Saturday, July 25, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान ७

प्रतिक्रिया: 
अतिशय हिशोबी वृत्तीने तिने अमोल प्रभाकर या तरूणाची निवड केली. अमोलभोवती प्रेमाचं जाळं विणत असताना तिने मनोज ठाकूर व दिपकसोबतच्या प्रेमप्रकरणांची माहिती गुप्तच ठेवली होती.

प्रिया आपल्या मागे आहे हे अमोलला माहित होतं पण त्याने प्रियाला प्रतिसाद दिला नाही. अमोलने नकार दिला असला तरी प्रियाने अमोलला प्रपोज केलं आहे, हे दिपकच्या कानापर्यंत आलं होतं. तो प्रियाला याचं उत्तर विचारण्याच वाटच पहात होता, म्हणून प्रिया आता दिपकला टाळू लागली. त्याचा फोनही अटेंड करेनाशी झाली. प्रियाच्या या वागण्यामुळे दिपक चिडला आणि प्रियाला जाब विचारण्याची संधी शोधू लागला. त्याच्या नशिबाने त्याला ही संधी मिळाली. प्रियाच्या घराच्या रूटवरच दिपकची गाडी लावलेली असायची त्यामुळे प्रियाला नाईलाजाने का होईना, दिपकच्याच गाडीतून ड्रॉप घ्यावा लागत असे. पण रोज ती एकटी सापडत नसे. मात्र, २५ ऑगस्टला प्रियाला शेवटचा ड्रॉप घेणं भाग पडलं आणि दिपकला हवी तशी संधी मिळाली.”

इतकं बोलून बॅ. खंदारे एक क्षण थांबले. बोलून बोलून त्यांना दम लागला होता. पण तरीही आपलं भाषण ऐकण्यासाठी निर्माण झालेली शांतता त्यांना सुखावून गेली. पाणी पिऊन ते पुन्हा बोलून लागले.

“युवर ऑनर, पुढे काही सांगण्याअगोदर मला हे नमूद करणं अतिशय महत्त्वाचं वाटतं की कॉलइंडिया हे कॉल सेंटर, नाईट शिफ्टला काम करून घरी जाणार्यात कोणत्याही स्त्रीला संरक्षण म्हणून सिक्युरिटी गार्ड सोबत देत नाही. त्याचं कारण त्या कॉल सेंटरच्या मॅनेजमेंटलाच ठाऊक आणि या केसमधे ते महत्त्वाचंही नाही. महत्त्वाचं हे आहे की काम करून रात्री घरी जाताना कोणतीही सिक्युरिटी नसल्यामुळे या कॉल सेंटरमधे काम करणारा स्त्री कर्मचारी वर्ग आपापसात ठरवून शेवटचा ड्रॉ्प घेतो. क्वचित प्रसंगी गाडीतील पुरूष कर्मचारी शेवटचा ड्रॉप घेऊन स्त्री कर्मचार्यांवसाठी अड्ज.स्टमेंट करतात.

बर्यागचशा कॉल सेंटर मधून नाईट शिफ्ट करणार्याऊ स्त्रिया स्वसंरक्षणासाठी काही ना काही छोटसं शस्त्र, मग अगदी तिखडाची पूडच का असेना पण स्वत:जवळ बाळगतात. याला कॉल इंडियाही अपवाद नाही. अशी माहीती कोणतंच कॉल सेंटर उघड करत नसलं तरी ते सत्य आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. प्रियानेही अशी खबरदारी बाळगली होती. तिच्या जवळ एक रामपुरी चाकू होता. तिने तो कुठून मिळवला ही गोष्ट अजूनही अंधारात आहे पण प्रिया तो चाकू आपल्या पर्समध्ये बाळगून असायची. विशेष म्हणजे ऐन वेळेची सुरक्षितता म्हणून प्रियाने तिच्या गळ्यातल्या लॉकेटमध्येही एक छोटंसं पातं लपवून ठेवलं होतं.

ज्या दिवशी प्रियाचा शेवटचा ड्रॉप होता, त्यादिवशी दिपकने तिला जाब विचारायचं ठरवलं. नाईट शिफ्ट असल्यामुळे रात्री अडीचच्या सुमाराला घरी जाताना झोप अनावर होणं साहजिकच आहे. प्रियाही अशीच गाडीत झोपलेली आहे असं पाहून दिपकने आधीच पाहून ठेवलेल्या ठिकाणी गाडी वळवली आणि प्रियाला झोपेतून जागं केलं.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment