Tuesday, January 5, 2010

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांचे आभार

प्रतिक्रिया: 
ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या संकेतस्थळावर, ऑनलाईन मराठी पुस्तक प्रकाशकांच्या यादीमधे ’मोगरा फुलला’लाही स्थान दिले आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मन:पूर्वक आभार. ही बाब माझ्यासाठी एका पुरस्कारासारखीच आहे.


17 comments:

 1. अभिनंदन!

  -अनामिक

  ReplyDelete
 2. इतक्या हजारो साईट्स मधुन तुमच्या साईटचं नाव इथे येणं हे खरंच कौतुकास्पद आहे.
  या यशाबद्दल तुमचे मनापासुन अभिनंदन आणि पुढे पण तुमच्या हातुन असेच उत्तमोत्तम लिखाण घडो हिच सदिच्छा....

  ReplyDelete
 3. माझं नाव तिथे पाहून मला खूप आनंद झालाय. चांगल्या प्रतिचं लिहीण्याचा आणि ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा नेहमीच प्रयत्न करेन. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाची आणि शुभेच्छांची गरज आहे.

  ReplyDelete
 4. कांचनजी, अभिनंदन!
  पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी अनेक सदिच्छा!

  ReplyDelete
 5. अरे वा!!! हार्दिक अभिनंदन.

  मोगर्‍याचा सुगंध असाच बहरत राहो.

  ReplyDelete
 6. @ आनंद, धन्यवाद. या ब्लॉगवर भरभरून प्रेम करणा-या वाचकांमुळेच इथपर्यंत येऊ शकले आहे.

  @ सिद्धार्थ, नक्कीच! माझीही तीच अपेक्षा आहे. परमेश्वराची कृपा आणि तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आहेतच पाठीशी.

  ReplyDelete
 7. अभिनदन!! कांचन ताई
  असाच आपला मराठी भाषेचा ध्वज उंचावत रहा...

  ReplyDelete
 8. अभिनंदन…! अभिनंदन…!! अभिनंदन…!!!
  तुमच्या हातून असच सहज, सुंदर लेखन होत राहो आणि ब्लॉग असाच बहरत राहो ह्या शुभेच्छा…
  (आजच तन्वीताईला दिलेल्या हया शुभेच्छा तुम्हालासुदधा)

  ReplyDelete
 9. धन्यवाद मंदार, माझ्याकडून होईल तितके प्रयत्न मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी करत राहीन.

  देवेंद्र, शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुम्ही ब्लॉगला भेट देऊन मनापासून शुभेच्छा दिल्यात यातच सर्व काही आलं.

  ReplyDelete
 10. अरे वा.. खूप मस्त बातमी.. हार्दिक अभिनंदन..

  ReplyDelete
 11. धन्यवाद हेरंब. ऑनलाईन कथांची दखल आता घेतली जातेय, याचा मला जास्त आनंद आहे.

  ReplyDelete
 12. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या त्या वेबपेजवर दिलेल्या वेबसाईट्सची यादी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

  त्या यादीत मराठी वृत्तपत्रं आणि मराठी प्रकाशकांच्या लिंक्स आहेत. त्यानंतर मनोगत, उपक्रम, मायबोली इत्यादी कम्युनिटी आहेत. वृत्तपत्रं, प्रकाशक, आणि कम्युनिटीज यांच्याव्यतिरिक्त पु ल, जी ए, गदिमा, खांडेकर आणि कुसुमाग्रज ही पाच दिग्गज नावं दिलेली आहेत.

  या सर्वांशिवाय फक्त ‘मोगरा फुलला’चा या यादीत समावेश आहे. वैयक्तिक लेखकांचा विचार केला तर वरील पाच नावांनंतर केवळ तुमचंच नाव तिथं आलेलं आहे.

  ‘मोगरा फुलला’चा उल्लेख वैशिष्ट्यपूर्ण म्हटला तो यासाठीच.

  Great!

  ReplyDelete
 13. धन्यवाद विवेक, तुमच्या लक्षात आलं ते.

  ReplyDelete