Monday, February 1, 2010

गुगलकाका आणि याहूदादाची गंमत

प्रतिक्रिया: 
गुगल काका आता आपल्या सगळ्यांचे लाडके काका झालेले आहेत. त्यांना काही विचारलं आणि उत्तर मिळाली नाही असं होतंच नाही. गुगल काकांच्या मागोमाग नंबर लागतो, तो याहूदादाचा. पण गंमत अशी आहे की गुगलकाका आणि याहूदादाला काही विचारायचं झालं तर एकावेळी एकच प्रश्न विचारता येतो. समजा एकाच वेळी चार प्रशन विचारायचे झाले तर…?

….तर काय? गुगलकाका आणि याहूदादा आपल्याला असे वा-यावर थोडंच सोडणार आहेत! आता गुगलकाका आणि याहूदादाला एकाच वेळी चार प्रश्न विचारता येऊ शकतात.गुगलकाकांना प्रश्न विचारण्यासाठी http://www.googlegooglegooglegoogle.com/ आणि याहूदादाला प्रश्न विचारण्यासाठी http://www.yahooyahooyahooyahoo.com/ या दुव्यांवर गेल्यास एकाच वेळी चार खिडक्या एका पानात उघडतात. आता आपलं काम करणं आणखीनच सोप्पं! आहे की नाही गंमत?

13 comments:

 1. विक्रम, मला सुद्धा हे दोन्ही दुवे खूप आवडले.

  ReplyDelete
 2. अरे, मस्तंच डोकं लावलंय..आवडलं...

  ReplyDelete
 3. ek number prakar ahe! Dhanyawad!

  ReplyDelete
 4. मस्त आयडीया आहे.. आत्ताच चेक करतो..

  ReplyDelete
 5. आनंद,
  एकावेळी एकापेक्षा जास्त सर्च करण्यासाठीची ही युक्ती उपयोगी पडणारी आहे.

  केतन,
  गुगल आणि याहू कडे नेहमीच काही ना काही नवीन असतं.

  महेंद्रजी,
  मी चार-पाच वेळा वापरून पाहिलं. मला आवडलं.

  ReplyDelete
 6. ह्याबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. ह्यांची कल्पना चांगलीच आहे. :)

  पण माझ्याकरिता जास्त उपयोगाची नाही. कारण एवढ्या लहान खिडक्यांत काम करायला मला आवडत नाही. आणि परत चारही खिडक्यांना वेगवेगळे सांगावे लागते.
  त्याऐवजी www.yahooglesearch.com हे आवडले. कारण याहू आणि गुगल काय शोधून देते ते एकाच वेळी दिसते.

  अर्थात एकेकाची आवड :)

  ReplyDelete
 7. वा देवदत्त! तुम्ही तर कामाची माहिती दिलीत. हा दुवादेखील छान वाटतोय.वापरून पाहीन.

  ReplyDelete
 8. अरे वा..ही लोक खरच क्रियेटिव आणि टेक्निकली पर्फेक्ट आहेत. छोट्यातल्या छोट्या गोष्टीची हे लोक काळजी घेतात.
  Thanks for sharing

  ReplyDelete
 9. सुहास, देवदत्तने दिलेला दुवा सुद्धा पडताळून पहा. ती सुविधाही छान आहे.

  ReplyDelete
 10. Asa hi kahi wela hota ki aplyala je hava asta te Google ani Yahoo war patkan nahi milat...khup wel search karat rahto... Google search hi suddha ek kala mhanayla havi. Pahije aslele results milvayla kay search kela tar sapdel he suddha mahit pahije.
  ------------------------------------------------
  Google ani Yahoo tar bhari ahetach, shivay ankhi ek search engine suchavto... nav ahe 'altavista'. Mala kahi wela asa zala ki pahije te Google war nahi milala though I was searching for more than an hour... tewha me te altavista war search kela ani milala kahi minutes madhe... kadachit tumhala yacha upyog hoil...try karun bagha...

  http://www.altavista.com/
  ------------------------------------------------
  Ajun ek link deto. Ithe 20 search engines war tumhi search karu shakta..give a try:

  http://www.20search.com/
  ------------------------------------------------

  -- Kedar

  ReplyDelete
 11. धन्यवाद केदार. अल्टाव्हिस्टा माहित होतं पण 20search माहित नव्हतं. सर्च करताना लक्षात ठेवण्याची एक गोष्ट म्हणजे आपल्याला काय हवंय ते सर्च इंजिनला समजेल अशा भाषेत समजावून सांगणं. कधी कधी आपण एक विशिष्ट शब्द डोक्यात ठेवून सर्च करतो मग तास न् तास सर्च होत नाही. तेच त्या शब्दाचा प्रतिशब्द वापरला तर चुटकीसरशी उत्तर समोर येतं.

  ReplyDelete
 12. thr r many othr tricks to improve ur Google search... for eg: if u want to search a file of particular type enter "filetype:type_of_file" if u wanna search as per words in URL enter "inurl:word_in_url", similarly thr r many othr keywords to optimize ur search... like "intitle" "define:" "site:" etc etc...
  google is loaded with conversion, get ans to ur formulas, get flight status, movie schedule in ur nearest theater and lotta xcitin features...

  ths search engines r brilliant to get wht u need... thing is hw brilliant u r to make thm search wht u need...

  ReplyDelete