Thursday, October 1, 2009

प्लॅन्चेट - पान ८

प्रतिक्रिया: 
"जेव्हापासून मी या गावात आले, दादा! तू गावात नाही फिरलास पण मी आणि राजेश गावातल्या काही महत्त्वाच्या घरी जाऊन आलोय. ह्या घराच्या व्यवहाराची गोष्ट निघाली की प्रत्येकचा चेहे-यावरचे हावभाव बदलतात. लोक...."

"बास करा." राजेश पल्लवीसमोर दोन्ही हात फटकन जोडत म्हणाला. "मला ह्या सगळ्यात मुळीच इंटरेस्ट नाही. उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे. तयारीला लागा." इतकं बोलून राजेश बाहेर पडला.

रितू खाली मान घालून उभी होती. पल्लवीने जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला.

“वहिनी, माझाही भुता-खेतांवर विश्वाास नाही पण ज्या पद्धतीत जागेचा व्यवहार झाला, ज्या प्रकारचं वातावरण ह्या गावात आहे, त्यावरून मलाही असंच वाटतं की ह्या जागेपासून सुटका करून घेण्यासाठीच हा व्यवहार झालाय आणि कारण दुसरं तिसरं काही नसून तुला वाटतं तसंच आहे.”

“पल्लवी, तुम्ही सर्वांनी सुखी आणि सुरक्षित रहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. म्हणूनच मी हे पाऊल उचलतेय. मी असं म्हणत नाही की इथे भूतबित काही असेल पण तूच सांग, असा ड्रेस आपल्याला शहरात सुद्धा पहायला मिळत नाही, तोच ड्रेस इथल्या स्टोअर रूममधे कुजत पडला होता, ही विचार करण्यासारखी गोष्ट नाही?”

“आहे. म्हणूनच मी तुझी बाजू घेऊन बोलले.”

“पल्लवी, उद्या मला महादूच्या आजोबांना भेटायला जायचं आहे. या गावातील सर्वात जुना असा तोच माणूस आहे म्हणे. मला उद्या मुंबईला यायला जमणार नाही. कसंही करून राजेशला आपलं जाणं दोन दिवस पुढे ढकलावं लागेल असं काही करता येईल का गं?”

“चान्सेस कमी आहेत. तुला तर माहित आहे, दादा कसा अहे ते?”

“तर मग तुम्ही जा. मी दोन दिवसांनी येईन घरी.”

“वहिनी, इतकं काय महत्त्वाचं आहे?”

“नाही पल्लवी. आपण एकदा मुंबईला गेलो तर पुन्हा केव्हा येऊ सांगता येईल का? राजेश इथे जागेच्या कामासाठी पुन्हा पुन्हा येत रहाणार. तिकडे आपल्या जिवाला घोर. त्यापेक्षा मला दोन दिवस इथे राहू देत.”

“मग मी सुद्धा थांबते तुझ्यासोबत.”

“अजिबात नाही. राहूलला त्याच्या कामात मदत करण्याचं प्रॉमिस केलयंस तू. ती जबाबदारी टाळून कसं चालेल? शिवाय आता एका महिन्यावर लग्न आलं तुझं. पत्रिकेचं डिझाईन निवडायला राहूलसोबत तुलाच जायचंय ना? मग हे काम या दोन दिवसात उरकून घ्या. मी आले की पुढच्या कामांची वाटणी करून घेऊ.”

“आर यु शुअर?”

“अगं म्हणजे काय? एकटी आहे का मी इथे? अरविंदकाका आहेत, साहिल आहे आणि मनूला मी नाही पाठवणार तुमच्यासोबत.”

“ठीक आहे.”ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment