Thursday, September 17, 2009

वा! प्रियांका तुस्सी तो छा गये हो!

प्रतिक्रिया: 
काल प्रियांका चोप्राची वेबसाईट पाहिली. अजून काहीच नाहीये तिथे पण होमपेजवर तिचा फोटो पाहून मस्त वाटलं. शिवाय जोडीला एक छानशी ट्यून वाजत होती, ती पण आवडली. नवरा म्हणतो, "ओळखा पाहू चेहरा, सारख्या पेपर मधल्या क्विझमधे तो प्रियांकाचं नुसतं स्माईल पाहूनच तिला ओळखू शकतो. एकवेळ ऐश्‍वर्याला तिचे डोळे पाहून नाही ओळखता यायचं पण प्रियांकाचं स्माईल म्हणजे सिंपली ब्युटीफुल! लाखात एक!"

तिचं हसणं तसं आहे खरं. प्रियांकाचं हसणं पाहिलं की ’मोत्यांची उधळण करीत हसणं” म्हणजे काय, ते लगेच समजतं. खरं तर प्रियांका आधी इतकी आवडायची नाही मला. तिचा ’अंदाज’ मधला रोल तर अगदीच ’छ्या’ वाटला. पण ’ऐतराज’ मधे तिने कमाल केली. करिना कपूरसाठी ऐतराज पाहिला पण लक्षात राहिली ती प्रियांका चोप्रा. तिची खलनायिका नायिकेपेक्षाही सुंदर दिसली, वाटली.

Official Site: IAMPRIYANKACHOPRA.COM


'दोस्ताना' मधल्या गोल्डन बिकिनी पेक्षाही ती ’देसी गर्ल’ या गाण्यात जास्त सुंदर दिसली असं मला वाटतं. साडी नेसलेली प्रियांका एखाद्या कोरीव लेण्यासारखी वाटत होती. गेल्या आठवड्यात तिचा ’कमिने’ पाहिला. त्यात ती मराठी वगैरे वाटत नव्हती. मात्र एका मध्यमवर्गीय मुलीची भूमिका तिने चांगली वठवली होती. पोरीने मोजकेच मराठी संवाद म्हटलेत पण त्यात हिंदी उच्चार येणार नाहीत याची पुरेपुर काळजी घेतलीय.

तिचे एक-दोन इंटरव्ह्यू पाहिलेत मी. इतर अभिनेत्रींसारखी नाही बोलत ती. एखाद्या मित्राशी मनमोकळेपणाने बोलावं तसं बोलताना दिसते. मला तर आवडली बाबा तिची बोलण्याची स्टाईल!

What's Your Raashee?


आता तिचा ’व्हॉट्स युवर राशी’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तिच्या निरनिराळ्या राशींच्या तरूणी साकारलेल्या बारा भुमिका पहाण्याची खूप उत्सुकता लागून राहिलीय. प्रियांका सुंदर तर आहेच, शिवाय अभिनयही तितकाच उत्कट करते हे तिने आता सिद्धच केलंय. आता चेरी ऑन टॉप म्हणजे तिच्या एकाच चित्रपटातील या बारा भुमिका. या भुमिकांमुळे तिला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मधेही जागा मिळणार आहे म्हणे.

आता तर म्हणावंच लागेल, "वा! प्रियांका तुस्सी तो छा गये हो!"2 comments:

  1. व्हाट्स योर राशीचा एक रिव्यू होवुन जावु द्या नं मग ?

    ReplyDelete
  2. या चित्रपटाबद्दल लिहीणार होते. VYR आणि ब्ल्यू या दोन चित्रपटांच्या जाहिरातींनी माझी उत्सुकता इतकी ताणली होती की मी मिळेल त्या शोचं तिकिट बुक करून हे दोन्ही चित्रपट पाहिले. चित्रपट पहाताना कळलं की जितका जाहीरातीत दाखवला होता, प्रत्यक्षात तेवढाच चित्रपट पहाण्यासारखा होता. VYR मधे प्रियांकाचा अभिनय आणि ब्ल्यू मधे समुद्र या दोनच गोष्टी पहाण्यासारख्या असूनही नेमका या दोन गोष्टींनाच कमी वाव मिळाला आहे. तरीसुद्धा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा VYR बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करेन.

    ReplyDelete