Sunday, January 24, 2010

नवीन लायब्ररी

प्रतिक्रिया: 
काही चित्रपट वारंवार भेट देऊनही मला माझ्या नेहमीच्या सी.डी. लायब्ररीमधे मिळाले नव्हते. ते चित्रपट मिळवण्यासाठी किती सी.डी.ची दुकानं आणि लायब्र-या पालथ्या घातल्या असतील कुणास ठाऊक. या शोधमोहीमेमधे मल एक नवी सी.डी. व पुस्तकांची लायब्ररी मिळाली. या लायब्ररीचं नाव आहे, बुकमार्क लायब्ररी. ही लायब्ररी मुळात पुण्याची पण आता मुंबईमधे या लायब्ररीच्या चार शाखा आहेत. पहिली आहे दादर पश्चिमेला, दुसरी मिरा रोडला, तिसरी मुलुंडमधे आहे तर चौथी शाखा ठाणे येथील घोडबंदर विभागात सुरू होतेय. तसंच औरंगाबाद, कर्नाटक व गुजरातमधेही या लायब्ररीच्या शाखा आहेत.


या लायब्ररीच्या वेबसाईटचा पत्ता आहे. http://bookmarklibrary.co.in/. लायब्ररीच्या दादर शाखेला भेट द्यायची असेल, तर पोर्तुगीज चर्चच्या समोर जो फुटपाथ आहे तेथून प्रभादेवीला जाण्याच्या दिशेने (प्लाझाकडे पाठ करून) वळल्यास कोप-यावरच ही लायब्ररी दिसेल. सकाळी ९:३० ते रात्री ९:३० अशी लायब्ररीची वेळ आहे व सोमवारी लायब्ररी बंद असते.


इथे तुम्हाला सभासद होण्यासाठीचे निरनिराळे प्लान मिळतील. सी.डी.च्या सोबत पुस्तकही घेऊन जाता येईल असा एक प्लान आहे यात. पण इथे केवळ मोठ्यांसाठीच नाही, तर लहानांसाठीही पुस्तके व खेळणी यांची लायब्ररी उपलब्ध आहे. तसंच पी.सी. गेम्सही उपलब्ध आहेत. लायब्ररीमधील पुस्तके व सी.डी. दर महिन्याला बदलत रहातात त्यामुळे रसिकांना सतत नवीन स्टॉक मिळत रहातो. शिवाय उपलब्ध नसलेलं एखादं जुनं पुस्तक किंवा चित्रपट आपण तिथे मागवूही शकतो.

4 comments:

 1. मलाही माझ्या आवडत्या एका चित्रपटाची सी डी मिळत नाहीये कितीही शोध घेतला तरी :(
  'दुनिया दिलवालो कि' त्यात ते मुस्तफा मुस्तफा गाणे आहे ते

  कोठे मिळेल समजेल का ?
  आणि हो लिंकबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 2. त्या लायब्ररीमधे चेक करून पहाते आणि सांगते. हा चित्रपट युट्युबवर उपलब्ध नाही का?

  ReplyDelete
 3. चांगली सुविधा आहे ही.. आम्ही सुरु केलीय - गेल्या महिन्यापासुन - माझ्यासाठी सी.डी.ज् .. बायकोसाठी काही पुस्तकं आणि छोकरीसाठी गोष्टींची पुस्तकं!

  ReplyDelete
 4. हो, मलासुद्धा आवडली ही सुविधा. मी गेल्याच आठवड्यात सभासद झाले आहे.

  ReplyDelete