Thursday, December 24, 2009

प्लॅन्चेट – पान ३४ (समाप्त)

प्रतिक्रिया: 
जयरामकाकांनी असं म्हटल्यावर इंडिकेटर हळूहळू GOODBYE ह्या शब्दावर आला आणि थांबला.

“हेलन, तू आहेस का इथे?” जयरामकाकांनी विचारलं.

इंडिकेटर हलला नाही. काकांनी आणखी दोन-तीनदा ’कुणी आहे का इथे?’ असं मोठ्याने विचारलं पण इंडिकेटर हलला नाही.

“आपलं काम झालं.” जयरामकाका म्हणाले त्यासरशी राजेशने पटकन मनातील शंका बोलून दाखवली.

“पण सुभानरावाचं काय, काका?”

“हेलन आणि सुभानराव दोघांनाही मुक्ती मिळत नव्हती. हेलन सूड घ्यायचा होता म्हणून, तर सुभानरावाला आपल्या कृत्याबद्दल अपराधी वाटत होतं म्हणून! हेलनने तिची इच्छा पूर्ण केली, आता सुभानरावाला शिक्षा भोगण्याचं कारणच उरलं नाही. दोघांच्याही आत्म्याला मुक्ती मिळाली. राजेश, तू रितूकडे पहा. तिला जागं कर.”

राजेश रितूजवळ गेला. रितू अजूनही निपचित पडून होती. राजेशने तिच्या गालावर थपडा मारून तिला जागं केलं. रितूने डोळे उघडून पाहिलं. राजेशला समोर पाहताक्षणी तिने त्याला घट्ट मिठी मारली. राजेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला धिर देत होता.

“रितू? कसं वाटतंय आता?” अरविंदकाकांनी प्रश्न विचारला.

त्यांचा आवाज ऐकताक्षणी रितूने राजेशच्या मिठीतून स्वत:ला सोडवून घेतलं आणि ती सावरून उभी राहिली. तिच्या चेहे-यावर हलकसं स्मित होतं. तिने जयरामकाकांना पाहिलं. जयरामकाका तिच्याकडे पाहून हसले. रितू त्यांच्याजवळ गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. ती झटकन खाली वाकली. काकांनी तिला हाताला धरून उठवलं.

“नाही बेटा. आता तू रडायचं नाहीस. तुला पडलेलं वाईट स्वप्न संपलंय. आता तुझ्या आयुष्यात फक्त मंगल पहाटच असेल.”

राजेश पुढे झाला. त्यानेही काकांना नमस्कार केला.

“काका, तुमच्यामुळे आज रितू वाचलीय. मला या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता पण आता वाटतंय आपल्याला जे माहित असतं, सत्य त्यापेक्षा कितीतरी निराळं आणि विचित्र असतं. हो ना?”

“हं.” जयरामकाका हसत म्हणाले. “ह्या जगात अशी कितीतरी रहस्य दडलेली आहेत, राजेश. आपल्या बुद्धीला आकलन न होणारी, आपल्या हिशोबी मेंदूला न पटणारी. ती आपल्याला माहित नाहीत पण ती आहेत. कधी ना कधी तरी त्यातील एखादं रहस्य आपल्यासमोर उघड होतं आणि आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं.”

“खरं आहे.” राजेश म्हणाला.

ते चौघेजण बाहेर आले, तेव्हा टळटळीत दुपार झाली होती. उन्हाच्या झळांमधेही राजेशला शितल शिडकावा झाल्यासारखं वाटत होतं. त्याची रितू त्याला परत मिळाली होती. त्याने रितूकडे पाहिलं. पहिल्या भेटीत त्याला रितू जशी दिसली होती, आता ती अगदी तश्शीच दिसत होती.

समाप्त


ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

42 comments:

 1. Katha chan hoti. navin katha kevha publish karnar? Mala love stories avadtat.

  ReplyDelete
 2. धन्यवाद रचना. नवीन कथा १ जानेवारीपासून सुरू होत आहे.

  ReplyDelete
 3. कथा आवडली...बाकी 'भूल भुलैया'शी बरीच मिळती जुळती आहे..त्याचा संदर्भ सुद्धा तुम्ही दिला आहे.. पण सांगण्याची स्टाईल खुपच आवडली, रहस्य शेवटपर्यंत टिकून ठेवण्यात याचे यश आहे.आलटून पालटून लिहिलेले प्रसंग वाचण्याची उत्सुकता वाढवतात. क्रमशः लिहून सुद्धा कथा एकसंध वाटते.....एकदम मस्त

  ReplyDelete
 4. धन्यवाद आनंद. तुझ्याच प्रतिक्रियेची वाट पहात होते. तुझ्या प्रतिक्रियांमुळे कथेतील चांगलं वाईट कळायला मला खूप मदत होते. हो, तुझं बरोबर आहे. ही कथा भूल-भुलैया चित्रपटाशी मिळती जुळती झाली आहे. भुलभुलैया ह्या चित्रपटात DID म्हणजे Dissociative identity disorder या मनोविकारावर प्रकाश टाकला आहे. ह्या विकाराने ग्रस्त मनुष्य भूतबाधा झाल्यासारखाच वागतो. चित्रपटात शेवटी रहस्यभेद होतो व सत्य समोर येतं. मात्र माझ्या कथेसाठी मी मनोविकार हा भाग वगळला आहे. पण जर फक्त दोन मिनिटं आपण ह्या चित्रपटात जे घडतं आहे, त्याला अमानवी शक्ती कारणीभूत आहे, असं मानलं तर काय होईल, तेच मी प्लॅन्चेट मधे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी व्यक्तीश: भूत ह्या प्रकारावर विश्वास ठेवत नाही. मात्र कथालेखनासाठी मी भूताच्या अस्तित्वावर तात्पुरता विश्वास ठेवला आहे. त्याशिवाय लिहिताच येणार नाही.

  कथा लिहिताना सुरूवातीलाच ठरवलं होतं की एक पान, एक प्रसंग असंच लिहायचं. त्यावेळी ही कथा नेमकी कुठे चाललीय, हे मलाही माहित नव्हतं पण शेवट कसा होणार ते आधीच ठरवलं होतं. अमूक पात्र एका विशिष्ट प्रसंगात कसं वागेल, हे ठरवून लिहीत गेले. चित्रपटाचा उल्लेख केल्यानंतरही मी माझी कथा पुन्हा पुन्हा वाचली. प्रत्येक पात्राच्या जागी स्वत:ला कल्पून पाहिलं आणि विचार केला की मी या अमूक प्रसंगात कसं वागले असते, तेव्हा कथेतील एकही ओळ इकडे-तिकडे करावीशी वाटली नाही.

  ReplyDelete
 5. सॉरी, तुम्हाला वाट पहायला लावल्याबद्द्ल. कथा पुर्ण झाली तरी मला वाचायला वेळ झाला.
  पण तुम्ही वाट पाहत होता हे वाचुन अतिशय आनंद झाला. (आनंद गावात जाऊन राहातो आता) :-)
  खरं सांगु, मनोविकाराला तुम्ही खो दिला ते जास्त बरं झालं...भुताची कल्पना परवडली,
  नाहीतर भुल-भुलैया सारखी थोडी फसगत झाल्या सारखी वाटली असती, जशी मनोविकार असला तरी जड पलंग आरामात कशी उचलु शकते विद्या त्या सिनेमात...असो चित्रपट परिक्षण करायचे नाही. मला या कथेत संवादापेक्षा कथा निवेदकाच्या माध्यमातुन उलगडली ते जास्त आवडले. या पुढच्या कथेत तुम्ही एका पात्रा द्वारे कथा कथन करायला सांगा, मला वाचायला आवडेल.. :-)
  मी काही वायफळ तर नाही ना बोलत आहे...? :(

  ReplyDelete
 6. भुलभुलैया करमणूक म्हणून बरा आहे पण तो पलंगाचा प्रसंग व आणखी दोन-तीन प्रसंग प्रचंड प्रमाणात खटकतात. तू काहीच वायफळ बोलला नाहीस, उलट तुझ्या प्रतिक्रियेमुळे नवीन विचार मिळाला. धन्यवाद!

  ReplyDelete
 7. mala ek kalal nahin jar helanla subhanravacha badala gyayacha hota tar mag ti rajesh chya javal janyacha prayatna ka karat hoti

  Please do reply

  ReplyDelete
 8. प्रश्न चांगला आहे. आपण जर प्रश्न विचारताना आपलं नाव दिलं असतंत, तर उत्तर देताना आणखी बरं वाटलं असतं.

  तुम्ही या कथेचा पान क्र. १५ वरील तो प्रसंग जर नीट वाचला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की रितू राजेशच्या जवळ जाते. राजेशला काहीतरी निराळं घडतंय असं जाणवतं तेव्हा रितू बदललेली असते. रितूच्या जागी हेलन असेल तर ती जवळ आलेल्या राजेशला घाबरवेल की त्याला अपेक्षित प्रतिसाद देईल?

  ReplyDelete
 9. मी माकडासारखा इकडून तिकडे तिकडून आणि कुणीकडे असा उड्या मारत होतो. उड्या मारता मारता युट्युबवर सोनाली कुलकर्णीचा नटरंग चित्रपटातील गाण्यावरच्या परफॉर्मन्सचा एक विडिओ मिळाला, तिकडे नटरंगचं परिक्षण तुम्ही केल्याची लिंक मिळाली. ते वाचून पुढची उडी "प्लॅन्चेट"वर पडली. जेवण करुन मुव्ही बघत बसायचा बेत होता. पण प्लॅन्चेट वाचण्याच्या नादात तो फसला. आता तुमच्या ब्लॉगवर मी जास्त उड्या मारत नाही. नाहीतर बाकिचे प्लॅन्चेट व्हायचे... आय मीन प्लॅन फसायचे... हुश्श्श... छान लिहलय... पुढील सर्व लिखाणांसाठी शुभेच्छा :)

  ReplyDelete
 10. 'प्लॅन्चेट’ वाचून तुझे बाकीचे ’प्लान चीत’ झाले असले, तरी व्यवस्थित प्लान करून तु माझ्या ब्लॉगवरील इतर कथाही वाच. चित्रपट पहाण्याची आवड असल्यास सिनेमा सिनेमा सदरांतर्गत चित्रपटांचं परिक्षण लिहिलं आहे, तेही वाचू शकतोस.

  ReplyDelete
 11. हा हा... :D चित्रपट पाहण्याचा नाद नसला तरी वाचनाचा आहे. त्यामुळे सदर ब्लॉगवरील सर्व लेखांचा लवकरच फडशा पाडला जाईल ह्याची लेखिकेने नोंद घ्यावी. :P ;)

  ReplyDelete
 12. माझ्या ब्लॉगवर तुझं स्वागत आहे, सौरभ. :)

  ReplyDelete
 13. छान लिहिले आहे
  रात्रि वाचत होतो भयकथा फक्त शीर्षक पहावे म्हटले तर सर्व कथा वाचून काढली.
  रहस्य छान जपले आहे शेवटपर्यंत
  सर्व कथा वाचून जाल्या
  पुढील लेखनास शुभेच्छा

  ReplyDelete
 14. धन्यवाद आशिष,
  आणखीही कथा इथे ब्लॉगवर देण्याचा विचार आहे. बघू या कसं जमतं ते. ब्लॉगला भेट देत रहा.

  ReplyDelete
 15. Hi Kanchan,
  Nice story... keep it up. katha sangnya chi style khup chhan aahe. navin katha wachayala awadel.

  Vaishali

  ReplyDelete
 16. धन्यवाद वैशाली. लवकरच नवीन कथा पोस्ट करणार आहे तोपर्यंत मोगरा फुललावरील इतर कथा व ललित लेखन अवश्य वाचा.

  ReplyDelete
 17. अतिशय प्रवाही आणि नेटकी कथा हीदेखील. मांडणी, संवाद सगळंच आवडलं. आणि इतकी प्रवाही आहे की एकटाकी लिहून काढली आहेस असं वाटतंय. सही.

  ReplyDelete
 18. धन्यवाद हेरंब. ही कथा एकटाकी लिहीलेली नाही. उलट या कथेला जितका वेळ लागला तितक्या कुठल्याच कथेला लागला नाही. वेळच मिळत नव्हता. प्रेमकथा - सदैव मात्र मी एकटाकी लिहिली आहे. पहिल्या दिवशी पूर्ण कथा आणि दुस-या दिवशी एडिटींग केलं.

  ReplyDelete
 19. chhan story aahe.
  dolyaphude yetat sarv prasang.
  mast lihale aahe.

  ReplyDelete
 20. धन्यवाद अर्चना. आपण इतर कथाही वाचून पहा.

  ReplyDelete
 21. छान कथानक आहे, शेवटपर्यत खिळवून ठेवते........
  Keep it up

  ReplyDelete
 22. धन्यवाद, प्रसीक आणि मैथिली

  ReplyDelete
 23. kahtha chan hoti next horror stori kadhi publish karnar.

  ReplyDelete
 24. नवीन भयकथा येण्यास थोडा विलंब लागेल, त्याआधी रहस्यकथा प्रकाशित होईल.

  ReplyDelete
 25. कथानक अप्रतिम

  कदाचित आपण एखादा मराठी सिनेमा काढाल नक्की यश मिळेल.
  पुढील लेखनास शुभेच्छा

  संतोष जाधव
  जुहु मुंबई.

  ReplyDelete
 26. katha chan ahe..pan kahi tari navin twist hawa hota...

  ReplyDelete
 27. प्रतिक्रियेसाठी आभार. पुढच्या भयकथेत अनपेक्षित ट्विस्ट देण्याचा प्रयत्न अवश्य करेन.

  ReplyDelete
 28. Very nice Kanchan........
  i really like it....actually mala asha katha vachayala khup aavadtat. aani hi katha tar mala khupach aavadliy. me majhya friends na pun he link forward keliy.....very nice.

  ReplyDelete
 29. धन्यवाद दीपा, अशाच चांगल्या कथा देण्याचा प्रयत्न करेन.

  ReplyDelete
 30. एकाच बैठकीत कथा संपूर्ण वाचून काढली. भूत म्हटले की आज पर्यंतफक्त वाईट बाजू दाखवली गेली आहे. परंतु विचाराना एक नवी दीशा देऊन आपल्या संस्कृतीत परस्त्री ही कधीच सूडासाठी वापरली गेली नाही आणि वापरली तर कशी दशा होते...छान कल्पना. भुते आपणच केलेल्या कुकर्माची फळे आहेत. आणि ती मेल्यावर पण आपली मानगूत सोडणार नाहीत.

  ReplyDelete
 31. नमस्कार भारती,
  मी स्वत: भुताखेतांवर विश्वास ठेवत नाही. ही कथादेखील काल्पनिकच पण मी तुमच्या विचारांशी १००% सहमत आहे. आपलीच कुकर्मे आपल्याला भूत बनून सतावतात.

  प्रतिक्रिया उशीरा प्रकाशित केल्याबद्दल दिलगीर आहे.

  ReplyDelete
 32. कथा खूप छान होती वाईट वाटते की हा ब्लॉग मला आधी का नाही सापडला. पण खराच सांगतो कथा वाचे पर्यंत पूर्ण अंग शहर्ले होते. पण कथा खूप सुरेख होती. असे वाटले की कुठे मी एखादा सीनिमा पाहतो आहे की काय. प्रटेक वेळेला उसूकता दाटून येत होती आता पुडे काय घडणार. एक दम निराळी होती एक डम झकास. आता मी वाट पाहतो आहे. ती हंगामा पूर्ण होनाची.
  आपण एक दम वेगळ्या धाटणीच्या लेखिका आहात. आता सगळ्या कथा मी वाचायला ह्व्यात. पुढील कथा साठी शुभेच्या. हंगामा च्या नव्या कताची आटुरतेने वाट पाहतोय.
  एक शुभेचूक
  विवेक खोत

  ReplyDelete
 33. कथा खूप छान होती वाईट वाटते की हा ब्लॉग मला आधी का नाही सापडला. पण खराच सांगतो कथा वाचे पर्यंत पूर्ण अंग शहर्ले होते. पण कथा खूप सुरेख होती. असे वाटले की कुठे मी एखादा सीनिमा पाहतो आहे की काय. प्रटेक वेळेला उसूकता दाटून येत होती आता पुडे काय घडणार. एक दम निराळी होती एक डम झकास. आता मी वाट पाहतो आहे. ती हंगामा पूर्ण होनाची.
  आपण एक दम वेगळ्या धाटणीच्या लेखिका आहात. आता सगळ्या कथा मी वाचायला ह्व्यात. पुढील कथा साठी शुभेच्या. हंगामा च्या नव्या कताची आटुरतेने वाट पाहतोय.
  एक शुभेचूक
  विवेक खोत

  ReplyDelete
 34. visionsoftplus,

  ब्लॉगवर स्वागत आहे. हंगामा लवकरच पूर्ण होईल. गेले काही दिवस व्यक्तीगत कामांमुळे कथा पूर्ण करता आली नव्हती. असेच ब्लॉगला भेट देत रहा व आपला अभिप्रायही कळवत रहा. धन्यवाद.

  ReplyDelete
 35. कथा सुंदरच आहे.

  राजेशला गावाकडे जाताना अनोळखी व्यकती एक shortcut सुचवते, तो दुवा नंतर सुटून गेला आहे का? मला वाटलं होतं, की त्या संदर्भात कुठे तरी एखादा twist येईल.

  ReplyDelete
 36. नाही. हा दुवा सुटलेला नाही. मला तो प्रसंग तिथेच संपवायचा होता.

  ReplyDelete
 37. छान आहे कथा.. खटकलेली एकच गोष्ट - धाब्यावर अनोळखी माणूस राजेशला जेव्हां रस्ता सांगतो त्यावेळी राजेशच वाक्य मला खटकलं "ठिक आहे, वेळ वाचला तर चांगलच आहे, पेट्रोल पण वाचेल."
  ज्याच्या कुटूंबावर इतका बाका प्रसंग आलाय, ज्याची पत्नी जीवन मरणाच्या मध्ये हेलकावे खातेय त्याला 'पेट्रोल वाचेल' असले शुल्लक विचार येतील तरी का मनात?
  बाकी उत्तम आहे कथा..

  ReplyDelete