Wednesday, December 30, 2009

नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 
’मोगरा फुलला’ ने १ डिसेंबर २००९ रोजी एक वर्ष पूर्ण केलं. या एका वर्षात मला तुम्हा सर्वांकडून भरभरून प्रेम मिळालं. लेखनासाठी आपुलकीच्या, वडीलकीच्या सूचना मिळाल्या, मित्र-मैत्रीणीही मिळाले. पुढच्या वर्षी जर मला लिहीण्याचा उत्साह असलाच, तर तो तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे आणि पाठींब्यामुळे असेल.

२००९ बरंच काही देऊन गेलं आणि बरंच काही घेऊनही गेलं. ब-या वाईट जुन्या आठवणी आणि भविष्यासाठी नवीन स्वप्नं उराशी बाळगून मी सरत्या वर्षाला अलविदा करतेय आणि येत्या वर्षाचं स्वागत! तुम्हा सर्वांची स्वप्न, आशा, इच्छा, आकांक्षा येत्या नवीन वर्षात पूर्ण होवोत.

उद्या मी बहुधा पूर्ण दिवस ऑनलाईन नसेन. शिवाय, शुभेच्छा देण्यासाठी पहिला नंबर लावण्याचा मोह आवरत नाहीये.

नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! हसत-खेळत नवीन वर्षाचं स्वागत करा!11 comments:

 1. हाहाहा...!!! पहिला नंबर तर मी काल रात्रीच लावून टाकलाय :-)
  नववर्षाच्या शुभेच्छा!!!

  ReplyDelete
 2. असं होय? हाहा! मला वाटलं ती भाग्यवान मीच! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 3. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा..God Bless you

  ReplyDelete
 4. धन्यवाद सुहास. नववर्षाच्या शुभेच्छा! ईश्वरकृपेने आपले सर्व मनोरथ पूर्ण होवोत.

  ReplyDelete
 5. तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!
  नविन वर्षात तुमच्या कडुन अपेक्षा वाढल्यात, खुप कथा वाचायच्यात..:-)
  तुमच्या मार्गदर्शनाखाली शिकायचे आहे, आणि तुमचा स्नेह असेल ही अपेक्षा.
  खुप धन्यवाद!

  ReplyDelete
 6. सर्वांचा पाठिंबा असावा आणि माझ्या हातून चांगल्या कथा लिहिल्या जाव्यात हीच माझीही इच्छा आहे. मला इतकी मोठी करू नकोस. मी स्वत:देखील शिकते आहे. आपण दोघंही शिकू एकमेकांकडून :-)

  ReplyDelete
 7. बरेच दिवस तुमच्या सार्‍या कथा वाचेन असं म्हणतोय. नवीन वर्षात नक्की वाचून पूर्ण करेन. नविन वर्षाच्या शुभेच्छा.

  ReplyDelete
 8. जरूर वाचा. येत्या १ जानेवारी पासून नवीन कथा क्रमश: प्रकाशित होणार आहे, तीही वाचा. माझ्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे.

  ReplyDelete
 9. तुलाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

  -अनामिक

  ReplyDelete
 10. HAPPY NEW YEAR TO ALL INDIAN

  ReplyDelete