Monday, August 10, 2009

गॉड ब्लेस यू... - पान २०

प्रतिक्रिया: 
“प्रिया, इथे आल्यापासून माझ्या आई-बाबांना वाटतंय की मी खूप पैसे कमावतोय पण माझी काय परिस्थिती आहे, ते मलाच माहीत. त्यातच तुला मी रोज अमोलबरोबर पाहिलं त्यामुळे माझा राग आणखीनच भडकला.”

“म्हणजे? मला समजलं नाही?”

“प्रिया, खरं सांगू का? नाशिकला कॉलेजमध्ये असल्यापासूनच तू मला खूप आवडायचीस. पण मजोजने तुला प्रपोज केलं आणि माझ्या मनातली गोष्ट तुला सांगायची राहूनच गेली. नंतर तू मनोजलाही नकार दिलास तेव्हा समजलं की मनोज तुझा फक्त मित्रच होता.

पण इथे आल्यावर अमोलला तुझ्याशी बोलताना पाहिलं आणि पुन्हा जीवाचा तडफडाट झाला. त्या रागाच्या भरातच मी तुझ्याशी काही बाही बोललो.

पण मला आता समजून चुकलंय प्रिया. तुझ्यासारख्या सुंदर आणि सुशिक्षित मुलीला तसाच तोलामोलाचा नवरा मिळणं योग्य आहे. मी काय.... एक साधा ड्रायव्हर.... तुझ्या प्राप्तीची नुसती स्वप्नं पाहू शकतो मी.”

माझा दिपकच्या बोलण्यावर विश्वाहस बसला.

“दिपक, तुझ्या भावना मी समजू शकते. पण तु काय नि अमोल काय, मी लग्नाचा विचारच करत नाहिये आत्ता. मला सध्यातरी प्रेम, लग्न ह्या भानगडीत पडायचं नाहिये. तुझ्या मनात माझ्याबद्दल अजूनही काही असेल, तर प्लीज काढून टाक.”

“हो. मला चांगलं समजलंय ते. मला माफ कर प्रिया. मला तुझ्याकडून काही नको. फक्त त्यादिवशीच्या माझ्या वाईट वागणूकीबद्दल मला क्षमा कर.”

“अरे, माफी कसली मागतोस? तुला तुझी चूक कळली ना मग बास.”

“नाही नाही, असं नाही.....याचा अर्थ तू मला माफ केलं नाहीस प्रिया.”

“अरे! आता काय केलं म्हणजे तुझी खात्री पटेल?”

“मला माफी आणि आपली पुन्हा मैत्री या दोन्ही गोष्टींसाठी, हे घे....हे चॉकलेट खा.”

दिपकने मला एक चॉकलेट खायला दिलं. मी त्याला माफ केल्यामुळे नव्याने झालेल्या आमच्या मैत्रीचं प्रतिक म्हणून. पण का कोण जाणे मी ते चॉकलेट खाल्लंच नाही. त्याच्या न कळत मी ते चॉकलेट गाडीतून बाहेर फेकलं. त्यानंतर गाडीत एफ. एम. रेडिओवर सुंदर जुनी गाणी लागली होती. डोकं मागे सीटवर टेकवून मी गाणी ऐकत होते. केव्हा डोळा लागला कळलंच नाही. नंतर मला जाग आली ती ’त्या’च जागी...”

प्रियाच्या डोळ्यासमोर त्या दिवशी घडलेला प्रसंग जसाच्या तसा साकार झाला...

ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment