Friday, March 26, 2010

कुछ कस्मे है जवॉं - काही शपथा जुन्या

प्रतिक्रिया: 
हा प्रयोग प्रथमच करून पहात आहे. श्री. तुषार जोशी, नागपूर यांनी केलेले गाण्यांचे अनुवाद पाहिले आणि त्यापासूनच प्रेरणा घेऊन अमिताभ बच्चन अभिनीत ऑंखे या चित्रपटातील ’कुछ कस्मे हैं जवॉं’ या गीताचा स्वैर मराठी अनुवाद करत आहे. या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण केलेले असूनही हे गीत चित्रपटातून वगळण्यात आले होते. पूर्वी हे संपूर्ण गाणं यूट्यूबवर उपल्बध होतं आता मात्र ते ऑंखे चित्रपटातील इतर गाण्याच्या दृश्यांसोबत काटछाट करून दाखवण्यात येत आहे.

मूळ गाणं इथे ऐकता येईल. अनुवादीत गीतही मूळ गाण्याच्या चालीवर गाता येऊ शकतं.काही शपथा जुन्या
वचने काही नवी
जादू ही अशी कशी
मज भासे गं सर्वक्षणी

मनी भाव आगळे
तुझी साथही मिळे
जणू आकाशाला या
धरणीचे गोड स्प्वप्न पडे

काही शपथा जुन्या...

वसंत फुलता प्रेमाचा हे मन कोकीळ होते
स्वच्छंद प्रेमगीत गातच जाते
सांग ना, प्रेमामध्ये असेच होते का?
या प्रितीच्या आवेगा रोखू कसे?

भान आता ना उरे
तुझी जादू ना सरे
बेधुंद प्रितीचा
का मजला आज ध्यास जडे

मनी भाव आगळे...

हृदयाची भाषा केवळ हृदयच जाणे
या विश्वाला ती भाषा अवगत नाही
प्रेमसागरी बुडूनच हाती स्वर्ग लाभे गं
सागरकिनारी मोती गवसत नाही

नाती ही हवीहवी
गूज अन काही मनी
बरसात ही प्रितीची
मज गेली ओलीचिंब करूनी

10 comments:

 1. मस्त आहे!! अनुवाद पण छान झालाय!!!

  ReplyDelete
 2. कांचन, मस्त जमलेयं गं. लयबध्द झालेयं.

  ReplyDelete
 3. वाहव्वा... छानच जमून आलय... (this song gets downloaded automatically in google chrome)

  ReplyDelete
 4. मनमौजी,
  जब कहीं चलती है ये प्यार की हवा या ओळीने मोठी अडचण केली होती पण नशीब! जमलं.

  भा,
  धन्यवाद, अगं मला मूळ चालीत गाता यावं असंच गाणं रचून पहायचं होतं.

  सौरभ,
  खूप वेळ लागला हे जमवायला. प्रत्येक ब्राऊझरची काही ना काही खासियत आहेच. बरं झालं सांगून ठेवलंस ते.

  ReplyDelete
 5. zakasssssssss .......... keep it up dear .......:)

  ReplyDelete
 6. धन्यवाद. सध्या घाईत आहे. सविस्तर प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याबद्दल क्षमस्व!

  ReplyDelete