Saturday, August 1, 2009

गॉड ब्लेस यू... - पान १३

प्रतिक्रिया: 
“युवर ऑनर, माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की केवळ अंदाजाच्या जोरावर जर अमोल प्रभाकरचं वक्तव्य ग्राह्य धरलं जाणार असेल, तर त्याची साक्ष रद्द करण्यात यावी कारण त्याने या केसच्या संदर्भात भरीव असं काहीच साक्षित सांगितलेलं नाही....”

“युवर ऑनर, युवर ऑनर....” बॅ. खंदारे काही बोलू पहात होते पण समीरने त्यांना पुढे बोलूच दिलं नाही.

“वेट मि. खंदारे, माझं बोलणं अजून संपलेलं नाही. चला, एक मिनिट आपण मान्य करू की प्रियाचं अमोलवर प्रेम होतं आणि ती बरंच काही सूचक अमोलला बोलायची. बरोबर ना अमोल?”

“ह.... हो.”

“कुठे भेटून बोलायची?”

“कधी गाडीत बसल्यावर...”

“गाडीत? गाडीत दिपक ड्रायव्हिंगला असताना, प्रिया इतकी हिम्मत करत असेल, तर याचा अर्थ प्रियाचं दिपकवर कधीच प्रेम नव्हतं आणि दिपकचं प्रियावर प्रेम असेल, तर प्रियाला त्याची कल्पना नव्हती.”

“....क्‍ कॅन्टीनमध्ये बोलायची.”

“कॅन्टीनमध्ये? मि. प्रभाकर, माझ्याकडे तुमच्या आणि प्रियाच्या ब्रेक्सचा रेकॉर्ड आहे. तुमच्या शॉर्ट ब्रेकचं आणि लॉन्ग ब्रेकचंही टायमिंग एकमेकांशी अजिबात जुळत नाही. कॅन्टीनमध्ये कसा काय वेळ काढत होती ती तुमच्याशी सूचक असं बोलायला?

प्रियाने आठवडाभर बडींग केलं पण नंतर ती इतर एक्झिक्युटिव्हप्रमाणेच स्वतंत्र काम करत होती. त्यावेळेस फ्लोअरवर तर तुम्हाला लॉग आऊट झाल्याशिवाय एकमेकांशी असं काही बोलण्याचीही संधी नाही. मग?”

“तिची.... ती.... एकदा तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती मेडिकल रूममध्ये झोपली होती, तेव्हा मी तिची चौकशी करायला गेलो होतो, तेव्हा म्हणाली होती ती.”

“इनफ अमोल. शपथ घेऊन खोटी साक्ष देतोयंस तू. युवर ऑनर, प्रियाने अमोलला कधीही काहीही सूचक असं सांगितलं नव्हतं. मेडिकल रूममध्ये ती झोपली होती ते दिपकने तिला ब्लॅकमेल केल्याचं टेन्शन आलं होतं म्हणून. अशा परिस्थितीत ती मदत शोधेल की प्रेमाची सूचक बोलणी करेल?”

“पुरावा आहे तुमच्याकडे दिपकने आरोपीला ब्लॅकमेल केलं या गोष्टीचा?” बॅ. खंदार्यांसनी पटकन विचारलं.

“तुमच्याकडे पुरावा आहे, अमोलची साक्ष खरी मानण्यासाठी?” समीरच्या प्रश्ना?वर बॅ. खंदारे गप्प बसले पण ही केस त्यांना हातची जाऊ द्यायची नव्हती.

“पण युवर ऑनर, आरोपीने दिपकचा खून केला याला तिची अमोल प्रभाकरशी मैत्री हेच कारण होतं.” खंदारे कळवळून सांगत होते.

“मीही एक्झॅटली हेच प्रूव्ह करतोय मि. खंदारे, की आरोपी आणि अमोल प्रभाकरमध्ये मैत्री होती. शुद्ध मैत्री! पण दिपकने या मैत्रीचा गैरअर्थ काढून आरोपीवर सूड उगवण्याचा प्रयत्न केला.”

“अमोल....” समीर पुन्हा अमोलकडे वळला. अमोल चेहे-यावरचा घाम पुसत होता.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या

No comments:

Post a Comment