Saturday, January 16, 2010

पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 
उद्या १७ जानेवारी २०१० रोजी पुण्यात होणा-या ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला माझ्याकडून शुभेच्छा! ब्लॉगींग विश्वात नुकतंच पदार्पण केलेले आणि अनुभवी असे बरेच ब्लॉगर मित्र-मैत्रीणी तिथे एकत्र येत आहेत. मी जाऊ शकत नसल्याचं थोड दु:ख आहे पण प्रभास गुप्तेचे लाईव्ह ट्विट्स वाचायला मिळणार आहेत, त्यामुळे समाधान आहे. या संमेलनातून ब्लॉगर्स एकमेकांची ओळख तर करून घेतीलच पण ब्लॉग लेखनाचा अनुभव प्रत्येक ब्लॉगरकडे निराळा असेल. हे अनुभव ऐकून त्यापासून शिकण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे.उद्याच्या संमेलनाने जागतिक मराठी ब्लॉगर्स संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जातेय. अशी संमेलनं वारंवार भरतील व ब्लॉगर्स एकमेकांशी स्नेहबंधात गुंफले जातील, अशी आशा करूया.

4 comments:

 1. तुम्ही आल्यावर हि आपण परत भेटूच

  मलाही काही लोकांना भेटण्याची खूप इच्छा होती खूप दिवसापासून आणि उद्या तो दिवस आहे :)

  ReplyDelete
 2. We are going to miss you. I was hoping to meet you there

  ReplyDelete
 3. धन्यवाद कांचन, सविस्तर वृत्तांत अनेक लोकांच्या ब्लॉग्सवर वाचायला मिळेलच :-)

  ReplyDelete
 4. विक्रम, हरेकृष्णजी, अनिकेत,
  मलाही तुम्हा सर्वांना भेटण्याची खूप इच्छा होती. या वेळी जमलं नाही :( पुढच्या मिटींगला भेटू अशी आशा व्यक्त करते :).

  ReplyDelete