Friday, August 14, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान २७

प्रतिक्रिया: 
एक पंचवीस-सव्वीस वर्षांचा तरूण साक्षिदाराच्या पिंज-यात येऊन उभा राहिला. मान खाली घालूनच तो उभा होता. समीरने त्याला पहिला प्रश्ना विचारला.

“मि. ठाकूर, प्रिया जगतापशी तुमची ओळख किती वर्षांपासूनची आहे?”

“मी तिला गेली ४-५ वर्षं माझ्या भावासोबत फिरताना पाहिलं होतं.”

“तुमच्या भावाने म्हणजे मनोज ठाकूरने आत्महत्या केल्यानंतर आरोपीवर फसवणूकीची केस दाखल करण्यात तुमचा पुढाकार होता?"

“हो. तिने लग्नाची खोटी वचनं देऊन माझ्या भावाला फसवलं. त्यामुळे त्याने आत्महत्या केली होती. म्हणून मी तिच्यावर केस दाखल केली.”

“मयत दिपक बागवेशी तुमची ओळख कशी काय झाली?”

“मी त्याला ओळखत नाही.”

“नक्की?”

“हो.”

“मग त्याच्या मोबाईलमधे तुमचा नंबर कसा काय आला?”

“ते मला माहित नाही.”

“ऑलराईट. युवर ऑनर, माझी कोर्टाला अशी नम्र विनंती आहे, की साक्षिदाराच्या पिंज-यात उभ्या असलेल्या महेश ठाकूरांच्या बोटांचे ठसे घेण्यात यावे आणि ते ठसे कारच्या डिकीवर सापडलेल्या ठशांची जुळवून पहावेत.”

“का? का पण असं?” बॅ. खंदा-यांनी प्रश्‍न विचारण्याची संधी सोडली नाही.

“कारण महेश ठाकूरचा ह्या केसशी जवळचा संबंध आहे.” समीर ठाम स्वरात म्हणाला.

“पण ही केस सुरू होताना तुम्हीच म्हणाला होतात ना, की आरोपीच्या पूर्वायुष्याचा या केसशी संबंध नाही म्हणून?”

“नो! मी म्हणालो होतो की आरोपीच्या पूर्वायुष्यात जे काही घडलं त्याचा या केसशी संबंध नाही. पण त्या केसचा ह्या केसशी फार जवळचा संबंध आहे.”

“अच्छा! मग सिद्ध करा ना!”

“तेच करत होतो, तर तुम्ही मधेच प्रश्नप विचारलात.”

बॅ. खंदारे काही न बोलता खाली बसले. समीरने पुन्हा बोलायला सुरूवात केली.

“युवर ऑनर, कृपया महेश ठाकूर यांच्या बोटांचे ठसे गाडीच्या डिकीवर मिळालेल्या ठशांशी तपासून पहावेत.”

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment