Thursday, January 14, 2010

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 
आज मकरसंक्रांत आहे, हे विसरून गेले होते. रविंद्रजींच्या ’माझ्या मना’ ब्लॉगवरची पोस्ट वाचली आणि लक्षात आलं. कामाची गडबड, ताण यात आपण स्वत:ला खरंच कुठेतरी हरवत चाललो आहोत का? उशीरा का होईना, मला आठवण झालीये. आईने तिळगूळ पाठवलाय. तो खाता खाता तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतेय. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!चित्रसौजन्य:indianhotrecipes.blogspot.com

7 comments:

 1. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…तिळगुळ घ्या गोड गोड बोला

  ReplyDelete
 2. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

  ReplyDelete
 3. संक्रांतीच्या शुभेच्छा!
  तिळाचा लाडु नका दाखवु, अजुन एक अठवडा आहे घरी जाण्यास आणि लाडु खाण्यास :(

  ReplyDelete
 4. मकर संक्रांतीच्या ्शुभेच्छा..

  ReplyDelete
 5. सुहास, विक्रम, महेंद्रजी, आनंद आपल्या सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा! आनंद, माझ्या घरी पण नाही बनलेत लाडू. आईने पाठवलेत म्हणून निदान खायला मिळालेत तरी! घरी गेलास की लाडू नक्की खा.

  ReplyDelete
 6. कांचन ताई तुला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...तिळगुळ घे गोड गोड बोल...
  बाकी आमच्याकडे फारच कडक लाडू आहेत, नुसत्या दाताने तुटत नाही... :)

  ReplyDelete
 7. हा, हा, हा! हरकत नाही. मी वरवंटयाने चेचून खाईन. तिळगूळासाठी काहीही!

  ReplyDelete