Friday, August 14, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान ३१ (समाप्त)

प्रतिक्रिया: 
दिपक तोल सावरत तिच्यापर्यंत पोहोचला पण त्याला काही बोलता सुद्धा आलं नाही. प्रियाच्या पुढ्यातच कोसळला तो. प्रिया घाबरून किंचाळली आणि पुन्हा बाहेरच्या दिशेला पळाली.

त्यानंतर दहा मिनिटांनी मी तिथून बाहेर पडलो. माझा लॉज त्या ठिकाणापासून जेमतेम पंधरा मिनिटांच्या अंतरावर होता. मी माझ्या लॉजवर गेलो. कपडेही बदलण्याच्या भानगडीत न पडता मी माझी एअरबॅग उचलली आणि लॉजमधून बाहेर पडलो. पहाटेच्या वेळ आणि भरपूर पाऊस असल्याने लॉजचा वॉचमनही झोपलेलाच होता. मी बाहेर आलॊ आणि रिक्षा करून सरळ स्टेशन गाठलं. तिथून मी नाशिकला निघून गेलो. मी दोन मोठ्या चुका केल्या म्हणून तुमच्या हातात सापडलो. पहिली म्हणजे कारच्या डिकीच्या हॅन्डलवरचे माझे ठसे मी पुसायला हवे होते आणि दुसरी चूक मला जास्त महागात पडली ती म्हणजे बॅ. समीरचा असिस्टंट नाशिकला आलेला असताना त्याच्या गोड बोलण्याला बळी पडून मी प्रियाच्या वतीने साक्षिदार म्हणून उभं रहायला तयार झालो. वास्तविक प्रियावर आधी झालेल्या केसमधे माझाच पुढाकार असताना समीरने मला तिच्या बाजूने साक्षिदार म्हणून बोलवायची हिम्मत कशी केली तेच कळत नाही. कदाचित मला समोर आणण्यासाठीच त्याने तयार केलेला सापळा होता तो आणि मी त्यात अलगद अडकलो."

इन्स्पेक्टर राजेंनी रायटरला खूण केली. रायटरने जबाब लिहून घेतलेलं रजिस्टर महेशच्या पुढ्यात धरलं. महेशने जबाब वाचूनही न पहाता त्यावर सही केली.

*****

दिपक बागवे आणि मनोज ठाकूर अशा दुहेरी खूनप्रकरणी महेशला जन्मठेप झाली. प्रियाचे आईवडील समीरचे वारंवार आभार मानत होते. मनोजच्या आईनेही समीरचे आभार मानले व प्रियाची माफी मागितली.

महेशच्या केसचा निकाल लागल्यावर एके दिवशी प्रिया समीरला त्याच्या घरी येऊन भेटली.

“समीर, माझ्यासाठी तुम्ही जे केलंत त्याची परतफेड म्हणून तुम्हाला देण्यासाठी आज माझ्याकडे काही नाही. पण तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. मला जमेल तसं....” प्रियाच्या गळ्यात हुंदका दाटून आला. समीरने पुढे होऊन प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला.

“प्रिया, मी तुला आधीच सांगितलं होतं ना? सरकारने जरी मला तुझा वकील बनवलं असलं, तरी तू निर्दोष आहेस याची मला खात्री होती म्हणूनच मी इतक्या पुढे जाऊन चौकशी केली. माझ्या फीची चिंता करू नकोस तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि हुशार मुलीला निष्कलंक आयुष्य जगता येण्यात माझा हातभार लागला एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी.”

“समीर, आणखी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. म्हणजे, तुम्हाला जमत असेल तर....”

“बोल ना?”

“माझ्या गळ्यातलं लॉकेट अजूनही पोलिसांकडेच आहे. मला ते परत मिळवून द्याल? मनोजची ती एकमेव आठवण आहे माझ्याकडे.” प्रिया गालावर ओघळलेले अश्रू पुसत म्हणाली.

समीर प्रियाकडे एकटक पहात होता.

“कधी कधी असं वाटतं समीर की मनोजनेच त्या दिवशी वाचवलं मला. मला शेवटचं भेटला तेव्हा ’गॉड ब्लेस यू’ असं म्हणून त्याने माझ्या गळ्यात घातलेलं लॉकेट माझ्यासोबत नसतं, तर कदाचित त्या रात्री....”

समीरने काही न बोलता आपल्या हाताची मूठ तिच्यासमोर उघडली. त्याच्या हाताच्या तळव्यावर प्रियाच्या गळ्यातलं लॉकेट होतं.

“समीर!” प्रिया अत्यानंदाने उद्घारली.

“तु ह्या लॉकेटबद्दल विचारणार हे मला माहित होतं म्हणून मीच इन्स्पेक्टर राजेंना सांगून त्यांच्याकडून ते ते मिळवलं.”

“थॅंक यू समीर. थॅंक यू व्हेरी मच!”

“गॉड ब्लेस यू, प्रिया.” समीर मंदस्मित म्हणाला.

समाप्त
ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

54 comments:

 1. ek prashn aahe, pavsaat thase tasech rahtat ki pusle jatat...
  karan manoj vhya bhavache thase dikki war jorat pavus asun pan tasech rahtat, hi bab jara khatkat aahe...
  Baki Apratim katha hothi.....
  Pudhil kathesathi Shubeccha....

  ReplyDelete
 2. १. चिखलातील ठसे पुसले गेले आहेत असं कथेत लिहिलं आहे. तसेच महेशच्या हातांचे ठसे हे कारच्या डिकीत आणि डिकीच्या हॅन्डलवर मिळाले असं पान २४ येथे लिहिलं आहे. नंतर मात्र वाचताना सोयीसाठी म्हणून ’कारच्या डिकीच्या हॅन्डलवर’ असं न लिहिता ’कारच्या डिकीवर’ असं लिहिलं आहे.

  २. चिखलातील उमटलेल्या ठशांचा गडदपणा वा फिकटपणा हा पावसाच्या जोरावर, मातीच्या गुणधर्मावर आणि चिखलात मिसळलेल्या पालापाचोळा व गवत यावरही अवलंबून असतो. जर मी मुसळधार पाऊस दाखवला असेल आणि चिखलात गवत, पालापाचोळा यांचं मिश्रण दाखवलं असेल, शिवाय तिथे कुणाची झटापट सुरू आहे, असं दाखवलं असेल तर चिखलात पावलाचा ठसा मिळूनही तो कुणाचा आहे हे ओळखता न येण्याइतपत त्या ठशाचा आकार बदलू शकतो.

  ३. कारच्या डिकीचं हॅन्डल हे धातूचं असतं. पावसाच्या मा-यात ठसे फिकट होतील पण धातूवर उमटलेले बोटांचे ठसे हे प्रयत्नपूर्वक न पुसल्यास चटकन फिके होत नाहीत. शिवाय ती कार रानात उभी असताना, केवळ एकाच व्यक्तीने डिकीच्या हॅन्डलला हात लावलेला असताना ठसे पुसट होण्याची शक्यता कमी होते. मुख्य म्हणजे कारच्या डिकीचा पत्रा आणि डिकीच्या हॅन्डलचं कोटींग वेगवेळ्या धातूचं असतं. त्यामुळे डिकीच्या हॅन्डलवर ठसे जास्त काळ रहातात.

  शिवाय, लेखनस्वातंत्र्य नावाची काही चीज आहे की नाही?

  मात्र आपण इतक्या मनापासून कथा वाचून इतकी चिकित्सक प्रतिक्रिया दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.

  पुढच्या कथेत त्रुटी राहू न देण्याचा मनापासून प्रयत्न करेन. आगामी कथांसाठीही आपल्याकडून अशाच प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.

  ReplyDelete
 3. वा! मज्जा आली!!
  पुढचा विषय काय असेल....? कधी लिहिताय?

  ReplyDelete
 4. KATA AGDI MANAPASUN AAWADLI. MUKHYA MAHANJE KATHETIL SAMEERCHE CHARECTER KHUP AAWADLE.MAJHYA TULA KHUP KHUP SHUBHECHYA. AATA NAVIN KONTI KATHA LIHINAR AAHES TE LAVKAR KALAV

  ReplyDelete
 5. भुंगा, poison,
  आपल्या अभिप्रायांसाठी खूप खूप धन्यवाद! पुढची कथा येत्या दोन-तीन दिवसात जाहिर करतेय.

  ReplyDelete
 6. khup changli katha hoti. navin katha lavkar post kara.

  ReplyDelete
 7. कथेचा शेवट एकदम अनपेक्षित होता. आवडला.

  ReplyDelete
 8. vaa Great I Like It Very Much........

  ReplyDelete
 9. Rachana,अनामित, aman,
  अभिप्रायांसाठी धन्यवाद!

  ReplyDelete
 10. khup chan katha aahe.Pu le Shu
  Varada

  ReplyDelete
 11. Katha changli hoti. Tumhi call cenre chya life var lihal ka?

  ReplyDelete
 12. Apli suhana changli aahe. Call center life var lihinyacha avashya prayatna karen. Suchanesathi dhanyawaad!

  ReplyDelete
 13. mast zali ahe kathe ajun asha lihun ekhde pustak publish kara ,yawer changle natak nahi tere chitrepat pan hou shakto

  ReplyDelete
 14. Sachin Dani,
  आपल्या प्रतिकियेसाठी खूप खूप धन्यवाद! माझा उत्साह वाढवलात.

  ReplyDelete
 15. Ataparyant wachalechya kathanna jara hatke vishay lihilya baddal dhannyawad. aani ho...
  sameer che charitra khupach aavadle
  Thanks

  ReplyDelete
 16. Nilesh, आपल्याला ही कथा आवडली हे वाचून आनंद झाला. अशाच हटके कथा लिहिण्याचा प्रयत्न करेन. अभिप्रायाबद्दल अतिशय आभारी आहे.

  ReplyDelete
 17. apratim khup maja aali pratek paan vachnaychi utsukata vadhtach hotiiiiiiiii

  ReplyDelete
 18. अभिप्रायासाठी धन्यवाद! आपण उत्साह वाढवलात. सामाजिक कथा आवडत असल्यास येथे भेट देऊन आणखी एक कथा संपूर्ण वाचू शकता.

  ReplyDelete
 19. कांचन, मला हा कोर्टरूम ड्रामा आवडला.
  भाषा, लेखन सर्व छान आहे. या कथेत संवादावर जास्त भर आहे, पण प्रियाच्या मनातले द्वंद्व जर मांडले असते तर तुम्हाला अजून लेखन स्वातंत्र्य मिळालं असतं. कदाचित त्रयस्थ कथा निवेदन करत असल्यामुळे हा निर्बंध आला असावा.
  असे असले तरी कथा प्रवाही आहे आणि उत्सुकता कायम रहाते.
  प्लॅन्चेट वाचण्यासाठी उत्सुकता ताणली आहे आता.

  खूप खूप शुभेच्छा!!!

  ReplyDelete
 20. आनंद, अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद! तुझा अभिप्राय खूप आवडला. या कथेचा एका वेगळ्या पैलूने विचार करून तू माझ्याही विचारांना चालना दिलीस. असेच स्पष्ट अभिप्राय मला यापुढेही तुझ्याकडून मिळतील अशी अपेक्षा आहे.

  ReplyDelete
 21. आजच सर्व भाग वाचले कथा एकदम खिळऊन ठेवणारी आहे पुढील लेखनास शुभेच्छा

  ReplyDelete
 22. धन्यवाद अजिंक्य. प्लॅन्चेट कथादेखील वाचून पहा.

  ReplyDelete
 23. me Mrs. murphy, please kanchan pg : 26 lawakar post kara. vaat pahanycha kantala aala aahai.
  nahital fix ashi date tari sangun thev when you post next pages. mhanje thevach hi website open karnar. navin page disale nahi tar mood-off hooto

  ReplyDelete
 24. मर्फी, मी रोज एक पान पोस्ट करण्याचा प्रयत्न करते. कामाच्या व्यापात रविवारी पान पोस्ट करणं शक्य नसतं.

  ReplyDelete
 25. कांचनताई,
  अगदी सहज म्हणून वाचायला घेतली आणि ऑफीसमधले काम सोडून पुर्ण वाचून काढली.

  ReplyDelete
 26. अरे! विक्रांत, कथा वाचण्यासाठी धन्यवाद. पण सांभाळून. नाहीतर ऑफिसचे लोक मला नोटीस पाठवायचे :-D. इतर कथाही आहेत, तुला जसा वेळ मिळेल तशा वाच. काम आधी, मनोरंजन नंतर...

  ReplyDelete
 27. (अशीच अजून एक केस. ह्यामधे कोर्ट म्हणजे ब्लॉगरुम आहे.)
  आरोपी: सदर ब्लॉगची लेखिका
  फिर्यादी: सध्या तरी मी
  केस: स्वतःच्या लिखाणाने वाचकांना त्यांच्या हातातली कामं सोडून सदर ब्लॉग वाचवण्यात गुंगवणे, वेळेचे भान हरपवणे

  जज: तर केस आधिच सांगितली आहे. फिर्यादीने बाजू मांडावी.

  फिर्यादी वाचक: काय सांगणार मायबाप, हातची कामं मागे पडली. सकाळच्याला लवकर उठायचं होतं. पण ब्लॉग अतिशय छान लिहल्याने वाचत राहिलो. बाकीचे उद्योग राहीले ते राहीलेच.

  जज: काही पुरावे???

  फिर्यादी वाचक: ब्लॉगवर मिळालेले प्रतिसाद वाचावे सरकार...

  जज: ठीक आहे. आरोपी लेखिका हिच्यावरचे आरोप सिद्ध झालेत. त्यांना काही काळ दुसऱ्या (लिखाण सोडून) कामाची जबाबदारी देण्यात यावी.

  आरोपी लेखिका: पण... माझी बाजू???...

  जज: ऐकून घेतली जाणार नाही. कारण मीदेखिल हा ब्लॉग वाचताना गुंग झालेलो. त्यामुळे बायकोने हज्जारदा बाजावूनसुद्धा गॅस बंद करायचा विसरलो. करपलेल्या जेवणाबरोबर ओरडा खाल्ला हे वेगळं सांगायला नको.

  (बाकी सगळे (O_o)... ख्यॅख्यॅख्यॅ... जज तिनदा हातोडा ठोकून केस निकालात काढतो. नंतर जज आणि आरोपी एकमेकांना टाळी देत खादाडी करायला जातात. लेखिकेच्या वह्या, पेन, पेन्सिली, खोडरबर, शार्पनर जप्त होतात. कंम्प्युटर ऍक्सेस बंद होतो.)

  ReplyDelete
 28. :)) तू खूप गोड प्रतिक्रिया देतोस, सौरभ. लेखनाशिवाय माझे अन्य उद्योग आहेत, त्यामुळेही अजून दोन केस माझ्यावर चालू शकतात. तुझ्या प्रतिक्रियेतून भावना पोचल्या. ब्लॉग वाचत रहा. नुसती तारिफ नको. तुझ्या दृष्टीने काही सुधारणा आवश्यक असल्यास जरूर कळव. पण काम आधी कर बाबा. नाहीतर माझ्यावर वर दिलेली केस तुझ्या ऑफिसकडून प्रत्यक्षात चालवली जाऊ शकते.

  ReplyDelete
 29. अह्हम्म... मी कधिही अकारण तारिफ करवून घेत नाहे आणि करतही नाही... सुधारणा (अगदी व्याकरण, शब्द, कानाडोळा सॉssरी कानामात्रा, आकारउकार, वेलांटीकोलांटीसुद्धा) सुचवाव्याश्या वाटल्या तर आवर्जून सांगेन...

  अरे हो... तुम्ही तुमच्या ब्लॉगला ज्या पद्धतिने प्रोटेक्ट केले आहे (rightClick disabled, drag & selection disabled) ते प्रयत्न Mozilla FireFox Browserवर फसतात... जर ह्या Browserसाठी काही तोड मिळाला तर कळवा. माझे प्रयत्न चालूच आहेत...

  ReplyDelete
 30. अरे, ते सगळं प्रोटेक्शन मी कालच काढलं. मोझिलावरही ते व्यवस्थित चालत होतं. ज्या कारणासाठी ते सर्व केलं होतं, ते कारण निकालात निघालं आहे. तोड मिळाला तर पहाते.

  ReplyDelete
 31. nice story
  maja ali katha vachtana

  ReplyDelete
 32. धन्यवाद आशिष. इथे आणखीही कथा आहेत. त्याही वाचून तुझा अभिप्राय जरूर कळव.

  ReplyDelete
 33. वा कांचन खुपच सुंदर लिहिली आहेस कथा. अगदी ओघवती. आणि शेवटच्या भागापर्यंत गुंतागुंत छान राहिली आहे.
  मला एक छोटा प्रश्न पडला की महेश ठाकूर आणि दीपक यांच्यात काय ठरतं? म्हणजे महेश दीपकला कशाच्या बाबतीत मदत करणार असं convince करतो की जेणेकरून दीपक त्याला गाडीत लपायला अनुमती देतो. म्हणजे महेशचा (दीपकच्या दृष्टीने) नक्की रोल काय?

  प्रश्न जाउदेत. पण पुन्हा सांगतो कथा तू खुपच छान फुलवली आहेस.. मला मागे ३ भागांची कथा लिहिताना धाप लागली होती हे आठवल्यावर तर तुझ्या दीर्घकथेचं महत्व खूपच जाणवलं..

  ReplyDelete
 34. BTW, तुझी ही कथा मला इतकी आवडली की मी आधी का वाचली नाही असा मला प्रश्न पडला. नंतर मी लेखनाची तारीख बघितल्यावर लक्षात आलं की तेव्हा मी ब्लॉगविश्वात विहार करत नव्हतो :-)

  आता 'प्लॅन्चेट' वाचायला घेतोय.. !!

  ReplyDelete
 35. हेरंब, मी पान २९पान ३० वर याचं उत्तर दिलं आहे.

  महेश आपल्या सावत्र भावाचा काटा काढतो, त्यावेळेस दिपक अनपेक्षितपणे त्याला साक्षिदार रहातो. मनोजचा मृत्यू आत्महत्या म्हणून सिद्ध झाल्यावरही त्याच्या मृत्यूला प्रियालाच जबाबदार धरलं जातं (प्रेमभंग इ.इ.). त्यावेळेस दिपकचा काटा काढणं महेशला शक्य नव्हतं. दिपकच्या वाढत्या पैशाच्या मागण्या मनोजला दिपकचा काटा काढण्यास प्रवृत्त करतात पण त्या खुनासाठी बळी जाण्याची महेशची तयारी नसते. त्याचवेळेस प्रियाला या खुनात अडकवून आपली मान सोडवता येईल हा विचार त्याच्या मनात येतो कारण दिपकला प्रिया हवी असते पण प्रियाने दिपकला कधीही त्या दृष्टीने पाहिलेलं नसतं, याचा असंतोष दिपकच्या मनात खदखदत असतो. वेळ आली तर प्रियाला जबरदस्तीने आपलंसं करण्याची त्याची तयारी असते, या गोष्टीचा फायदा उचलून महेशने रचलेल्या दुहेरी खेळात दिपक मरतो, त्याच्या खुनाचा आळ प्रियावर येतो.

  प्लॅन्चेट तुला आवडेल, अशी अपेक्षा आहे.

  ReplyDelete
 36. छान कथा आहे, वाचायला सुरवात केली की थांबवतच नाही.......... त्या अमोलला उगाचच छोटा व्हिलन केल्या सारखे वाटले, पण बाकी सर्व बेस्ट...........
  Good Luck n Keep it up

  ReplyDelete
 37. धन्यवाद.कथेत ट्विस्ट येण्यासाठी काही पात्रं ग्रे शेड मधे रंगवावी लागतात.

  ReplyDelete
 38. ek number katha ahe, amezing ase watat hote ki apalya dilyasamorach ghadte ahe. sadharan kortatale prasang he thode boare asatat pan ithe techa utkanthavardhak zalet.

  ReplyDelete
 39. धन्यवाद संदिप. इतर कथा वाचूनही अभिप्राय अवश्य द्या.

  ReplyDelete
 40. KATHA KHUP CHAN AHE MALA KHUP AVADLI KATHETIL KAHI KSHAN AVISMARNIY AAHET KATHA VACHTANA PRTEK DRUSHYA DOLYASAMOR UBHE RAHILE MALA KHUP AWADLI PHUDCHI KATHA LAVKARAT LAVKAR PATHAWA GOD BLESS U

  ReplyDelete
 41. katha khup chan hoti mala khup awadli apratim god bless u

  ReplyDelete
 42. katha khup chan aahe apratim mala khup awadli.kathetil pratek kshan dolyansamor ubha hota kharach farach chan god bless u

  ReplyDelete
 43. katha khup chan aahe apratim mala khup awadli.kathetil pratek kshan dolyansamor ubha hota kharach farach chan god bless u

  ReplyDelete
 44. katha khup chan aahe apratim mala khup awadli.kathetil pratek kshan dolyansamor ubha hota kharach farach chan god bless u

  ReplyDelete
 45. धन्यवाद शुभांगी. काही कारणामुळे पोस्ट टाकायला जमत नाहीये. पण लवकरच नवीन कथा घेऊन येत आहे. धन्यवाद.

  ReplyDelete
 46. खूप छान कथा आहे. मला फार आवडली. आणखी एखादी भुताची जब्बारदस्त कथा किहीता येईल का? प्लॅंचिट तर भूप छान आहे. भर दिवसा वाचतानाही भीती वाटत होती.

  Nivedita.

  ReplyDelete
 47. धन्यवाद निवेदिता. एखादी ’भूतकथा’ लिहिता येईल. भयकथा किंवा गूढकथेमधे भूताशिवाय मज्जा आणता येईल का यावर सध्या विचार चालू आहे.

  ReplyDelete
 48. kanchantai, katha farach aavadli.agdi khilvun thevnari hoti.

  ReplyDelete
 49. कांचनताई, खूप खूप मस्त गोष्ट आहे.....

  ReplyDelete
 50. farch chan, utkurshta kataha hoti.
  ya kathewar 1 cinema nighava ashi iccha ahe, jarur naki gajel to

  jar nighala tar khandarenchya bhumiket matra kuldip pawar have.

  ReplyDelete
 51. मयूर आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार. कल्पनाशक्ती चांगली आहे. तुम्हीही अशीच एखादी कथा लिहून टाका.

  ReplyDelete