Friday, January 1, 2010

सदैव!

प्रतिक्रिया: 
सदैव!


चिनमधील एका लोकगीतावर आधारित ही एक प्रेमकथा आहे. हे लोकगीत मी ऐकलेले नाही. मात्र काही वर्षांपूर्वी एका मासिकात या गीताविषयी लिहून आले होते, ते वाचून मला ही कथा लिहिण्याची स्फूर्ति मिळाली. कथेतील काळ, पात्रांची नावे व प्रसंग काल्पनिक आहेत.


धन्यवाद!

-मोगरा फुलला

विशिष्ट पानावर जावयाचे असल्यास त्या पान क्रमांकावर टिचकी दया. सदर पान नवीन विंडोमध्ये उघडेल. त्या पानापुढची किंवा त्या पानाआधीची पाने नव्याने उघडलेल्या विंडोमध्येच उलगडता येतील व पुन्हा पुन्हा नवीन विंडो उघडण्याची गरज पडणार नाही.

पान १, पान २, पान ३, पान ४, पान ५, पान ६, पान ७, पान ८, पान ९, पान १०, पान ११, पान १२, पान १३,पान १४ (समाप्त)

2 comments:

  1. वाचतो आहे... कन्सेप्ट आवडली...खूप वर्षांपूर्वी होम टी.व्ही या चॅनेलवर (आता हे चॅनॅल बंद पडले आहे) चायनीज सिरियल्स हिंदीतून लागायच्या त्यांची आठवण झाली .. एकदम छान होत्या. त्यातली ’झू माऊंटन सेगा’ ह्या सिरियलचा व्हिडिओ मला आजही मिळाले तरी पहायला आवडेन.. तू ’A Chinese Ghost Story' हा चित्रपट पाहिला आहेस का? नसेल तर अवश्य पहा. एकदम सुंदर चित्रपट आहे आणि या कथानकासाठी कल्पनांच्या विश्वात भ्रमण करण्यासाठी हा चित्रप्ट नक्की मदत करेन. तुला हवा असेन तर मी अपलोड करेन.

    ReplyDelete
  2. माझ्या ब्लॉगवर तुझं स्वागत आहे, सागर. A Chinese Ghost Story हा चित्रपट मी पाहिलेला नाही. बघू, कुठे मिळतो का. मी ज्या लोकगीतावरून ही कथा लिहीली आहे. त्या लोकगीतामधे उल्लेखिलेला प्रसंग या कथेच्या शेवटच्या दोन पानांमधे येतो. जेव्हा त्या प्रसंगाबद्दल ऐकलं तेव्हाच माझ्या मनात या कथेचे विचार घोळू लागले होते पण कथा कागदावर उतरवली नव्हती. कथेला प्रणयकथेचं स्वरूप न देता, प्रेमकथा लिहिण्यासाठी थोडा विचार करणं आवश्यक होतं. शेवटी नोव्हेंबर महिन्यात अक्षरश: दोन दिवसांत कथा लिहून काढली. कथेवर कोणतेही पुनर्लेखनाचे संस्कार केलेले नाहीत. जशीच्या तशी प्रकाशित करतेय. पाहू या, वाचकांना किती आवडते ते. तू सांगितलेली मालिका मी पाहिल्याचं आठवत नाही. शोधते. मिळाली तर छानच!

    ReplyDelete