Friday, January 22, 2010

द नंबर ट्वेन्टी थ्री - कल्पनेपलिकडचं भीषण सत्य

प्रतिक्रिया: 
सत्य समजून घेतल्यानंतरची घालमेल आणि अज्ञानातील सुख याची तुलना केली तर अज्ञानातील सुखाचीच अपेक्षा प्रत्येकजण करेल. पण जे माहित नाही, ते माहित करून घेणं हा मानवी स्वभाव आहे. त्या स्वभावधर्मानुसार वागल्यानंतर जे काही आपल्यासमोर येतं, त्याची तुलना केवळ वास्तव व अनभिज्ञता या दोन पारड्यांमधे करता येत नाही. घडून गेलेले वास्तव हे सत्य होतं व आपण त्यापासून अनभिज्ञ होतो ही वस्तूस्थिती स्विकारून समोर आलेली परिस्थिती नैतिक व अनैतिकतेच्या कसावर पारखून पहावी लागते. ही एक मोठी कसोटी आहे. या कसोटीवर पूर्ण उतरण्यासाठी आवश्यक असलेलं मनोबळ ज्याच्याकडे असतं, केवळ तोच सत्य जाणून घेण्यामागची उत्सुकता व अज्ञानातील सुख याची तुलना केल्यानंतर त्यातून सत्य स्विकारू शकतो.

वॉल्टर स्पॅरो हा भटक्या कुत्र्यांना पकडणारा एक अधिकारी आहे. एके दिवशी एका कुत्र्याला पकडण्याच्या नादात, तो कुत्रा वॉल्टरच्या हाताला चावतो आणि पळून जातो. त्याच दिवशी वॉल्टरचा वाढदिवसही असतो. वाढदिवसाची भेट म्हणून वॉल्टरची पत्नी अगाथा, त्याला एक पुस्तक भेट देते. या पुस्तकाचं नाव आहे ’द नंबर ट्वेन्टी थ्री’.

या पुस्तकाच्या लेखकाने तेवीस क्रमांक व त्याच्याशी निगडीत असलेल्या कथानायकाच्या आयुष्यातील घटनांच्या योगायोगांविषयी लिहिलं आहे. कथानायकाचं अवघं जीवन ’तेवीस’ या क्रमांकाने व्यापलेलं आहे. वॉल्टरला सुरूवातीच्या काही पानांतच ही कथा खूप आवडायला लागते. पुस्तकातील कथा वाचता वाचता वॉल्टर त्यात इतका गुंग होऊन जातो की तेवीस क्रमांकांचं आपल्या आयुष्यात घडणा-या घटनांशीही काहीतरी नातं आहे, असं त्याला वाटू लागतं. एका विशिष्ट प्रकरणापाशी येऊन ही कहाणी अर्धवटच संपते. वॉल्टरला कहाणीचा शेवट जाणून घेण्याची खूप उस्तुकता लागून रहाते. त्या हव्यासापायी तो आपल्या पत्नी आणि मुलाला विश्वासात घेऊन कथालेखकाचा शोध घेण्यासाठी निघतो. वॉल्टर चावून पळालेला तो कुत्रा वॉल्टरला ब-याच ठिकाणी दिसत रहातो. शोधाच्या सुरूवातीच्या काळातच त्यला हे समजतं की ह्या पुस्तकाच्या लेखकाचं हे पहिलं आणि शेवटचं पुस्तक आहे.

जिम कॅरी हा लवचिक चेहे-याचा अभिनेता आहे. त्याच्या भूमिकांना विनोदी बाज असला तरी त्याची प्रत्येक भूमिका निराळी होती. आवाजाइतक्याच प्रभावीपणे चेहे-याचा लवचिकपणाचाही वापर करणा-या अभिनेत्यांमधे जिम कॅरीची गणना होईल. ’द नंबर ट्वेन्टी थ्री’ या चित्रपटात जिम कॅरीने गंभीर व निराळ्या पठडीची भूमिका रंगवली आहे. चित्रपटाच्या सुरूवातीला एक-दोन विनोद आहेत पण ते जिम कॅरी चित्रपटात आहे म्हणून येत नाहीत, तर कथानकाची गरज म्हणून येतात.

संपूर्ण चित्रपटभर हिरवट काळसर फ्रेम वापरली आहे, जिच्यामुळे गूढ वातावरणाचा भास होत रहातो. चित्रपटाच्या पार्श्वसंगीतापेक्षाही प्रभावीपणे चित्रीत केलेले प्रसंग कथानकात गुंतवून ठेवतात. सत्य हे आपल्या कल्पनेपेक्षा निराळं व भीषण असू शकतं ह्याचा प्रत्यय देणारा ’द नंबर ट्वेन्टी थ्री’ आपल्याला वास्तवाचा स्वीकार करायला भाग पाडतो.

8 comments:

 1. I think whole story on Number 23 is either manipulated to have specific end or it is completely uncomplete.also Jim Carrey looked uncomfortable throughout the film.What do you think?

  ReplyDelete
 2. प्रत्येक चित्रपट सत्यघटनेवर आधारित असू शकत नाही, त्यामुळे रचलेल्या कहाणीवर बनवलेल्या चित्रपटाला हेतूपुरस्सर बनविलेला आहे असं म्हणू शकत नाही. ब-याचदा चित्रपटाच्या सुरुवातीला, ’या चित्रपटाचा वास्तवाशी संबंध नाही, असल्यास योगायोग समजावा’ अशा प्रकारच्या वाक्यांमधून चित्रपटाची कथा काल्पनिक असल्याचे सांगितले जाते. सत्यघटनेवर आधारित चित्रपटांमधेही चित्रपटाच्या गरजेनुसार बदल केले जातात. जिम कॅरीला विनोदी ढंगाच्या भूमिकांमधे तुम्हाला जास्त आवडत असावा म्हणून या चित्रपटातील त्याचा वावर तुम्हाला अनैसर्गिक वाटला असेल. मला फक्त त्याला केलेला मेक-अप खटकला. कारण कितीही प्रयत्न केले, अगदी त्याला निराळ्या केशरचनेचा विग घालायला लावला तरी त्याचं वय लपून राहिलं नाही.

  ReplyDelete
 3. आकर्षक वाटतंय कथानक. वीकेंडातच बघून टाकतो :)

  ReplyDelete
 4. I definitely not talking about reality in script.I'm talking about manipulation of the script.whenever you write script for some desired end you've to modify every single scenario which is gonna happen & this is what I felt worst about Number 23.
  I will prefer you should watch 'Eternal Sunshine of Spotless Mind' of Jim Carrey which isn't a comedy & movie is also great.

  ReplyDelete
 5. I liked your introduction about 'bliss of ignorance v turmoil' of 'truth/reality':

  <<
  Can you handle the TRUTH? WHO can?

  Most people would prefer the bliss of ignorance to the turmoil often created by the knowledge of truth. But curiosity about the unknown, even unknowable, is ingrained human nature and has been the bulwark of the progress and prosperity of humanity.

  Once one follows this natural instinctive curiosity, whatever truth surfaces can not be sorted just as ‘present reality’ or truth and ‘past ignorance’. The realization of the reality that ‘one was unawares to the truth’ must be followed by the testing of that reality on one’s moral and ethical values. This is tough.

  Only the person who has the courage of conviction… the and strength to withstand whatever the ‘true reality’, is able, after balancing the ‘bliss of ignorance’ and the ‘turmoil of truth’, to elect truth, irrespective of consequence. >>

  Perhaps it appealed me most because I am such a person.

  Swamy Vigyananand

  ReplyDelete
 6. I liked your introduction about 'bliss of ignorance v turmoil' of 'truth/reality':

  <<
  Can you handle the TRUTH? WHO can?

  Most people would prefer the bliss of ignorance to the turmoil often created by the knowledge of truth. But curiosity about the unknown, even unknowable, is ingrained human nature and has been the bulwark of the progress and prosperity of humanity.

  Once one follows this natural instinctive curiosity, whatever truth surfaces can not be sorted just as ‘present reality’ or truth and ‘past ignorance’. The realization of the reality that ‘one was unawares to the truth’ must be followed by the testing of that reality on one’s moral and ethical values. This is tough.

  Only the person who has the courage of conviction… the and strength to withstand whatever the ‘true reality’, is able, after balancing the ‘bliss of ignorance’ and the ‘turmoil of truth’, to elect truth, irrespective of consequence. >>

  Perhaps it appealed me most because I am such a person.

  Swamy Vigyananand

  ReplyDelete
 7. चित्रपटाचा शेवट एका ’अमूक’ रितीने व्हावा म्हणून कथेमधे काही विशिष्ट प्रसंग मुद्दाम तयार केले जातात, मुळात कथाच हेतुपुरस्सर बनविलेली असल्याने, प्रसंगाला हेतुपुरस्सर म्हणता येणार नाही. आपण सुचविलेला चित्रपट मी बहुधा पाहिला आहे. त्यात केट विन्सलेट आहे.

  ReplyDelete
 8. स्वामीजी, आपण तर माझ्या परिक्षणाचं इंग्रजी भाषांतर केलंत. वाचताना हे आपल्याच लेखाचं भाषांतर आहे, यावर विश्वास बसला नाही. फार आवडलं.

  ReplyDelete