावळे, ब्लॉग लिंक- http://marathibmm.blogspot.com/

  ReplyDelete
 72. सर,

  आपली नाव नोंदणी मी स्वत: करून घेतली आहे. माझ्याकडे फक्त आपला संपर्क क्रमांक उपलब्ध नाही. मी आपल्याला पूर्वी याहू आय. डी. वर या संदर्भात ईमेल पाठवले होते.

  ReplyDelete
 73. आतापर्यंत किती जणांनी नावनोंदणी केली व त्यांच्या ब्लॉगची लिंक सर्वांना मिळु शकेल काय ? याने त्यांच्या ब्लॉगशी पुर्वपरिचय करुन घेता येइल.

  ReplyDelete
 74. हरेकृष्णजी,
  आपल्याला या संदर्भात ईमेल करते आहे.

  ReplyDelete
 75. कांचनजी मी येणार आहे बर कां मेळाव्याला. मी नाव नोंदणी केलेली नसली तरी ही. मला सर्वांना भेटायचे आहे. ही संधी वाया घालवायची नाही.

  ReplyDelete
 76. कोष्टीसाहेब, मेळाव्याची रूपरेषा उपस्थित रहाणा-यांना ईमेल करण्यात येणार आहे. ती सार्वत्रिक प्रकाशित केली जाणार नाही. कृपया आपले नाव नोंदवावे, अथवा मला आपला ईमेल आयडी याच पोस्टच्या प्रातिक्रियेत लिहून पाठवलात तरी हरकत नाही.

  ReplyDelete
 77. कांचन मॅडम
  मलाही आपल्या मराठी ब्लॉगर मेळाव्यास यायचे आहे.
  मागील दोन दिवस Train चा problem त्यामुळे सपुर्ण Schedule विस्कळीत झाले. त्यामुळे आपला Form वेळेत भरु शकलो नाही. तरी आपली हरकत नसेल तर मी या मेळव्यास उपस्थित राहू शकतो का? कृपया कळवावे.
  मराठी ब्लॉगर मेळाव्यास मनःपूर्वक शुभेच्छा !!

  ReplyDelete
 78. दिपक,
  आपण आपलं पूर्ण नाव, ब्लॉगचा (असल्यास) नाव व पत्ता व आपला ईमेल आयडी मला mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर ईमेल करा. मी आपली नाव नोंदणी करून घेते आहे.

  ReplyDelete
 79. कांचन ताई
  अजून मेळाव्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा मला मिळालेली नाही ....

  ReplyDelete
 80. Sagar,
  रूपरेषा सात तारेखेला ईमेल करण्यात येईल.

  ReplyDelete
 81. मेळाव्यास माझ्या मनापासुन शुभेच्छा! अशा मेळाव्यातुन मराठी तरूणांना नक्कीच चांगली दिशा मिळेल. You are doing a fantastic job I must say.

  ReplyDelete
 82. You are doing a great job by organising such meetings. I hope thatour young community will get some concrete direction to move their blogs towards making it more purposeful.

  ReplyDelete
 83. धन्यवाद पोतदार साहेब,

  बरेच विषय अजून ब्लॉगर्सकडून हाताळले जात नाहीत, त्या विषयावरही या मेळाव्यामधे मार्गदर्शन केले जाणार आहे.

  ReplyDelete
 84. नमस्कार, मला थोड उशिरानेच कळल मेळाव्या बद्दल. असो.ती माहिती तुम्ही लवकरच प्रदर्शित कराल हि अपेक्षा. मी एक नवीन ब्लॉगर आहे. एका मदतीची अपेक्षा आहे ब्लोग संबधित सर्व माहिती मला कुठे मिळू शकते, ते कळवू शकाल. माझा एमैल पत्ता ashi6175@gmail.com

  ReplyDelete
 85. नमस्कार अश्विनी.

  मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला आपण येणार असाल तर आपलं स्वागत आहे. आपली उपस्थिती खात्रीलायक असेल, तर मी तशी नोंदणी करून ठेवेन.

  ब्लॉगसंबंधी माहितीसाठी आपण माझ्या ब्लॉगवाले या ब्लॉगला भेट देऊ शकता. आपल्याला हवी असलेली माहिती तिथे आढळली नाही, तर तसे त्या ब्लॉगवर प्रतिक्रियेत अवश्य लिहा, म्हणजे मी सदर माहितीवर लेख लिहू शकेन.

  धन्यवाद.

  ReplyDelete