Tuesday, February 23, 2010

घरपोच

प्रतिक्रिया: 
मद्यपान करून गाडी चालवणं हे जसं स्वत:साठी धोकादायक असतं, तसंच ते आपल्यासोबत असलेल्यांसाठीही घातक होऊ शकतं. कधी कधी तर मित्रांसोबत पार्टीचा आनंद घेताना मद्यपानावरचा संयम सुटतो आणि घरी जाताना स्वत:च्या पायांनी घरापर्यंत चालत जाणंही मुश्किल होऊन बसतं. आपले मित्र अशावेळी घरापर्यंत सोडायला आले तर ठीक पण मित्राचं विमानसुद्धा आपल्याचसारखं हवेत उडत असेल तर?

शिवाजी पार्कच्या ’ग्रीन रेस्टॉरंट आणि बार’ मधे अशी हवेत उडणारी विमानं सुखरूप घरापर्यंत सोडण्याची सेवा पुरवण्यात आली आहे. ’ग्रीन रेस्टॉरंट आणि बार’ मधे बसून अतिरिक्त मद्यपान केल्यावर आता गाडी चालवत घरी कसं जावं, अशी चिंता तुम्हाला जर तुम्हाला भेडसावत असेल, तर किमान १५० रूपये भरून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. गाडी रेस्टॉरंटजवळ पार्क करायची. रेस्टॉरंटचाच एक माणूस तुम्हाला घरापर्यंत सोडेल.


’मद्यपान करून गाडी चालवू नये’, या सूचनेचं पालन करण्यासाठी जरी ही सेवा चांगली वाटत असली, तरी किती मद्य प्यायचं आणि मद्य प्यायचं की नाही, हे शेवटी आपल्याच हातात असतं नाही का?

12 comments:

 1. काय मस्त आयडीया आहे ही? इतरही हॉटेल्सनी हे शिकुन यांच्या पासुन काही तरी बोध घ्यायला हरकत नाही.
  बिअरच्या ग्लासचा बॅक्ग्राउंड मस्त दिसतोय फोटो मधे. पण मुंबईला घरी आहे नां .. आता उपवास... घरी असे पर्यंत..

  ReplyDelete
 2. नक्कीच महेंद्रजी. कमाईसोबत समाजकार्य केल्याचं पुण्य पदरी पडेल हॉटेलवाल्यांच्या. बियरच्या ग्लासची आयडीया नव-याची. मी नुसताच फोटो काढणार होते. घरी असताना अशा विषयांची नावगोष्ट सुद्धा काढणं नको.

  ReplyDelete
 3. मी काय म्हणतो, बारवाल्यांनी त्यांच्या त्यांच्या एरियामधे बससेवा सुरु करावी; जश्या कंपनी/स्कुलबस असतात तशीच. म्हणजे प्रत्येक गिऱ्हाईकासाठी (ज्यांच्याकडे गाडी आहे त्या) लागणार मनुष्यबळ वाचेल. शिवाय बारचा जो माणूस सोडायला जाईल त्याला परत बारला कसं जावं हा प्रश्न पडणार नाही. गिऱ्हाईकांना आपली गाडी परक्याच्या हाती देण्याची समस्या निकालात निघेल. बारवाल्यांना गिऱ्हाईकांच्या गाड्यांसाठी खास पार्किंगची सोय करावी लागणार नाही, पर्यायाने जागा वाचेल. आणि हो ज्यांच्याकडे गाडी नाही असे लोकदेखिल ह्या बससेवेचा फायदा घेऊ शकतिल जेणेकरुन बारवाल्यांना मुबलक कस्टमर मिळतील.
  (नोंद: चुकुन कधी अश्या बसचा अपघात झालाच तर एकसाथ सगळ्या मद्यपिंना मोक्ष मिळेल.)

  ReplyDelete
 4. खरच छान संकल्पना आहे.दोघांचाही फ़ायदा आहे यात...सौरभची बारबसची आयडिया एकदम धमाल...

  ReplyDelete
 5. अमेरिकेत पोलीस फुकट घरी सोडतात.

  ReplyDelete
 6. स्वागतार्थ कल्पना :)

  ReplyDelete
 7. अवांतर : मद्यपान करून गाडी चालवने हा गुन्हा असताना, बार च्या बाहेर पार्किंग कशाला ठेवतात :-?
  ( इति.... सकाळ मध्ये वाचलेली ग्राफिटी )

  ReplyDelete
 8. सौरभची बारबसची आयडिया एकदम जबरी आहे...

  ReplyDelete
 9. सौरभ,
  तुझी कल्पना एकदम मस्त आहे. एरव्ही पिणारे आपलं पिणं थांबवणार नाहीतच. तर प्रदुषण, अपघात, वाहतुक समस्या यावर अशी बससेवा हा एक उत्तम तोडगा होऊ शकतो.
  आनंद,
  ते पत्रक वाचायला दिल्यावर मला फोटो घेतल्याशिवाय रहावलं नाही.
  देवेंद्र,
  या योजनेमुळे न पिणा-या लोकांनाही बराच फायदा होऊ शकतो.
  Anonymous,
  अमेरिकेत पोलिस काय करतात, हे पहायला मी गेले नाही. हा आपला स्वानुभव असावा.
  सुहास,
  सर्वच बारवाल्यांनी या योजनेचा पुरस्कार करायला हरकत नाही.
  श्रेया,
  विनोदी वाटत असली तरी खरीच गोष्ट आहे ही.
  अपर्णा,
  मला तर सौरभची आयडीया खूपच आवडलीय. दणक्यात चालणा-या बारवाल्यांनी ही कल्पना अंमलात आणायला हवी.

  ReplyDelete
 10. आयडीयाची कल्पना भारी आहे...

  स्वार्थ अन् परमार्थ दोन्ही साधला आहे त्यांनी.

  ReplyDelete
 11. खरोखरच चांगला उपक्रम आहे हा.

  ReplyDelete