Wednesday, April 29, 2009

ओअॅसिस - पान ४२ समाप्त

प्रतिक्रिया: 
पान ४२
मोहिनी परदेशी गेल्याला आता एक आठवडा होऊन गेला होता. एका रात्री साधारण दहा-साडेदाच्या सुमारास देवदत्त, शेखर आणि दिनकरराव बंगल्य़ाच्या लॉनवर गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात मोहिनीचा फ़ोन आला. ती पलिकडून उत्साहाने किलकिलत होती. देवदत्तही तिचं बोलणं मनापासून ऐकत होते. दिनकरराव आणि शेखर, देवदत्तांच्या चेहेर्यािवरील हावभाव टिपत होते. काही वेळ मोहिनीसोबत बोलून देवदत्तांनी फ़ोन ठेवल्यावर दिनकररावांनी देवदत्तांना विचारलं, "काय रे, देव? ती मोहिनी कशी आहे?"

"अं...ठिक आहे. तिचाच फ़ोन होता. सध्या न्यूयॉर्कला गेली आहे. तिचे शोज असतात ना?" देवदत्त.

"असं, असं. बरं. देव, मी काय म्हणत होतो...बघ, म्हणजे तू ऐकून घे...उगाच गैरसमज करून घेऊ नकोस." दिनकरराव म्हणाले.

"काका, असं काय बोलताय? स्पष्ट विचारा ना!"

"मला माहितीयं, त्यांना काय बोलायचंय." शेखरने वडिलांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला, "बाबांना हे सांगायचंय की मोहिनी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे. तुलाही तिचा स्वभाव आवडतो. हे बघ, देव. वेळ कुणासाठी थांबून राहात नाही. शारदाची उणीव आपल्या सगळ्यांनाच भासत राहणार पण तू असं किती दिवस आयुष्य काढणार? तुलाही आयुष्याच्या वाटचालीसाठी कोणी जोडीदार नको का?"

"तुला काय म्हणायचंय, शेखर?" देवदत्त.

"हेच की मोहिनी ही चांगली मुलगी आहे, तुलाही आवडते तर..." शेखर.

देवदत्त काही वेळ शांत बसले आणि बोलू लागले, "शेखर, तू बोलतोयंस ते बरोबर आहे. शारदानंतर माझ्या आयुष्यात आलेली आणि मला आवडलेली स्त्री म्हणजे मोहिनी. मी कबूल करतो की मला ती आवडते पण मला याही गोष्टीची जाणीव आहे की आधी ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ज्यावेळेस मला एका मित्राच्या आधाराची गरज होती, त्यावेळेस माझ्यासोबत तीच होती. शेखर, आज आपण एकत्र असल्याचं क्रेडिट मोहिनीलाही जातं. पण मोहिनीबद्दल मला अशा काही गोष्टी माहित आहेत की मी आत्ता जर माझ्या मनात काय चाललंय हे तिला सांगितलं, तर तिचा माझ्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. शारदा गेल्यानंतर अवघ्या वर्षभराच्या कालावधीत मला एखादी स्त्री आवडू लागेल असं मलाही वाटलं नव्हतं. म्हणूनच मला भिती वाटते, की मी जर माझ्या प्रेमाची कबूली तिला दिली तर ती माझ्यापासून खूप दूर निघून जाईल....खूप स्वाभिमानी आहे ती."

"काका, शारदा गेल्यानंतर वाळवंटासारख्या माझ्या आयुष्याच्या प्रवासात सापडलेलं ओअॅसिस आहे, मोहिनी म्हणजे!.... ते मला असं गमवायचं नाही. शारदाला समजून घेण्यात मी ज्या चुका केल्या, त्या मला मोहिनीच्या बाबतीत करायच्या नाहीत. मला मोहिनीबद्द्ल काय वाटतं, हे मी वेळ आल्यावर मोहिनीला सांगेनही किंवा कदाचित तिला ते कधीही कळणार नाही पण एक मित्र म्हणून तिला माझ्याबद्दल जो आदर आहे, विश्वागस आहे तो मला गमवायचा नाही."

शेखर, आई-वडील, बहीण-भाऊ हे आपल्याला ’मिळतात’ पण मित्र आपण ’बनवतो’.खरं ना?"

"यू आर राईट." शेखर हसून म्हणाला.

....तिकडे मोहिनी रंजनादेवींना सांगत होती, "ऐसी बात नही है, ताई. मी कदाचित देवसमोर माझ्या प्रेमाची कबूली देईनही पण त्याने गैरसमज करून घेतला तर? तो जर मला सोडून गेला तर? त्याच्या मनात माझ्याबद्दल खूप आदर आणि विश्वानस आहे....मला तो गमवायचा नाहीये."

समाप्त
कॄपया या कथेबाबतचा आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्याl.

37 comments:

 1. very good this is the most funtastic novels for the people whose life is like oasis.
  Thanks for the novels for the posted for us.

  Thanks & Regards,

  Archana

  ReplyDelete
 2. khup chan goshta ahe. Evadhi mothi goshta itakya patkan purna kelya baddal tumacha Abhinandan!!!

  ReplyDelete
 3. गेला महिनाभर ही कथा वाचतो आहे. फारसे चढउतार नसूनही कथा छान वाटली. तुम्ही ही कथा पुस्तकरूपात जरूर प्रकाशित करा. कथेचा शेवट आवडला.

  ReplyDelete
 4. hi story changli hoti. dusari story kevha suru hoil?

  ReplyDelete
 5. Mala tar khup avadali hi oasis.

  pls write it up like this novel.

  I like your novel Adati.

  Regards,
  Nandu Satpute.

  ReplyDelete
 6. Nandkumar, abhiprayasathi abhaar.

  ReplyDelete
 7. Khupach chhan aahe hi katha....
  Agadi eka damat vachun kadhali...
  Hi katha pustak rupane jaroor prakashit kara..
  Pudhil lekhanas shubhechchha..
  Pudhachya lekhanachi wat pahat aahe
  --Rahul

  ReplyDelete
 8. राहूल, आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार. सध्या क्रमश: पकाशित होत असलेली गॉड ब्लेस यू ही रहस्यकथा देखील अवश्य वाचा.

  ReplyDelete
 9. ही कथा आणि गॊड ब्लेस यू दोन्ही खुपच छान आहेत. दोन्ही एका दमात वाचल्या. येथे असेच आणखीही वाचायला मिळेल अशी आशा आहे.

  धन्यवाद
  -अविनाश.

  ReplyDelete
 10. अविनाश, आपली अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  ReplyDelete
 11. Very nice story.......

  Regards,
  Abhijeet

  ReplyDelete
 12. Abhijeet, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! मोगरा फुललावरील, ’गॉड ब्लेस यू’ ही कथादेखील अवश्य वाचून पहा.

  ReplyDelete
 13. Sunita, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  ReplyDelete
 14. आज बसुन एका दमात पुर्ण कथा वाचुन काढली... भाषा प्रभावी आहे, कथेमध्ये जास्त खाचखळगे नसताना सुद्धा चांगली फ़ुलवली आहे.
  आता ’गॉड ब्लेस यू’ वाचेन...

  ReplyDelete
 15. धन्यवाद आनंद. तुझी प्रतिक्रियेमुळे माझा आत्मविश्वास वाढला. ’गॉड ब्लेस यू’ वाचून झाल्यावरही कथेबद्दल अभिप्राय जरूर दे.

  ReplyDelete
 16. in dally rutine work we didn't get time to bay the
  books and read it. this way is very easy to keep
  keep reading hobby . . . I LVE IT.

  ReplyDelete
 17. आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहे, अवधूत. या ब्लॉगवर नेहमी चांगल्या व नवीन कथा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन.

  ReplyDelete
 18. निषेध! निषेध! निषेध!!! देवदत्त आणि मोहिनी ह्यांचा बॅन्ड वाजल्याचा, लग्नाचा बॅन्ड वाजल्याचा लिखित स्वरुपातील पुरावा लेखिकेने नं दिल्याचा निषेध!!! कथा चांगली, शेवट चांगला आहे... (सूचक आहे पण अपुर्णसा आहे, त्यामुळे पार्ट २ काढायचा वाव आहे.) मोहिनी आणि रंजनादेवींचा संवाद वाचून "दिल तो पागल है" मधला सिन आठवला...

  ReplyDelete
 19. सौरभ, कथेचा असा शेवट हा व्यक्तीसापेक्ष असतो. जसा वाचणा-याचा स्वभाव, तसा त्याने त्यातून अर्थ काढावा. पार्ट २ काढण्याची कल्पना चांगली आहे, मी त्या दृष्टीने विचार केला नव्हता. आता करून पाहिन. मुळात ओअॅसिस ची कथा निराळी होती पण ब्लॉगवरची पहिली कथा वाचकांना कितपत पसंत पडेल, याचा अंदाज नसल्याने मी मूळ कथेत प्रचंड बदल केले आहेत. असो. सर्वांच्या पाठबळाने धीर आलेला आहे, तेव्हा मूळ ओअॅसिसही मी येत्या काही महिन्यांत प्रकाशित करेन.

  ReplyDelete
 20. farch chan
  kallech nahi ki kadhi samapt ha shabd ala
  chan lihile ahe congrats!!!!!
  keep it up

  ReplyDelete
 21. धन्यवाद आशिष, इथे इतरही कथा आहेत, त्याही वाचून पहा.

  ReplyDelete
 22. छान आहे. खुप अवडली

  ReplyDelete
 23. धन्यवाद निखिल, इतर कथाही जरूर वाचून पहा.

  ReplyDelete
 24. khup chan lihal aahe...!! agadi pratyek prasang dolyasamor ubha rahato...!!
  kas kay jamat ho tumhala..(mi bakicya pan katha vachun takalya aahet...;))
  keep it up..!!!

  ReplyDelete
 25. Anonymous,
  कथा लिहिण्याची आवड आहे, शिवाय व्यक्तींचे स्वभाव अभ्यासायला आवडतात, त्यामुळे आपोआपच कथेसाठी कल्पना मिळत रहातात. ब्लॉगवर ललित लेखन व चित्रपट परिक्षणही उपलब्ध आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया वाचायला आवडेल. प्रतिक्रियेत शेवटी आपल्या नावाचा उल्लेख केल्यास मी कुणाची प्रतिक्रिया वाचत आहे, याचा उलगडा होईल.

  ReplyDelete
 26. Hi Kanchan, Katha changalich aahe. Samajik Katha chy Aiwaji kautumbik katha hya sadaramadhyhi chalali aasti. Mitri kevha , kuthe aandi kasha paristhit howu skakel he aapan kevhahi sangu shakat nahi. Stree purush maitriche taral warnan sundarch kele aahe. Mi baryach varshnantar yevhadhi mothi katha wachali aahe. Ajoon ashach sunadr avishkarnchi apekaha...

  ReplyDelete
 27. khupach chan story
  ani tyapeksha sundar shevat...

  ReplyDelete
 28. khup chan story
  ani sundar shevat...

  ReplyDelete
 29. धन्यवाद सागर.

  ReplyDelete
 30. khoooooooooooooooop chan goshta ahe.

  ReplyDelete
 31. गौरव, धन्यवाद.

  ReplyDelete
 32. आत्ता पर्यंतच्या 25 वर्षच्या आयुष्यात मैत्री विषयी इतकी चांगली कथा प्रथमच वाचली अगदी मनापासून धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभभेच्छा. असेच उत्तम साहित्य भविष्यात वाचल्या मिळावे,
  पुन्हा एकदा धन्यवाद
  धनंजय

  ReplyDelete
 33. धन्यवाद धनंजय. आणखी चांगले लेखन करण्याचा अवश्य प्रयत्न करेन.

  ReplyDelete
 34. khup khup sundar katha aahe ....... eka damat vachali , bakichya pan sarv vachlya..... mast ahet..... tumachya pudhil likhanala shubhechha !!!!!!!!! Madhura

  ReplyDelete
 35. अतिशय छान कथा आहे.खूप सुंदर रित्या तुम्ही ती मांडली,
  ब्लॉग वरीलबाकीच्या कथा सुद्धा खूप छान आहेत.

  ReplyDelete