Thursday, July 23, 2009

गॉड ब्लेस यू... - पान २

प्रतिक्रिया: 
"दिपक प्लीज.... हे बघ, म.... मला काही झालं ना, तर तुझी नोकरी जाऊ शकते. तुला जेल पण होईल." प्रिया आणखी एक पाऊल मागे सरकली. तिचा स्वर रडवेला झाला होता.

"होऊ दे ना, पर्वा कुणाला आहे? आणि तुला काय वाटतं, मी ह्याचा विचार केला नसेल?" दिपक निर्लज्जपणे हसत हळूहळू एक-एक पाऊल पुढे टाकत होता.

“दिपक अरे काय करतोयंस तू? लहानपणापासून एकत्र खेळलो, वाढलो आपण. आज तुझ्यात हा सैतान कुठून जागा झाला?”

“फार बडबड करू नकोस प्रिया. लहानपणीच्या आठवणी काढून तू मला गुंडाळायला बघू नकोस. आज माझी इच्छी पूर्ण करण्यापासून मला कोणीच थांबवू शकत नाही.”

प्रिया मागे मागे सरकत होती पण दिपकही एक एक पाऊल ठामपणे पुढे टाकत होता.

"प्रिया, ऐक माझं. ही जागा मी फार पूर्वीच पाहून ठेवलेली आहे. तुझी बडबड ऐकायला इथे कुणीही येणार नाही. ब-या बोलाने माझ्या स्वाधीन हो, नाहीतर जे होईल…."

"नाही S, कधीच नाही." असं जोरात ओरडून प्रियाने दिपककडे पाठ वळवून पळायला सुरूवात केली. पळता पळता ती “हेल्प, हेल्प” असं ओरडत होती.

पावसाच्या पाण्याने सगळीकडे चिखल झाला होता. पळताना प्रियाचा पाय चिखलात अडकत होता. त्यात मनावर भीतीचा अंमल असल्याने तिला धड पळताही येत नव्हतं. तिचा पाठलाग करत, दिपक काही क्षणातच तिच्याजवळ येऊन पोहोचला. पळणा-या प्रियाला त्याने मागून धक्का देऊन पाडलं. एका हाताने तिचे केस ओढून त्याने तिला आपल्या दिशेने वळवलं आणि आपल्या जवळचा चाकू तिच्या गळ्याला लावला. प्रियाच्या डोळ्यात भितीने पाणी जमा झालं होतं. केसांना लागणारी कळ तिने ओठ दाबून सहन केली. त्याच्या हातातून केस सोडवता सोडवता ती त्याला विनवणी करत होती.

"दिपक, प्लीज मला सोड. मी हात जोडते तुला.”

"तुला असं सोडण्यासाठी इथे आणलं नव्हतं मी.... तुला म्हटलं होतं ना, ब-या बोलाने माझ्या स्वाधीन हो.... आता परिणामाला तयार राहा." असं म्हणत दिपकने तिच्या शर्टची कॉलर धरून जोरात झटका दिला. टर्रकन तिच्या शर्टाचा डावा भाग फाटला. अनावृत्त झालेल्या तिच्या शरिराकडे तो अधाशासारखा पाहात होता. आपल्या दोन्ही हातांचा भार तिच्या हातांवर टाकून तो पुढे झुकला….

ओअॅसिस ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्याf.

2 comments:

  1. rahasya kathechi suruvat chhan aahe katha lavkar lavkar patav mazya tula subhecha aahet.

    ReplyDelete