Wednesday, February 3, 2010

टी शर्ट संदेश (T Shirt Quotes)

प्रतिक्रिया: 
टी शर्ट वापरण्याची फॅशन तशी आपल्याकडे जुनीच म्हटली पाहीजे. आधी फक्त खेळाडूंनी वापरण्याचा हा कपडा हळूहळू तरूण वर्गात चांगलाच लोकप्रिय झाला. त्यापाठोपाठ मध्यमवयीन आणि वरिष्ठ नागरिकांनीही टी शर्ट आपलासा करून टाकला. पूर्वी निव्वळ फॅशन म्हणून वापरल्या जाणा-या टी शर्टचा उपयोग काही कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी सुरू केला आणि टी शर्टला जणू नवा अर्थ मिळाला. कंपन्यांच्या जाहिरातींमागोमाग लोकप्रिय झाले ते म्हणजे टी शर्ट कोट्स अर्थात टी शर्ट वर लिहिलेले संदेश.

कधी गंमत म्हणून, कधी दुस-यांना खिजविण्यासाठी म्हणून, तर कधी एखादा सामाजिक संदेश देणारा टी शर्ट घालण्याची आवड सर्वात आधी तरूणवर्गातही लोकप्रिय न होती तरच नवल! टी शर्टवरचे हे संदेश सुद्धा मोठे गंमतीदार आणि विचार करायला लावणारे असतात बरं का!

आता हेच बघा ना, ’आठवडाभर सोमवार!’ हा किती छोटासा संदेश आहे पण या दोन शब्दांत एखाद्याचा पूर्ण आठवडा कसा गेला असेल, हे समजतं. गेल्या आठवड्यातील पडून राहिलेलं काम पूर्ण करणं, येत्या आठवड्याचं प्लानिंग करणं अशा व इतरही महत्वाच्या कामांचा वार म्हणजे सोमवार. रविवारच्या आळसावणा-या सुटीनंतर लगेचच येणारा सोमवार कुणालाच आवडत नाही. जर पूर्ण आठवडाभर कामाचे रगाडे उपसत रहावं लागलं, तर आठवडाभर सोमवार आहे असंच वाटणार ना!

पूर्वी इंग्रजी भाषेत उपलब्ध असणारे हे टी शर्ट संदेश आता मराठी भाषेतूनही उपलब्ध होऊ लागले आहेत. मराठीचा प्रचार करण्यासाठी टी शर्ट संदेशांचा वापर हल्ली सहजपणे होऊ लागला आहे. संदेश लिहिलेले टी शर्ट ब-याच कार्यालयांतून बाद करण्यात आलेले आहेत, ते संदेशामधे वापरल्या गेलेल्या भाषेमुळे. मुळात टी शर्ट हा कार्यालयात वापरण्याचा कपडा नाही, त्यात त्याच्यावर एखादा खिजवणारा संदेश असेल तर नकळत कुणाच्या तरी भावना दुखावल्या जाण्याची भिती! पण कार्यालयाव्यतिरिक्त पार्टी, सहल यासारख्या ठिकाणी असे टीशर्ट घालून आपल्याला वातावरणात गंमत निर्माण करता येऊ शकते.

असे संदेश असलेले टी शर्ट घातले की आपल्या बुद्धीचातुर्याचीही ओळख पटते. बाजारात असे संदेश असलेले रेडिमेड टी शर्ट उपलब्ध आहेत. पण हे घरच्या घरीसुद्धा करता येऊ शकतं. आपल्याला आलेला एखादा छोटासा गंमतीदार एस. एम. एस. किंवा सुभाषित फॅब्रिक कलरने आपल्या प्लेन टी शर्ट वर लिहिलं की आपण स्वत: काहीतरी केल्याचा आनंद तर मिळतोच शिवाय रेडिमेड टी शर्टवरच्या संदेशापेक्षा आपला संदेश निराळा असेल, तर वाचणारा आपल्याकडे दुस-यांदा वळून पहाणार हे निश्चित! मात्र एखाद्या प्रसिद्ध कविचं काव्य टीशर्ट वर लिहिताना जपून. असं करणं हे पायरसीमधे गणलं जाऊ शकतं.

छोटे छोटे एस. एम. एस., म्हणी, सुभाषिते किंवा ग्राफीटी यांचा उपयोग टी शर्ट कोट्स म्हणून करता येतो. असे टीशर्ट विकणा-या काही वेबसाईट्सही आहेत. मी इथे काही टी शर्ट संदेश मराठी आणि इंग्रजीत देतेय. यातील काही तुम्ही आधी वाचलेलेही असतील पण मला हे संदेश जास्तच आवडले म्हणून तुमच्यासोबत शेअर करतेय.

11 comments:

 1. माझ्याकडे असं एक टी शर्ट होतं, ज्याच्यावर मुलींबद्दल मजकूर लिहिला होता. ते शर्ट कधी ऑफीसला घालून जाता यायचं नाही पण इतर वेळेस मी ते वापरायचो. त्यावर लिहिलेले कोट्स माझ्या मैत्रीणींना आवडायचे.

  ReplyDelete
 2. कोट्स विनोदी असले तर लोक वळून बघतातच.

  ReplyDelete
 3. ्माझ्याकडे एक होता. " श्रावणा घननिळा.... " मस्त वाटायचं पावसाळ्यात घालायला. अच्युत पालव चा होता . तो अजुनही विकतो . नेट वर आहे अव्हेलेबल.http://www.achyutpalav.com/calapp.php?subcat_id=tees&subcat_name=Tshirts

  ReplyDelete
 4. मजा येते टी-शर्ट वरिल कोट्स वाचायला....

  ReplyDelete
 5. प्रसाद,
  तुमच्या टी शर्टस वरचे कोट्स फक्त मैत्रीणींनाच आवडायचे का? ;-)

  अनामित,
  हो लोक वाचतात कोटस. एखादा वेगळा कोट असेल तर उत्सुकता आणखीनच वाढते.

  महेंद्रजी,
  मी पाहिली ती साईट. आवडली. मलाही आता एक दोन असे टी शर्ट्स घ्यायचे आहेत.

  आनंद,
  खूप मजा येते. माझ्या एका मित्राच्या टीशर्ट वर लिहिलं होतं - माझ्यामुळे एस्पिरिनलासुद्धा डोकेदुखी होऊ शकते. मी उधार मागितला होता, त्याने दिला नाही. मी तो परत करेन याची त्याला खात्री नव्हती.

  ReplyDelete
 6. माझ्या मनात गेले काही महिने हाच विचार घोळतोय...
  आपण स्वताच एक सिरीज काढायची. t -shirt ची ... ज्यावर
  मी स्वतः लिहिलेले स्लोगन्स असतील..., कोट'स असतील..
  बघू या कस काय जमत ते...
  पण....
  इट message something ... जेव्हा तुम्ही घालता तेव्हा..

  see my blog @ http://akhiljoshi.wordpress.com
  not the one on blogspot...

  ReplyDelete
 7. कल्पना अफलातून आहे. मनावर घेतलंस तर काम होईल. चांगले कोट्स असतील तर टीशर्टस विकले जाणारच याची गॅरंटी. तुझा ब्लॉग पहाते.

  ReplyDelete
 8. T-shirts n tyachyavaril quotes akdum jabardast asatat kadhi kadhi
  ase kahi quotes nakki ethe denyacha praynt karen mi
  जीवनमूल्य

  ReplyDelete
 9. जरूर विक्रम. मलाही वाचायला आवडतील असे कोट्स.

  ReplyDelete
 10. काही टी शर्ट्सच्या मागे कोट्स असतात. तेही छान वाटतात वाचायला.

  ReplyDelete
 11. शाल्मली, संदेश देताना कल्पकता वापरणं महत्त्वाचं असतं. काही संदेश छोट्या अक्षरांत बाह्यांवर देखील असतात.

  ReplyDelete