Thursday, January 28, 2010

रोमॅंटीक आयडीयाज..माझ्याही!

प्रतिक्रिया: 
महेंद्रजींच्या रोमॅंटीक आयडीयाज... वर प्रतिक्रिया दिल्यावर त्यांनी मुलींची रोमॅंटीक बाजू लिहीण्यास सुचवलं. तर ह्या काही माझ्या रोमॅंटीक आयडीयाज माझ्या मैत्रीणींसाठी. काही स्वानुभव तर काही मैत्रीणींकडून ऐकलेल्या.

१. त्याच्या नावाचा टॅटू तुमच्या मानेवर काढून घ्या आणि एकांतात त्याला हलकेच केस बाजूला करून दाखवा.

२. मित्र-मैत्रीणींसोबत तुम्ही गप्पागोष्टी करत असताना, त्यांच्या नकळत त्याचं लक्ष वेधून घेऊन ’लव्ह यू’ म्हटल्यासारखी ओठांची नुसती हालचाल करा.

३. तुम्ही बाईकवर त्याच्या मागे बसला असाल, तर त्याच्या मानेवर एक हलकासा किस करा.

४. तुम्ही कधी तरी सहज म्हणून त्याच्यासोबत काढलेला फोटो फ्रेम करून त्याला गिफ्ट म्हणून द्या.

५. तो दहा-बारा दिवसांसाठी टूरवर चालला असेल, तर त्याच्या बॅगमधे गुपचूप एखादं छोटसं गिफ्ट ठेवून द्या.

६. तुम्हाला कविता, चारोळ्या लिहिणं जमत असेल, तर त्याची स्तुती करणारं काव्य जरूर लिहून त्याला दाखवा.

७. जर तुमचं लग्न झालेलं असेल, तर दिवसभराच्या कामानंतर तो घरी आल्यावर त्याच्यासाठी आंघोळीला छान कोमट पाणी तयार ठेवा. ऍरोमा ऑईल नसेल, तर अगरबत्ती लावा. एखादी मंद संगीताची धून सुरू ठेवा आणि कोमट पाण्याने त्याला आंघोळ घाला. (हे फक्त पाडव्यालाच करायचं असतं, असं कुणी सांगितलं?) आंघोळीनंतर तुमच्या हातचं सुग्रास जेवण जेवल्यावर स्वारीला स्वर्ग दोन बोटे उरलेला असेल.

८. घरातील वीज गेलेली असताना, वीज कंपनीच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा, घरातल्या घरातच त्याच्यासोबत कॅंडल लाईट डिनर करा. असं डिनर तुम्ही सरप्राईज म्हणूनही देऊ शकता.

९. दिवे गेलेले असताना, घरात तुम्ही दोघंच असाल तर छानच पण जर तुम्ही कुटुंबात रहात असाल आणि दिवे गेलेल्याक्षणी तुम्ही त्याच्या जवळ असाल, तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगायला हवं का?


१०. त्याच्या वाढदिवशी त्याला ऑफिसमधे एक छानसा बुके पाठवून द्या. तो नुसताच खूष होणार नाही तर ऑफिसच्या लोकांमधेही चांगलाच भाव खाऊन जाईल.

११. तो ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राशी संबंध असलेलं एखादं बहुचर्चित पुस्तक त्याला गिफ्ट म्हणून द्या.

१२. पावसाळ्य़ात तुमच्या दोघांकडेही छत्र्या असल्या, तरी तुमची छत्री तुम्ही पर्सच्याबाहेर काढलीच पाहिजे असा काही नियम नाही. पावसाळ्यात एकाच छत्रीतून अर्धवट ओलेतं होत चालण्याची मजा काही औरच असते.

१३. कधीतरी त्याला अचानक जवळ बोलावून त्याच्या कानात ’आय लव्ह यू’ असं कुजबुजून सांगा. हे तीन शब्द जादू करून जातात.

१४. शक्य असल्यास त्याला लहानपणी त्याच्या घरचे त्याला कोणत्या नावाने हाक मारायचे हे जाणून घ्या. त्याला ते नाव आवडत असेल, तर त्याच नावाने त्याला हाक मारत चला.

या अशा कितीतरी निरनिराळ्या कल्पनांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन रंग भरू शकता. निरोगी असताना हे रंग भरणं सोपं आहे पण तुमचा जोडीदार आजारी पडला असेल, तर तुम्ही काय कराल?

१. शक्य असेल, तर तुम्ही सुटी काढा. त्याच्यासोबत दिवस घालवा. अशा वेळी तुम्ही त्याचा हात हातात धरून बसणं ,त्याला लवकर बरं करण्यासाठी मदत करू शकेल. तुम्ही करून दिलेली साधी पेजसुद्धा त्याच्यासाठी अमृतासारखी असेल.

२. "तरी मी सांगितलं होतं तुला...." अशाप्रकारची लेक्चरबाजी फोनवरून करण्याऐवजी त्याच्या तब्येतीची विचारपूस करा. तुम्हाला त्याच्या जवळ बसणं शक्य नसेल, तर अधूनमधून त्याला एस.एम.एस. पाठवत रहा.


या आयडीयांसोबत मला काही टीप्स तुम्हाला द्यायला आवडतील.


१. मुलींना तारखा लक्षात ठेवण्याची वाईट खोड असते. त्या कसल्या कसल्या तारखा लक्षात ठेवतील त्याचा काही नेम नाही. पहिली भेट, पहिलं स्माईल, पहिल्यांदा एकत्र खाल्लेलं आईसक्रिम, पहिलं भांडण.. इ.इ. बरं, इतकं करून भागत नाही आपल्या मित्राला/नव-यालाही या तारखा लक्षात असाव्यात असं त्यांना वाटतं आणि इथेच त्या चुकतात. पुरूषांना असल्या तारखा अजिबात लक्षात रहात नाहीत. (ज्याच्या लक्षात रहातात, तो सुदैवी). तुमचा वाढदिवस, तुमच्या लग्नाचा वाढदिवस या तारखांचाही त्याला केव्हा केव्हा विसर पडू शकतो. तर तुमच्या जोडीदाराकडून अशा तारखा लक्षात ठेवण्याची अपेक्षा करू नका. नेमका याच्या उलट विचार करा. तुमचं पहिलं भांडण केव्हा झालं होतं, हे जर खरंच तुमच्या नि त्याच्या लक्षात असेल, तर त्या दिवशी मुद्दाम त्याला फुलांचा बुके भेट द्या. "गेल्या वर्षी/गेल्या महिन्यात याच तारखेला तुझ्या माझ्यात दरी निर्माण झाली होती. आज आपण फुलांनी ती पोकळी भरून काढू या." असा संदेश त्या फुलांसोबत पाठवलात, तर त्या तारखेचे सर्व वाईट संदर्भच बदलून जातील.

२. तुम्हाला त्याला एखादं गिफ्ट द्यायचं आहे आणि तुम्हाला कळत नाहिये की काय गिफ्ट द्यावं, म्हणून तुम्ही जर तुमच्या दुस-या एखाद्या मित्राची मदत घेतलीत, तर हे चुकुनही तुमच्या जीवलगाला सांगू नका. मत्सर केवळ स्त्रियांनाच जमतो असं नाही.

३. त्याला भरपूर मैत्रीणी असतील, तर त्या मैत्रीणींचा मत्सर करण्यापेक्षा त्या मैत्रीणींच्यासमोर त्याला एखादं गिफ्ट द्या किंवा प्रेमाचा संदेश असलेलं ग्रिटींग कार्ड द्या. तुमच्या मत्सरापेक्षाही त्याच्या मैत्रीणींसमोर तुम्ही व्यक्त केलेलं प्रेम त्याला जास्त भावेल.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं. तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे आणि तुम्ही ते व्यक्त करता, हे सर्वात महत्त्वाचं आहे.

चित्रसौजन्य: आंतरजालावरून साभार

80 comments:

 1. २ आणि ३ क्रमांक भन्नाट आहेत एकदम.
  १३ पण एकदम मस्त.

  ReplyDelete
 2. सही..असे सरप्राइजेस मिळाले तर स्वार्‍या खरंच खुष होतील...

  ReplyDelete
 3. पहीला, दुसरा आणि तिसरा माईंडब्लोईंग आहेत...
  कड्डाक!

  ReplyDelete
 4. ९ नंबर एकदम खास.. वापरली आहे बरेचदा.. नागपुरला नेहेमी लाइट जायचे.. :) २ नंबर अन १२ नंबर पण खासच.. राजकपुरचा बरसात पाहिला, अन एकदा तसं करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते..
  हनी ( मधाचा ) मुबलक वापर...
  ही तारखेची बोंब तर नेहेमीच असते.. माझ्या अजिबात लक्षात रहात नाही .शेवटी सेल फोन वर अलार्म लाउन ठेवले आहेत..

  ReplyDelete
 5. अप्रतिम...
  मला खूप आवडले.

  ReplyDelete
 6. परत येऊन वाचून गेलो मी. ;))

  ReplyDelete
 7. एकदम जबऱ्या बर का
  कोणीतरी हि पोस्ट जरूर वाचावी असे सारखे मनात येत आहे ;)

  ReplyDelete
 8. ताइ

  रोमंटिक आयडिया एकदम भन्नाट रोम्यांटिक आहेत, प्रक्टिकली सोप्याही आहेत....

  काही आयडीया नुसत्या वाचल्या आणि मला गुदगुल्या झाल्या बुवा...खरंच!!!

  पन त्यातिल बऱ्याच आयडिया नवऱ्या बरोबरच वापरलेल्या बऱ्या नाहितर उगाच मोगरा फुलायच्या आतच चुरगळला जायची भीती वाटते नाहि?

  न. ४ तर जीवघेणी भयंकर आहे नाहि?... तो फोटो जर नंतर बायकोला सापडला तर? मेलोच...

  ReplyDelete
 9. पंक्या
  मीही २-३ वेळा वाचून काढली हि पोस्ट तरी अजून मन भरत नाही राव

  ReplyDelete
 10. क्रमांक २ ही अव्वल शक्कल आहे ! देवा याही देशात पाऊस पाड.

  ReplyDelete
 11. awsome yaar..hw romentic ideas..apratim..khup aavdlya...asach jr sagle ekmekanshi vagle tr brk ups honarch nahit kadhi..well sahiii aahet...:-)))

  ReplyDelete
 12. पंकज,
  जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल आश्वासकता निर्माण करण्यासाठी क्रमांक २ ही खूप कामाची गोष्ट आहे.

  आनंद,
  सरप्राईजेस हवेतच. अशा सरप्राईजेसनी जीवनातील लहान सहान घटनांमधून आनंद मिळवता येतो.

  आल्हाद,
  क्रमांक ३ खरंच माईंड्ब्लोईंग आहे. ते काय म्हणतात इंग्रजीत - यू ड्राईव्ह मी क्रेझी... तसंच काहीसं

  महेंद्रजी,
  तुमचे तर आभार मानले पाहिजेत, ही पोस्ट लिहिण्याबद्दल सुचवण्यासाठी. क्रमांक ९ अजून मलाही वापरता आलेली नाही पण आवडेल, कधी लाईट गेली तर ;-). तारखाच्या बाबतीत माझा नवरा पण असाच आहे. पण ते फार मनावर नाही घेतलं, तर उलट त्याच्या विसरभोळेपणामधून निराळ्याच गंमती निर्माण होताना दिसतात.

  विक्रम,
  नुसतं वाचू नका, कृतीत आणा. पोस्ट मुलींसाठी लिहिली असली, तरी मुलांनाही थोड्याफार फरकाने या आयडीयाज अंमलात आणता येण्यासारख्या आहेत.

  विक्रम एक शांत वादळ,
  अरे, मग उशीर कसला करतोस? ईमेल करून टाक ही पोस्ट.

  साळसूद पाचोळा,
  तुझं नाव साळसूद पाचोळा का आहे, हे मला आज कळलं. अरे लब्बाडा! या आयडीयाज केवळ नव-या बरोबर किंवा बायकोबरोबर वापरण्यासाठी मुळीच नाहीत. तुमचं ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम आहे, अशा कुठल्याही व्यक्तीशी रोमॅंटिक वागताना तुम्ही या आयडीयाज वापरू शकता. त्या व्यक्तीवर तुमचं प्रेम मात्र मनापासून हवं.

  भाग्यश्री,
  यातील काही आयडीयाज माझे स्वानुभव आहेत. त्या खरंच काम करून जातात.

  साधक,
  तुम्हाला आयडीया क्रमांक १२ म्हणायचं होतं बहुधा. हो, अर्धवट का होईना पण छत्रीतून चालताना ओलेतं होण्यासाठी या देशाला पावसाची गरज आहे खरी.

  Anonymous,
  आपलं म्हणणं खरं आहे. सगळे एकमेकांशी प्रेमाने वागू लागले तर द्वेषाला जागाच कुठे उरते?

  ReplyDelete
 13. 1,2,3 khup mast ideas aahett....khup khup dhanywad. :-)

  -Ajay

  ReplyDelete
 14. अजय,
  मीदेखील पहिल्यांदाच असं काहीतरी शेअर केलंय तुम्हा सर्वांसोबत. मलाही आनंद झाला.

  ReplyDelete
 15. "मीदेखील पहिल्यांदाच असं काहीतरी शेअर केलंय तुम्हा सर्वांसोबत"

  आदिती, वरचे वर असे शेअर करीत जा... आमच्या ’हिकडच्या" डोस्क्यात कधी प्रकाश पडला तर पडला.

  ReplyDelete
 16. पंकज,
  ’हिकडच्या’ डोक्यात प्रकाश नाही पडला तरी तू आहेस ना! प्लॅश चमकव. ती नाही होत, तर तू हो रोमॅंटिक. ती आपोआपच धीट होईल मग!

  ReplyDelete
 17. वा! काय भन्नाट पोस्ट वाचली... मस्तच. !
  यातल्या 'आयडियाज' अंमलात आणतो आता :)

  अनेक आभार

  ReplyDelete
 18. वा, वा!!! गेल्या काही दिवसात महेन्द्र काकांचे आणि आज तुमचा हा लेख वाचून नुसत्या गुदगुल्या झाल्या. ह्यावरून कुठेतरी वाचलेली एक ओळ आठवली "जखमा सुगंधी अश्या झाल्या काळजाला, केला वार ज्याने तो मोगरा असावा..." :)

  ReplyDelete
 19. भुंगोबा,
  हे बरोबर म्हणालात. क्रियेविण वाचाळता व्यर्थ होय, असं खुद्द समर्थांनीच म्हणून ठेवलंय.

  सिद्धार्थ,
  नुसत्या वाचून गुदगुल्या करून घेऊ नका. आत्ता भुंगोबा काय म्हणालेत ते वाचलंत का? तुम्ही लिहिलेली ओळ वाचली होती पण ती इथे चपखल बसेल, हे लक्षात आलं नव्हतं.

  विक्रम एक शांत वादळ,
  भा.पो. धन्यवाद.

  ReplyDelete
 20. कांचनताई,
  अफलातून आयडीयाज... एक सुचवू का? आता अजून एक लेख लिहा - ’उपवर मुलींच्या भावी जोडीदारांपासून अपेक्षा’ किंवा ’हल्लीच्या तरूण मुली मुलांमध्ये काय पाहतात’ अश्या आशयाचा...
  माझ्यासारख्या अनेक वर्षांपासून लग्नाळू असलेल्या आणि ’स्त्री’मनाचा अद्याप थांगपत्ता न लागलेल्यांना फायदा होईल :))

  ReplyDelete
 21. विक्रांत,
  बघ तूच सांगतोयंस की स्त्री मनाचा थांग लागत नाही पण तुला तुझ्या भावी पत्नीकडून काही अपेक्षा आहेतच ना! अरे, मग लिहून काढ त्या. कुणास ठाऊक, तुझी भावी पत्नीच तुझ्या ब्लॉग वाचकांपैकी असेल तर? यू नेव्हर नो! मी लिहायला हरकत नाही पण महेंद्रजी म्हणतात तेच म्हणते की, "लेखांमधे तोचतोचपणा येतो."

  ReplyDelete
 22. हांssss....! हे काय भलतंच... हे माझ्यासाठी तर मुळीच नव्हतं ना गं...! मी तसा तुझी साईट जास्तकरून वाचत नाही, पण पंक्या, सिद्धार्थ अन विक्रम भाऊंनी याबद्दल लयच गाजावाजा केला... मला महित बी नव्हतं, अन वाचणार बी नव्हतो... पण..! जाऊ दे, मला कधीतरी या गोष्टींची गरज पडेल, सांगता येत नाही...! ~x(

  - विशल्या!

  ReplyDelete
 23. विशल्या,
  आत्ता कसं बोललास? तुझ्यासाठी नव्हतं म्हणताना, गरज पडेल असं वाटलंच ना? त्याचसाठी लिहिलं होतं हे. माझ्या साईटच्या वाचकांमधे प्रगल्भ व्यक्तींचा भरणा आहे. तू तो टप्पा गाठला की येत जाशील या साईटवर.

  ReplyDelete
 24. सध्या फक्त गुदगुल्या करून घेण्याशिवाय पर्याय नाही. पर्यायाचा शोध सुरू आहे. हे असले लेख वाचून आजच्या आज शोध संपावा असे वाटून जाते. ;-)
  बाकी मला अहो जाओ करू नका. अवघडल्यासारखे वाटते. अरे तुरे बरे.

  ReplyDelete
 25. अहो, जाहो बोलण्याच्या ओघात आलं. मलाही एकेरीच हाक मारत जा. शोध संपला की मात्र या आयडीयाज वापरायला विसरू नकोस.

  ReplyDelete
 26. हाव काय??? गरज पडली तर पाहीन नंतर, सध्या तरी असं वाचन करणं मला नाही पटत बरं... ;)

  ReplyDelete
 27. हो का? हो का? १०० उंदरं खाऊन बोका चालला पंढरपुरा!

  ReplyDelete
 28. ऐ कोण बोका??? मी का तुला बोका दिसतोय, हांsss! अन ती म्हण तशी नाही, "१०० चुहे खाके, बिल्ली चली हज को!" अशी हाये! ;)

  ReplyDelete
 29. मी मराठीत म्हण वापरली. :)

  ReplyDelete
 30. सोडून द्या रे त्या छोट्याला... उगाच वाईट मनावर बालपरिणाम. नको म्हटले तरी इथे येऊन रंग किती ओला आहे ते पाहून गेलं,

  (पाचव्यांदा वाचून गेलो मी)

  ReplyDelete
 31. @पंक्या, भाऊ हे "वाईट मनावर बालपरिणाम!" काही कळालं नाही! तुम्हाला दुसरंच काही म्हणायचं तर नव्हतं ना! मी अजुन लहान आहे, हे माहित असतांनाही मला "तू ते वाचलं नाही ना रे?" असं विचारणारा तूच ना रे...! अन ही पोस्ट तशी मस्त आहे, आजकालचे पिच्चरपण असेच दाखवतात की...! तू पिच्चर पाहत नाही वाटतं... अरे आठवलं.. तू तर लय पिच्चर पाहतोस... संध्याकाळी ऑफिसला नुसता पिच्चर पाहण्यासाठीच जातो...!

  ReplyDelete
 32. पंकज, ’हिकडचं’ काह खरं न्हाई बा आता. अरे त्यांना पण पोस्ट वाचू दे.

  रंग ओला आहे, हे तुम्ही लोकांनीच छोटूला सांगितलं ना! आता तो गरज पडेल, असं म्हणतोय. म्हणजे अगदीच काय छोटा नाय तो आता.

  ReplyDelete
 33. ’हिकडं’ प्रिंटआऊट पाठवणार आता. पोस्टाने. अजून एक रोमँटिक आयडिया ना?

  विश्ल्या, मी आणि पिच्चर? हा एक मोठा विनोद आहे. शेवटचा पाहिला होता थेटरात तो ’वळू’. त्यानंतर काही कुठल्या थेटराचं नशीब उजळलं नाही.

  ReplyDelete
 34. आयडीया वापरण्यासारख्या आहेत. तिने आणि त्यानेही.

  ReplyDelete
 35. Muli jast pudhakar ghet nahit pan mulanna muline pudhakar ghetlela avadato. hya tips jar mulini follow kelya tar tyanche prem ankhi baharel asa mala vatate.

  ReplyDelete
 36. पंकज,
  तुला एक रोमॅंटिक आयडीया देते. प्रिंटअ-आऊट गुलाबी कागदावर काढून घे. अक्षर चांगलं असेल, तर स्वत:च्या हाताने छोटासा संदेश सोबत लिही.

  अमित,
  हो, या आयडीयाज दोघेही वापरू शकतात.

  Anonymous,
  मुली जात्याच स्वभावाने भिडस्त असतात. आधुनिक काळात भीड चेपली असली, तरी पुढाकार घेण्याच्या बाबतीत मुली थोड्या मागे आहेत. ह्या आयडीयाज मी मुलींसाठीच लिहिल्या होत्या. त्या मुलांनाच जास्त आवडलेल्या दिसतात ;-).

  ReplyDelete
 37. आयला भरीच.. असले विचार असलेली बायलो मिळाली तर कसली मज्जा येईल राव. पण ह्यातल्या बहुतेक गोष्टी मुलं पण करू शकतात हां, एस्पेशली नंबर ९ :) आणि नंबर ७ तर जन्नत..
  आपण तर बाबा जेवढ पासिबल आहे तेवढा सगळा करणार... :)

  ReplyDelete
 38. आणि हो, कॉमेंट्स पण वाचनीय आहेत :)
  सगळ्याना मित्र मैत्रिणिना ई-मेल करून पाठवली आहे लिंक...

  ReplyDelete
 39. प्रितम, अर्थातच मुलंही या आयडीयाज वापरू शकतात. जे शक्य असेल, ते जरूर करावं. तुमच्या भावी पत्नीने असं काही आधीच वाचलेलं असेल, तर मग तुम्ही लकीच की! माझ्या ब्लॉगवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीत. आपलं स्वागत आहे

  ReplyDelete
 40. All this is really good. But I feel attachment with mind really works than anything others

  ReplyDelete
 41. Anonymous, प्रेम व्यक्त करण्याची आपापली पद्धत असते. आपली पद्धत आपल्या जोडीदाराला आवडेलच असं नाही. म्हणून त्याचा कलही लक्षात घेतल्यास अधिक चांगलं.

  ReplyDelete
 42. लईच भारी की!!!

  आता मात्र महेंद्र काकांची पोस्ट आणि तुमची पोस्ट मिळुन एक "How-To गाईड"च काढलं पाहिजे की..!

  क्र. ५ आणि १२ मला विशेष आवडले.

  ReplyDelete
 43. प्रभास,
  व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला काही ना काही तरी निराळं करायला आवडतं. फक्त मी आणि महेंद्रजीच का? आपण असं करू या. प्रत्येकाने आपापल्या रोमॅंटिक आयडीयाज लिहून काढू या आणि त्याचं एक "How-To ...गाईड" काढूया. त्यात कितीतरी नवनवीन कल्पना असतील.

  ReplyDelete
 44. NILIMA
  hmmm post mast aahe aani mulanche prtikriya khup aahet :) pan mi mhante ka baykonech faqt khush thevayla have ka??? navryane pan khush thevayla have ki baykola. bayko bichari nehmich aapli tyala khush thevaycha praytn kart aste.

  ReplyDelete
 45. घराघरात निरनिराळं वातावरण असतं. मुलांनी मुलींशी रोमॅंटिक वागण्यासाठी काय आयडीयाज वापराव्यात हे वाचायचं असेल, तर लेखाच्या सुरूवातीला महेंद्रजींच्या पोस्टची लिंक दिली आहे, ती पहा.

  ReplyDelete
 46. Mi blogvar tase barechda yevun gelo pan hi pahili comment....Aavadala...Jam aavadla....Mast jamlay...

  ReplyDelete
 47. धन्यवाद सागर. तुझ्या प्रतिक्रियांचंही स्वागतच होईल.

  ReplyDelete
 48. लैई भारी बर का..आवडल्या रोमॅंटीक आयडीयाज...

  ReplyDelete
 49. तुमच्याही रोमॅंटीक आयडीयाज् लिहून काढा एकदा. आम्ही वाचू.

  ReplyDelete
 50. अहो तुम्ही आणि महेंद्रजींच्या रोमॅंटीक आयडीयाज..समोर काहीच उरला नाही बघ..मे प्रयत्‍न केला होता वॅलिंटाइन डे ला पण शेवटी थकून महेंद्रजींच्या रोमॅंटीक आयडीयाज ची लिंक देऊन मोकळा झालो :) बाकी रोज वाचून होतायत बरा का ह्या आयडीयाज माझ्याकडून .. हे हे हे

  ReplyDelete
 51. महेंद्रजींच्या आयडीयाज तर फर्मासच आहेत. रोजच वाचाव्या अशा.

  ReplyDelete
 52. महेंद्रकाका आणि तुम्ही मिळून एक गाईडच काढा...बरीच गिर्‍हाइकं मिळतील...
  अजून एक रोमॅंटिक कल्पना...
  कधीतरी तुमच्या नवर्‍याला ऍप्रिशिएट करण्यासाठी त्याला घरगुती फ़ेशियल करुन द्या..मुलं इतर वेळी असे प्रकार रेग्युलरली (किंवा कधीच) करत नाही पण हे आपल्या मुलायम हातानी केलेलं फ़ेशीयल सॉलिड इफ़ेक्टिव असतं.....:)

  ReplyDelete
 53. वा अपर्णा! तुही छान कल्पना सुचवलीस की! ही कल्पना कृतीत आणायला हरकत नाही. ;-)

  ReplyDelete
 54. एकदम मस्त आयडीया आहेत !!

  ReplyDelete
 55. किरण, नुसतं मस्त म्हणू नका. त्यातील एखादी वापरून पहा.

  ReplyDelete
 56. Kanchanji khupach chhan ideas dilyat. I have also tried some of these earlier. It really works. One of my friend has given a set of 25 )different)chocolates (like lollipop, papermint, chiung gum, dairy milk etc)on his 25th birthday & written a line on each about what she feels for him.

  ReplyDelete
 57. तृप्ती, तुम्ही सांगितलेली ही आयडीया तर खूपच छान आहे. एका वर्षासाठी एक चॉकलेट. आता ही आयडीया मी ट्राय करायला हरकत नाही ;-)

  ReplyDelete
 58. कांचनताई काही idea मुलांसाठी पण दे ना!!!!निदान मला तरी आता त्यांची नितांत गरज आहे..

  - (लग्नाळू) पिंगू

  ReplyDelete
 59. अच्छा! तू लग्नाळू आहेस तर ;-) मग एक काम कर. या लिंकवर जा - http://bit.ly/cTLghn

  ReplyDelete
 60. kanchan !

  Karch far chaan aahe ...mi naaki try karen.... gamant manjhe kahi mi already karte...... and reallly it works .... ani tu mahentese na te aagdi barobar aahe ....premla vayache bandhan nasve......

  bye for nw !

  ReplyDelete
 61. धन्यवाद पिंकी,
  प्रेमाला वयाचं बंधन आलं की ते प्रेम रहात नाही. या आयडीयाज वापरून आपल्या जीवनात जर थोडा आनंद निर्माण झाला तर या आयडीया दुस-यांबरोबर अवश्य शेअर करा.

  ReplyDelete
 62. नमस्कार कांचन
  रोमांटिक आईडियाज मस्त आहेत
  पण मज्याकडे एकदम वेगळी situation आहे
  माज्या मित्राचा साखरपुडा जाला आहे न लग्नाच्या १० दिवस आधी त्याच्या होणार्या बायकोचा वाढदिवस आहे काय करावे काय गिफ्ट द्यावे काही सुचत नाहीये
  मदत कर जरा

  ReplyDelete
 63. Hey... a friend gave me this link because i'm newly married... I hv been using some of these already..
  the real question is.. how to let my husband know that I expect something romantic from him?

  btw i hv seen a comment abt giving facial.. the same works with a good head massage or pedicure... guys generally don't hv pedicures so they enjoy it very much... :)

  ReplyDelete
 64. आशिष,
  गिफ्ट महत्त्वाचं नसतं, भावना महत्त्वाची असते. जर त्या दोघांना लग्न होईपर्यंत भेटता येणार नसेल, तर "दुरावा फक्त दहा दिवसांचा पण त्याआधी हा एक सुखाचा शिडकावा... तुझा वाढदिवस!" असा छोटसा संदेश असलेलं शुभेच्छापत्रही पाठवता येईल. जर ते दोघं एकमेकांना भेटणार असतील, तर आयडीया क्रमांक ५ चा वापर करून तुमच्या मित्राला एखादी छोटीशी भेटवस्तू त्यांच्या वाग्दत्त वधूच्या पर्समधे ठेवायला सांगा. वर दिल्यासारखा एखादा संदेश असलेलं कार्डही सोबत ठेवलं तर छानच. पुढचे दहा दिवस या वाढदिवसाच्या आठवणीत जातील हे नक्की! आणि सर्वात महत्त्वाचं - तुमच्या मित्राला वाढदिवशी त्यांच्या वाग्दत्त वधूसोबत असताना भ्रमणध्वनी थोडा वेळ का होईना, बंद ठेवायला सांगा. हे जाणीवपूर्वक त्यांनी तिच्यासमोर केलं, तर तिलाही ’स्पेशल’ असल्याचं फिलींग येईल आणि तेच तिच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट असेल.

  ReplyDelete
 65. "Meg's World" ,
  ब्लॉगवर स्वागत आहे. प्रत्येक व्यक्ती थोडीफार रोमॅंटिक असतेच. फक्त ती व्यक्ती आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त किंवा कमी रोमॅंटिक असू शकते. तुमच्या पतीने रोमॅंटिक वागल्याचा एखादा क्षण आठवा आणि त्याला सांगा की "त्या दिवशी तू जे वागला होतास, ते मला आवडलं होतं." तुम्हाला काय हवं आहे, हे त्याला कळेल. नाही कळलं तर त्यांना सहज/गंमत म्हणून महेंद्र दादांचा हा लेख वाचायला सांगा.

  ReplyDelete
 66. छान आयडीया आहेत, मी कॉलेजमधे असताना माझ्या एका मैत्रीणीला तीच्या बॉयफ्रेन्डला देण्यासाठी एक लवेलेटर मराठीमधे ट्रान्सलेट करून एका लेडीज रुमालावर प्रिटं करून दिले होते.......... नतंर त्याने तो रूमाल मलाच दाखवून खुप भाव खाल्ला होता

  ReplyDelete
 67. हा, हा, हा! रूमालावर प्रेमपत्र छापून घेण्याची कल्पना चांगली आहे. प्रेमिकांनी एकमेकांना भेट म्हणून रूमाल देऊ नये असं म्हणतात पण प्रेमपत्र असलेला रूमाल गिफ्ट देणं ही एक अफलातून गोष्ट ठरेल.

  ReplyDelete
 68. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 69. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 70. ya aadhi 2/3 wel bhet dewun gele thumchya blog la pan aaj first time comment det aahe.........apratim idea aahet..future madhe khup upyogi padtil thumchya idea........

  ReplyDelete
 71. ya aadhi 2/3 wel bhet dewun gele thumchya blog la pan aaj first time comment det aahe.........apratim idea aahet..future madhe khup upyogi padtil thumchya idea........

  ReplyDelete
 72. धन्यवाद सुषमा. ब्लॉगवर स्वागत! यापुढेही आपल्या प्रतिक्रियांची अपेक्षा राहील. वाचकांच्या प्रतिक्रियंनीच मला लेखनासाठी हुरूप येतो.

  ReplyDelete
 73. लई भारी ! वाचुनच शिरशिरी आली !

  ReplyDelete
 74. Hi Kanchan Tai,
  Mi tujhe sarv lekh vachle khup chhan aahet. ani romantic ideas tar khup chhan aahet.
  Majhi lovestory hi ekhadya chitrpatasarkhi aahe.tujya ideas mi use kelya aahet khup chhan results astat.
  Amhi majhya birthday lagn kele 3 mahine jhale pan ani khup khush aahot.
  PRATEK MANSANE EKDA TARI PREM KARAVE PAN TE KHARE KARAVE.
  MI JAST BOR KELE ASEL TAR I AM SOORY TAI

  ReplyDelete
 75. सोनल, हार्दिक अभिनंदन! अशीच आनंदात आणि सुखी रहा.

  (प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं पण ते खरं असावं.) - अतिश्य योग्य बोललीस तू.

  प्रतिक्रिया वाचताना मला अजिबात बोअर होत नाही, उलट बरं वाटतं. तुझी प्रतिक्रिया पाहूनदेखील मला आनंदच वाटला.

  ReplyDelete
 76. कांचन जी खारच उत्तम क्ल्पना आहेत. आवडल्यात,

  मूलीना म्हणे कविता फार आवडतात मग त्याच्यावरच तोडकी मोडकी का होईना लिहिली तरी चालेल ना का.?

  पण त्याच बरोबर, मग ते असो Love Marraige किंवा Arrange Marrage असावा फक्त विश्वास.. विश्वास आपल्या जोड़ीदारावर आपल्या जीवन साथी वर... तो साथी आयुष्याचा आयुष्यभर सोबत असेल फक्त विश्वासाच्या जोरावर..

  ReplyDelete
 77. अगदी खरं आहे स्वप्निल. प्रेम असेल तर विश्‍वास हवाच आणि जर विश्‍वास असेल तरच प्रेम टिकून रहातं.

  ReplyDelete