Sunday, February 7, 2010

आयडीयाची कल्पना

प्रतिक्रिया: 
घरात नवीन लाकडी कपाट आल्यावर आधीची दोन जुनी लोखंडी कपाटं बाहेर कशी काढायची हा मोठ्ठाच प्रश्न होता. चार माणसांना एक रिकामं कपाट उचलता आलं, तरी ते दरवाज्यामधून बाहेर काढताना कुठेतरी भिंतींना ओरखडे येतील, दरवाजाच्या लाकडाचा टवका उडेल अश्या निरनिराळ्या भितीदायक शक्यता मनात गर्दी करून होत्या. पण काय आश्चर्य! त्या चौघा मजूरांनी दोन कपाटं हा हा म्हणता बाहेर नेली, तीही न उचलता!

कपाट रिकामं केलेलं होतं, त्यामुळे आत वजन असण्याचा प्रश्न नव्हता. रिकाम्या कपाटाचंच काय ते वजन. त्या चार जणांनी रिकामं कपाट एकदा उजच्या बाजूने, एकदा डाव्या बाजूने कलतं करून कपाटाच्या पायांखाली एक चादर अंथरली आणि चादरीची टोकं हातात धरून त्यांनी ते कपाट ओढत अगदी सहज बाहेर नेऊन ठेवलं. दुसरंही कपाट अशा रितीने बाहेर गेलं तरी माझ्या तोंडाचा वासलेला आ काही मिटायला तयार नव्हता. जवळ-जवळ दहा ते पंधरा मिनिटांचं काम त्यांनी अक्षरश: पाच मिनिटांत केलं होतं. ही आयडीयाची कल्पना मला फारच आवडली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते म्हणतात, ती अशी.

7 comments:

 1. अशा कामात हे माथाडी लेबर्स खुप हुशार असतात. चांगलं चार टन वजनाचं मशिन केवळ तिन माणस शिफ्ट करतात..
  शक्ती पेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरते :)

  ReplyDelete
 2. हो ना! अनुभवही शिकवून जातो अशा युक्त्या.

  ReplyDelete
 3. What an Idea Sirji..oops Madamji :)

  ReplyDelete
 4. आपला अनुभव सर्वांना सांगितल्याबद्दल धन्यवाद :)

  ही युक्ती आम्ही फार पूर्वीपासून वापरत आहोत. आमच्या घरात फार जुने टेबल, कपाटं आहेत. त्यांना सरकवताना फार मदत होते. तसेच आजकाल असलेल्या टाईलवरून (काय म्हणतात ते विसरलो) घरातल्या घरात ही हे फार सोपे जाते. :)

  ReplyDelete
 5. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, सुहास.

  देवदत, मी ही युक्ती पहिल्यांदाच पाहिली. हल्ली तर निरनिराळ्या प्रकारच्या टाईल्स असतात. कदाचित तुम्हाला स्पार्टेक्स म्हणायचं होतं.

  ReplyDelete
 6. माझ्या जुन्या घरातुन असंच एक कपाट एक अमेरिकन एक हाती खाली उतरवुन आणि मग बाहेरच्या गाडीसाठी फ़क्त एक ट्रॉली वापरून घेऊन गेला होता...इथली माणसं ताकदीवर पण करताना पाहिलं आणि आपण नेहमीप्रमाणे युक्त्या वापरतो :)

  ReplyDelete
 7. ही युक्ती तर मला फारच आवड्ली. कपाट नेण्याआधीचा माझा चेहेरा आणि कपाट नेल्यानंतरचा माझा चेहेरा आठवून मलाच हसायला येतं आता.

  ReplyDelete