Tuesday, February 9, 2010

बाबरचा मुलगा हुमायूँ

प्रतिक्रिया: 


बाबर, हुमायूँ आणि अकबर यांचा पिअर्स साबणाशी काय संबंध? मी साबणाचा खोकाही तपासून पाहिला. काहीच माहिती आढळली नाही. ह्या जाहिरातीसाठी ए. आर. रेहमानच्या गाण्याची चाल वापरायचीच होती, तर ’दिल है छोटासा...’ काय वाईट होतं? तरी नशीब! अजून मराठी माणसाने ’जाहिरातीमधे बाबरचा मुलगा हुमायूँ... च्या ऐवजी शहाजीचा मुलगा शिवाजी, शिवाजीचा मुलगा संभाजी... असे शब्द घाला’ असं सांगितलं नाही.

27 comments:

 1. बाबर, अकबर, हुमयून - मासुमता, निरागसता
  http://www.manogat.com/node/17879

  ReplyDelete
 2. हे...हे...हे..याचा काही ताळमेळ असेल असे मला कधीही वाटले नाही, याचे मला कौतुक आहे.. :)

  ReplyDelete
 3. आई आपल्या लाडक्या लेकीला कीती मायेने पिअर्स साबण लावुन अंघॊळ घालते आहे असे सुचवायचे असेल.

  शेवटी आजचा जमाना मार्केटिंगचा आहे कांचनजी.

  ReplyDelete
 4. ह्म्म्म्म्म्म्म, खरं आहे, मराठी, महाराष्ट्र यांना मिडीयावाले नेहमीच झुकतं माप देत आले आहेत.

  अवांतर, दूरदर्शनवरच्या जाहिराती पहाण्याकरता काही दुवे आहेत का ?

  ReplyDelete
 5. Anonymous,
  लेख वाचला. माहितीसाठी धन्यवाद.

  ReplyDelete
 6. आनंद, जाहिरातीमधून काही शैक्षणिक संदेश द्यायचाच असेल, तर झाडे लावा, झाडे जगवा सारखे सामाजिक संदेशही देता येतात. घराणेशाहीचा इतिहासच कशाला हवा.

  ReplyDelete
 7. सुधीरजी, मला तेच म्हणायचं आहे. साधी साबणाची जाहिरात आहे, तर साबणाचे फायदे सांगितले असते तरी चाललं आतं. बाबर, हुमायूँ, अकबर यांचा मासुमियत, निरागसता आणि पिअर्स यांच्याशी कितपत संबंध असेल?

  ReplyDelete
 8. श्रेया, उगाचच अनावश्यक संदेश देणा-या जाहिराती पास कशा केल्या जातात, हेही कळलेलं नाही.
  दूरदर्शनवरील जाहिराती पाहण्यासाठी YouTube, Google Video वर जाऊन TV Commercials किंवा हव्या असलेल्या जाहिरातीचं नाव दिलंत तरी भरपूर दुवे मिळतील. मी लवकरच अशा जाहिराती माझ्या http://www.youtube.com/user/mogaraafulalaa या वाहिनीवर उपलब्ध करून देणार आहे.

  ReplyDelete
 9. हसतखेळत शिक्षण हा संदेश असण्याची दाट शक्यता आहे.
  नक्की सांगता येत नाही. काही जाहिराती डोक्यावरुन जातात.
  अशा वेळेस एक करावे. फटॅक आणि पुढचा चॅनल. :-)

  पण पुढच्याही चॅनेलवर तेच असेल तर काय करावे? :-(

  ReplyDelete
 10. तेच म्हणतेय, हसत खेळत शिक्षण असा संदेश असेल, तर सामाजिक संदेश द्यावेत. बाबर आणि हुमायूँचा काय उपयोग आहे का?

  ReplyDelete
 11. निश्चितच निरर्थक जाहिरात पण त्यावर अर्थपूर्ण चर्चा होवू शकते.

  आता साबणाची जाहिरात.. त्यात नको ते दाखवणे, सांगणे याचा उपयोग काय?
  नाही निर्मल मन.. काय करीन साबण.. असे वाटते ते उगाच नाही..

  जाहिरातीला परवानगी देताना निदान ती अर्थपूर्ण आहे कि नाही ते बघितले गेले पाहिजे..
  त्यातून इतिहासाच्या धड्यातील वारासारूपी माहिती देण्यात काय गैर आहे..

  अरे माझ्यासारख्याला सांगा... एखादी चांगली जिंगल लिहून देवू शकतो न मी.. अर्थपूर्ण..
  पण नाही.. माझ्या तोंडाला साबण फासणार.. .. नाही का?

  ReplyDelete
 12. तुझ्या मताशी सहमत आहे अखिल. अशा निरर्थक जाहिरातींना मंजुरी देऊन स्वत:ला सर्जनशील म्हणवणारी मंडळी धन्य आहेत. अशा जाहिरातींवर चर्चा करून आपल्या तोंडाला फेस आला तरी ह्या लोकांना त्याचं काही वाटणार नाही. ते अशा आणखीन चार जाहिराती मंजुर करतील.

  ReplyDelete
 13. हा सगळा अभ्यासक्रमाचा परिणाम आहे. स्वाभिमान, स्वधर्म, मायभूमी, स्वदेश ह्या कल्पनांचा गोंधळ योजना पूर्वक माजवला गेला व होत आहे. ज्या स्व तंत्र चालवणार्‍या देशात शिवाजीला दरोडेखोर ठरवणारे प्रधानमंत्री असतात, सावरकरांचा फोटो लोकसभेत लावायला विरोध होतो, तिथे हेच घडेल. कोणताही चॅनल बदला इंग्रजी की इतर भाषिक तिन पैकी एका खान ची जाहिरात त्या १० मिनीटात असलीच पाहिजे. ह्याला म्हणतात निधर्मी राज्य व्यवस्था (धर्म = कर्तव्य). मग टिचर करता कुत्रा बनणे क्युट ठरते. दाग अच्छे है. आयोडिन मीठ खाल्ले तरच डोके असते असे टाटा नमक म्हणते. नुसता अभ्यास करून इंजिनीयर होत नाही. इट हॅपन्ज ओनली इन इंडिया!

  ReplyDelete
 14. अरे काय हुमाऊ,अकबर यांचा या साबनाशी काय संबंध
  पण एक धर्मनिरपेक्ष जाहिरात शेअर केल्याबद्दल धन्यवाद ;)
  जीवनमूल्य

  ReplyDelete
 15. साधी गोष्ट आहे. "जाहिरात म्हणजे सुंदर मुलिला अंधारात मारलेला डॊळा" आपण डॊळा मारल्याचं समाधान, तिला समजत नाही म्हणुन तिला पण काही वाईट वाटत नाही.. दोघंही खुष .. विन विन सिच्युएशन!!!

  तुम्ही ही जाहिरात इग्नोर करु शकला नाहीत. त्यावर तुम्हाला लिहावसं वाटलं , आणि जाहिरात अजुन काही हजार लोकांपर्यंत तुम्ही अजाणतेपणीच पोहोचवली- आणि तेच या जाहिरातीचं यश आहे ...

  आयदर लव्ह इट ऑर हेट इट .. बट डॊन्ट जस्ट इग्नोर इट.. हे बेसिक प्रिन्सिपल आहे जाहिरातींचं..

  जाहिरात, चांगली वाईट कशीही असो, लक्षात रहाणं जास्त महत्वाचं!

  ReplyDelete
 16. रानडेकाका,
  तुम्ही अगदी बरोबर मत मांडलंत. दुर्दैवाची गोष्ट ही की लोकांना ज्या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा, नेमक्या त्याच गोष्टींवर लोक आक्षेप घेतात आणि अशा निरर्थक जाहिराती वारंवार पहाव्या लागतात.

  ReplyDelete
 17. विक्रम,
  ही जाहिरात धर्मनिरपेक्ष आहे की नाही, हे माहित नाही पण मला ही जाहिरात निरर्थक वाटली. हसत-खेळत शिक्षण असा जरी संदेश द्यायचा झाला तरी हसत खेळत शिकण्यासाठी इतर ब-याच गोष्टी या जाहिरातीत समाविष्ट करण्यात आल्या असत्या. पिअर्स साबण आणि बाबर घरण्याचा संबंध काय आहे, हे त्या साबणाचे उत्पादक तरी सांगू शकतील का?

  ReplyDelete
 18. महेंद्रजी,
  लक्षात रहाण्यासाठी चांगला संदेश तरी निवडायचा. बाबर घराण्याचा इतिहास निदान एक भारतीय तरी कधीच विसरू शकत नाही. तो हसत-खेळत शिकण्याचा विषय नाहीच. मला तर वाटतं, जेव्हा पहिल्यांदा जाहिरातीचं प्रेझेंटेशन केलं जातं तेव्हा जाहिरात पास करणारे आपल्याच विश्वात रममाण असतात, त्यामुळे आपण काय पास करतोय इकडे त्यांचं लक्ष नसावं, किंवा धंदा मिळवण्यासाठी हल्ली काहीही विकायला काढण्याएवढी वाईट परिस्थिती पिअर्स उत्पादकांवर आली असावी.

  ReplyDelete
 19. एक मल्टीनॅशनल (कंपनीचा) मुर्खपणा !!

  ReplyDelete
 20. हेरंब, मल्टीनॅशनल कंपनीत असं होऊ लागलं, तर छोट्या प्रमाणावरच्या उत्पाकदकांनी तर काय काय करायला पाहिजे.

  ReplyDelete
 21. malahi aadhi hi jahirat baghun waitag aala hota. pan nantar watale ki kadachit ti aai mulicha abhyas ghetey aanghol ghalta-ghalta. Aso.

  ReplyDelete
 22. आंघोळ घालता घालता अभ्यास ठीक आहे पण पिअर्स साबणाच्या जाहिरातीला धरून नाही ते. पिअर्स साबण वापरल्याने मोठ्यांची त्वचाही लहान मुलांच्या त्वचेसारखी कोमल व निरागस दिसते, असा पिअर्स साबणाचा संदेश आहे. त्यात बाबर नि हुमायूँ कशाला आणलेत, तेच कळत नाही. कारण ह्या बाबर घराण्याचा निरागसतेशी काडीइतकाही संबंध नाही. बाबराच्या काळात पिअर्स साबण होता की नाही, याचीही माहिती नाही.

  ReplyDelete
 23. काहो असी आमच्या पिअर्स ची थट्टा करता ?

  ReplyDelete
 24. हरेकृष्णजी,
  पिअर्सची थट्टा नाही करत आहे. पिअर्सच्या घोषवाक्याशी संबंध नसलेली जाहिरात आहे, म्हणून थोडी चर्चा.

  ReplyDelete
 25. कांचन, माझ्या डोक्यात सुद्धा हि जाहिरात बघितल्यावर अशीच सणक उठली होती... कधी काही वाटते कि ज्या पद्धतशीर मार्गाने हे सगळे केले जात आहे त्यामुळे आपणच आपल्या देशात अल्पसंख्यांक ठरणार ...

  ReplyDelete
 26. किरण,
  हे मला वाटतं सर्वांनाच आता उमगलं आहे. हास्यास्पद हे आहे की ज्यांची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे, तेच ’आम्ही अल्पसंख्यांक’ अशी बोंब मारत आहेत.

  ReplyDelete
 27. konohi hi soap wapru naka babar ani humayu ghari bastil

  ReplyDelete