Thursday, December 24, 2009

मीही टॅगलं बुवा!

प्रतिक्रिया: 
सगळ्यांनी टॅगा टॅगी सुरू केल्यावर मला कळेना, हा काय प्रकार आहे? भाग्यश्रीने मला टॅगल्यावर म्हटलं, हा प्रकार आधी समजून घ्यावा म्हणून आजूबाजूचे ब्लॉग पाहिले आणि प्रकरण ध्यानात आलं. तर आता मी टॅगतेय. खरं तर प्लॅन्चेट पूर्ण केल्यावर टॅगायचा विचार होता पण मन वढाय वढाय...

एका शब्दात माहिती देण्याचा निष्फळ प्रयत्न केलाय. काय हे? बडबड करणा-या लोकांना एका शब्दात माहिती लिहायला सांगणं ही किती मोठी शिक्षा आहे!

1.Where is your cell phone?
असेल कुठेतरी. कुणाचा फोन आला की रिंग वाजेलच.

2.Your hair?
गळतायंत (औषध सुचवा)

3.Your mother?
साधीभोळी

4.Your father?
आयडियांचा खजिना

5.Your favorite food?
आईच्या हातचं काहीही आणि काहीही गोड (मेसूर सोडून)

6.Your dream last night?
मी बारीक झालेय

7.Your favorite drink?
बासुंदी (आईच्या हातची असेल तर काय? अहाहा!)

8.Your dream/goal?
स्वत:साठी काम करायचं (जे मी हल्ली करते)

9.What room are you in?
स्टडी रूम

10.Your hobby?
एक का आहे?

11.Your fear?
कॉम्प्युटर व्हायरस

12.Where do you want to be in 6 years?
नव-याबरोबर कुठेही

13.Where were you last night?
घरीच.

14.Something that you aren’t diplomatic?
मुळात डिप्लोमॅटिक व्हायचंच कशाला? अपना तो एकही फंडा- सीधी बात.

15.Muffins?
सिनमन - गेलॉर्ड चर्चगेटचा

16.Wish list item?
नवीन एक्स्टर्नल हार्ड डिस्क 1TB

17.Where did you grow up?
ठाणे

18.Last thing you did?
जेवले (कश्मिरी बिर्यानी, मसाला दाल, एग चटनी पॅटीस, दही, पापड - आता कळलं माझ्या स्वप्नाचं रहस्य?)

19.What are you wearing?
सलवार कमीझ (सध्या ट्रेंडी, ट्रेडिशनल आणि कम्फर्टेबल असा तोच एक प्रकार उरलाय माझ्या आयुष्यात ;-))

20.Your TV?
बंद आहे. (ब-याचदा बंदच असतो.)

21.Your pets?
बब्बड. (पोपट - आता तो नाही.)

22.Friends
मोठी लिस्ट आहे

23.Your life?
परफेक्ट. (जसं हवं होतं अगदी तसंच आहे.)

24.Your mood?
खास खुशीत आहे. (आता ख्रिसमस डेकोरेशन करायचंय ना!)

25.Missing someone?
हो. बब्बड.

26.Vehicle?
आहे पण मला चालवता येत नाही.(तेच बरं आहे - कशाला उगाच लोकांच्या मनात आपल्याबद्दल दहशत निर्माण करा.)

27.Something you’re not wearing?
माज, अहंकार

28.Your favorite store?
जिथे भरपूर रंग पहायला मिळतील असं कुठलंही!

29, Your favorite color?
पांढरा

30. When was the last time you laughed?
आत्ता थोड्या वेळापूर्वी (काकांना, ’पप्पू कान्ट डान्स साला” वर डान्स करताना पाहिलं तेव्हा!)

31. Last time you cried?
२६/११

32. .Your best friend?
नवरा, पुस्तकं आणि आयुष्यात मला आलेले अनुभव

33. One place that you go to over and over?
डबिंग स्टुडिओ

34. One person who emails me regularly?
बरेच जण आहेत की. (वाचक, मित्रमैत्रीणी, भाऊ)

35. Favorite place to eat?
जिथे चांगलं खायला मिळेल, ती कुठलीही.

भायश्रीने मला टॅगल्याबद्दल तिचे आभार. आता मी भाग्यश्री, सहजच, देववकाका, रानडेकाका, गोळे काका, श्रेया, सिद्धार्थ, मंदार, पंकज, विशाल, सागर, मुदिता, मदनबाण, सई, विरेंद्र, आनंद, विशुभाऊ, अनामिकआणि माझ्या सर्व वाचकांना टॅगते आहे.

20 comments:

 1. कधीपासुन वाट पाहत होतो मला कुणी टॅगतय का? टॅगल्याबद्दल धन्यवाद. आज कोकणात चाललोय. बघू जमलं तर मी पण आजचं टॅगतो.

  बाकी मला Something you are not wearing या प्रश्नाचं उत्तर फार आवडलं.

  ReplyDelete
 2. धन्यवाद सिद्धार्थ, तुझ्या सवडीने टॅगा टॅगी कर.

  ReplyDelete
 3. प्रश्न १८ चे उत्तर..
  आज कमी जेवलात का ? :)
  मला टॅगल्याबद्दल धन्स...
  कॅनवास ऐवजी इथे टॅगवलयं...
  http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/blog-post_24.html

  ReplyDelete
 4. हो, आज कमीच जेवले. डाएटिंग करतेय ना! स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचंय. लिंक चेक करेन. धन्यवाद!

  ReplyDelete
 5. तुम्हाला नाताळाच्या हार्दीक शुभेच्छा!!!

  ReplyDelete
 6. तुलाही नाताळच्या हार्दिक सुभेच्छा, आनंद!

  ReplyDelete
 7. वा वा मला टॅगल्या बद्दल धन्यु!
  मला मी स्वप्नातही बारीक झाल्याचं दिसत नाही :)

  ReplyDelete
 8. अगं तुला स्वप्नं तरी पडतात... मला तर बारीक झाल्याचं स्वप्नही पडत नाही!

  ReplyDelete
 9. धन्यवाद! सध्या तेच एक स्वप्न बनलंय. म्हणून झोपल्यावरही तेच स्वप्नात दिसतं.

  ReplyDelete
 10. मनातून असं वाटतं की बारीक व्हावं पण त्यासाठी करण्याचे उपद्व्याप पाहिले की नको वाटतं. म्हणून स्वप्नरंजन, दुसरं काय? ;-)

  ReplyDelete
 11. बारीक काय अन जाड काय.. मजा करा हो.. आता न्यु इअर आहे..
  आणि हो , आमच्याही घरी पोपट होता...सेम टु सेम..

  ReplyDelete
 12. हो, तेच ना महेंद्रजी. तरी मला वाटतंच, की इतकी काही मी जाडी नाही. हे आजूबाजूचे लोक आपले उगाचच....

  आता मी मुळीच प्राणी, पक्षी पाळण्याच्या फंदात पडणार नाही. फार त्रास होतो.

  ReplyDelete
 13. ताई, मला का टॅगलं अन हा टॅगा-टॅगी काय प्रकार आहे, ते तुझी ही पुर्ण पोस्ट वाचून अजुनही माझ्या ध्यानात/लक्षात आलेलं नाहिये...(मला चिवचिवाट मेसेजिंग द्वारे समजेलचं म्हणा...!)
  हं, तुझ्याबद्दल म्हणायचं झालं तर, शेवटी थोडीफार चरबी असल्यानं काय होतं.. हं, तसा त्यो पंक्या त्या करीनासारखा झिरो फिगर आहे म्हणा, पण आता तर त्यो बी वजन वाढवायच्या मागे लागलायं... ;)

  ReplyDelete
 14. टॅगायचं म्हणजे जर कुणी आपलं नाव ’टॅगलं’ असं लिहिलं असेल, तर आपल्याबद्दल माहिती लिहायची. वर आहेत, तेच प्रश्न. उत्तर तुमची. मला ज्यांनी पूर्वी बारीक पाहिलेलं आहे, त्यांना आत्ता मी गलेलठ्ठ वाटते, एवढंच. पण ते सारखं सारखं बोलू दाखवतात, मग मला किनई कॉम्प्लेक्स येतो, हा हा! मला सांग, पंकजचं वजन आत्ता आहे, त्याच्या दुप्पट झालं तर तो कसा दिसेल रे? ;-)

  ReplyDelete
 15. मला टॅगल्या बद्दल मनापासून आभार .. पण मी माझ्या या http://v-render.co.in/ ब्लॉग्वर लिहित नाही वैयक्तिक गोष्टी. मी इथे http://manatlakahi.blogspot.com लिहिलय हे .. तुम्ही वरील लिंक ला टॅगल्यामुळे थोडा कळायला उशीर झाला .. मी पोस्ट कालच लिहीली आहे !! :)

  ReplyDelete
 16. तुला कुठे कमेंट टाकावी, तेच कळेना.

  ReplyDelete
 17. Thanks for visiting my blog and commenting on "Tag" post..

  Liked your blog very much...The vibrant template says it all..

  ReplyDelete
 18. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद मुग्धा.

  ReplyDelete
 19. कांचन,
  मला भेट द्यायला उशीर झाला व्हेरी सोर्र्री. पण काल नेट धड नव्हते, व आधी मी आजारी होते. आता ओके. तुझा बात करण्याचा फंडा मस्त वाटला. तू बाब्बड ला मिस करतेस साहजिकच आहे. पण त्याआधी तू प्रेमळ आहेस. हे तरी समजल. एक छान. स्वच्छ पारदर्शक स्वभावाची आपली मैत्रीण आहे. यालाच म्हणतात न tag चे नाते.....बारीक होणे हा माझ्या करिता आयुष्याचा छंद आहे. मस्त लिहिलस, जशी आहेस तस्स कळल म्हणून तर मैत्री साठी आले.....तू ठाण्याची अग मी पण....क्या बात है.
  आता कुठे राहतेस??? आणि हो तू ज्यांना tag दिलास त्यांच्या इथेही जावून येते. बरेच जण पहिल्यांदा कळले. अजून मैत्री वाढती राहणार. चल बाय.

  ReplyDelete
 20. धन्यवाद! तुम्हाला प्रतिसाद द्यायला उशीर झाला कारण अचानक डबींग आलं आणि दिवसभर त्यातच अडकून पडले. सध्या मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण हे निवासस्थान आहे. मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. या टॅगींगमुळे बरेच नवीन ब्लॉग कळले, ओळखी झाल्या. फार बरं वाटलं. तुम्ही टॅगींगवर प्रतिसाद दिलात, यात सर्व भावना पोचल्या. ही मैत्री अशीच टिकून राहू दे.

  ReplyDelete