Friday, July 24, 2009

गॉड ब्लेस यू... - पान ३

प्रतिक्रिया: 
....पुढचा प्रसंग त्याला अनपेक्षित होता. प्रियाने ऐनवेळी प्रसंगावधान राखून, त्याच्या नाकावर आपलं डोकं कस्सून आपटलं.

"ऑ....!" हातातला चाकू टाकून नाक दाबत दिपक मागे सरकला. त्याच्या नाकातून रक्त ओघळू लागलं होतं. त्या संधीचा फायदा घेऊन, प्रियाने त्याचा बाजूला पडलेला चाकू लांब फेकून दिला आणि पुढे होऊन दिपकला चिखलात ढकललं. तिने पळण्यासाठी पुढे उडी मारली पण तिने पाऊल उचलताच, दिपकने पडल्यापडल्या तिचा पाय हाताने खेचून तिला पालथं पाडलं.

"साली….! मला मारते? आता बघ तुझी कशी अवस्था करतो ते…." असं म्हणून दिपकने दात ओठ खात, एका हाताने तिचा पाय घट्ट धरून दुसरा हात तिच्या पोटरीकडे सरकवला.

प्रियाने आपला पाय सोडवण्याचा निकराने प्रयत्न चालवला होता पण त्याच्या हाताची पकड जबरदस्त होती. ती पुढच्या चिखलात हात रुतवून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचा हात हळूहळू तिच्या पोटरीवरून वरवर सरकत होता. त्या ओंगळवाण्या स्पर्शाची प्रियाला किळस आली. जागच्या जागी स्वतःच्या शरिराला एक झटका देत प्रिया कुशीवर वळली आणि आपल्या दुस-या पायाची एक लाथ तिने त्वेषाने त्याच्या तोंडावर मारली. तिच्या सॅंडलच्या हिलच्या फटक्याने दिपकचा गाल चांगलाच फाडून काढला. पण त्याने तिचा पाय सोडला नव्हता. उलट या प्रतिकाराने तो आणखीनच चवताळला.

एक झेप घेऊन तो प्रियाच्या कमरेपर्यंत पोहोचला आणि तिच्या स्कर्टची बटणं चाचपडू लागला. त्याचे दोन्ही हात आपल्या शरिरापासून दूर ठेवण्याचा प्रिया आटोकाट प्रयत्न करत होती पण शरिरावरचं त्याचं वजन बाजूला करणं तिला शक्य होत नव्हतं. शेवटी आपल्या नखांनी प्रियाने त्याचा गाल ओरबाडला. आपला दुसरा गालही रक्ताळलेला पाहून दिपकने तिच्या फाड्कन एक मुस्कटात मारली. आता मात्र प्रियाही खवळली. तिच्या मनातल्या भीतीवर आता रागाने मात केली होती. ‘काय वाट्टेल ते झालं तरी चालेल पण आपल्या अब्रूशी याला खेळू द्यायचं नाही,’ हे तिने मनाशी पक्कं ठरवलं. दिपकशी तिची झटापट चालूच होती. तेवढ्यात तिला कसलीतरी आठवण झाली आणि तिचा हात तिच्या गळ्याकडे गेला.

इतका वेळ तिच्या लक्षातच आलं नव्हतं हे!

उजव्या हाताने चाचपडत तिने आपल्या गळ्यातल्या लॉकेटमधून एक छोटसं पातं सर्र्कन बाहेर काढलं आणि मागचा पुढचा काही विचार न करता, तिच्या शरिरावर व्यापलेल्या दिपकच्या मानेत खुपसलं.

'गॉड ब्लेस यू...' ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment