Wednesday, February 10, 2010

साडी

प्रतिक्रिया: 
त्यादिवशी टी.व्ही. वर ’चक दे इंडिया’ पाहिला. ऑस्ट्रेलियाच्या राकट आणि शरीरप्रदर्शन करणा-या मुलींसमोर आपल्या अंगभर चापून चोपून साडी नेसलेल्या पोरी अगदी उठून दिसत होत्या. एक सहा मीटरचा कपडा तो काय? अंगभर व्यवस्थित गुंडाळला तर एका संस्कृतीची ओळख बनू शकतो.

14 comments:

 1. साडीमध्ये कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य लाख पटीने खुलून दिसते
  आणि साडी आपल्या संस्कृतीची ओळख आहे
  proud to be INDIAN

  ReplyDelete
 2. कांचन, १००% सहमत.

  ReplyDelete
 3. विक्रम,
  अगदी अशाच काही गोष्टींसाठी मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. साडीत स्त्रीचं केवळ सौंदर्यच खुलून दिसत नाही, तर स्त्रीमधील बरीच वैगुण्यही झाकली जातात.

  ReplyDelete
 4. प्राजक्ता,
  धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत आहे.

  ReplyDelete
 5. भा,
  मुलं मुलींना ’साडीच नेसत जा’ असं का सांगत असतात, ते हा व्हिडीओ पाहून कळतं.

  ReplyDelete
 6. फ़ॉर चेंज माझा नवरा मला साडी नेसु नकोस असं म्हणतो कारण मला साडीत चालता येत नाही मग कुठे गेलं की जरा पाणी दे नं आणून किंवा तू पार्क कर पण मला दारात सोड असलं काय काय सहन करावं लागतं म्हणून कंटाळतो...हे हे....पण खरंय मुली जितक्या साडीत छान दिसतात...:)

  ReplyDelete
 7. अपर्णा, साडीची सवय नसेल, तर साडीमधे वावरताना हालचालींवर मर्यादा येतात. मलाही फारशी साडीची सवय नाही, त्यामुळे समारंभासाठी साडी नेसली की अवघडल्यासारखं वाटतं. मात्र साडी नेसल्यावर स्त्री जितकी आकर्षक आणि डौलदार दिसते तशी ती इतर कुठल्याही वस्त्रामधे दिसत नाही.

  ReplyDelete
 8. साडी नेसण हा
  एक संस्कार आहे.
  शरीरावारती शोभणारा
  सोन्यासार्खाच एक अलंकार आहे..

  ReplyDelete
 9. वा! क्या बात है अखिल!

  ReplyDelete
 10. मी odd man out वाटेन कदाचित या डिस्कशन मध्ये. पण मला नाही आवडत विशेष बायकोने साडी नेसलेलं. अर्थात मी नेसू देत नाही वगैरे असला काही फालतूपणा नाही पण मला तिने विचारलं कुठला ड्रेस घालू तर साडी हा लास्ट ऑप्शन असतो. (आणि तिला पण ते माहित्ये त्यामुळे ति ते कमीतकमी वेळा विचारते :P)

  ReplyDelete
 11. हेरंब, नियमाला अपवाद असू शकतो. सर्वसाधारणपणे मुलांना मुली साडीतच छान वाटतात.

  ReplyDelete
 12. kahracha sadi hey bhartiyancha sanskrutiche lakshan aahey ..........mhanun yithe yainarya pardeshi vasiyaana bhartachi vilakshan odha aahey ........:)

  ReplyDelete
 13. Anonymous, परदेशी लोकांना भारत विविध कारणासाठी आवडतो पण त्यांना आपल्याकडच्या स्त्रिया सहा मीटर कपडा कसा काय पद्धतशीर गुंडाळतात (साडी नेसतात), याचं त्यांना विशेष कौतुक असतं.

  ReplyDelete