Thursday, October 1, 2009

प्लॅन्चेट - पान १०

प्रतिक्रिया: 
“हे काय?” अमितच्या हातातील मोठ्या पार्सलकडे पहात रितूने विचारलं.

“पाट आहे पाट. बसण्यासाठी!

“....आणि या मेणबत्त्या कशाला? वातावरण निर्मितीसाठी?” रितूने हसत हसत विचारलं.

“हो, हो.” तिच्याकडे चुटपुटत्या नजरेने पहात अमित म्हणाला.

“बराय. चालू द्यात तुमचे उद्योग. पण जरा आटोपतं घ्या. मला तासभर तरी लागेल जाऊन यायला तोपर्यंत आटोपेल ना तुमचं?”

“अगदी नक्की?”

“किचनमधे तुमच्यासाठी खायला करून ठेवलंय, भूक लागली तर खा.”

“ओ.के. थॅंक यू, वहिनी.”

“मनू चल, आपण जाऊन येऊ.” रितूने मनूचा हात धरला.

“मी नाय येत.”

“अरे...?”

“मला साहिलकाकासोबत खेळायचंय.”

“तो खेळणार नाहीये. त्याचं नि त्याच्या मित्राचं काहीतरी काम आहे.”

“चालेल. मी त्यांना कामात मदत करेन.”

“डोंबलाची मदत! तू उगाच त्यांना डिस्टर्ब करत रहाशील.”

“नाय करणार. मी गुड बॉयसारखा कोप-यात बसून राहीन. ते काय करतात ते बघेन.”

मनू रितूला अशी गळ घालत असतानाच अमितने साहिलला खूण करून मनूला थांबवून घ्यायला सांगितलं.

“अं.... वहिनी, राहू दे द्याला इथंच. आम्ही सांभाळू.”

“पण तुमचं काम?”

“काही काळजी करू नका. तो नाही डिस्टर्ब करायचा.” अमित म्हणाला.

“तुम्ही असं म्हणताय, तर ठिक आहे. पण त्याला घराबाहेर एकटयाला सोडू नका हं. गाव त्याच्यासाठी नवीन आहे.”

“नाही सोडणार.” साहिलने मनूला जवळ घेत म्हटलं.

“मग मी निघते. सांभाळून रहा रे तिघांनी.”

“हो वहिनी. बाय.”

मनू रितूला टाटा करत असताना अमित साहिलच्या कानात कुजबुजत होता.

“अरे अशा कामात लहान मुलांची एकाग्रता खूप कामी येते म्हणे. बघू, ह्या छुटकुचा काही उपयोग होतो का. नाहीतर त्याला त्याच्या आईच्या रूममधे थोडावेळ बंद करून ठेवू. सांगू, आम्ही लपाछपी खेळत होतो. काय?”

साहिलने हसत हसत अमितच्या हातावर टाळी दिली.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment