Wednesday, April 22, 2009

ओअॅसिस - पान ३५

प्रतिक्रिया: 
पान ३५
दुपारच्या साडेबारा-एकच्या दरम्यान देवदत्तांनी शेखरला आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतलं.

"शेखर, मी काल काय सांगितलं, ते ल्क्षात आहे ना? ’हॉवर्ड आणि विल्स” तूच हँडल करशील. त्यांच्याबरोबरच्या माझ्या मिटींगमध्ये..."

"पण देव, तुला असं नाही का वाटत की हा प्रोजेक्ट खूपच मोठा आहे माझ्यासाठी?" शेखरने विचारले.

देवदत्तांच्या चेहेर्या वर मंदसिम्त तरळलं, "काल काका तसे रिअॅक्ट झाले, म्हणून बोलतोयंस का तू?"

"नाही...तसं नाही..मलाच असं वाटतंय की तु पुन्हा विचार कर. हे फ़ॉरीन कंपनीचं प्रोजेक्ट आहे ना?"

"मग? फ़ॉरीन क्लायंटस काय आपण याच्याआधी हँडल केले नाहीत?"

"केले असतील रे, पण त्या ’आपण’मध्ये ’मी’ नव्हतॊ. तुझा तर प्रश्नaच नाही. बिझनेसमध्ये आजपर्यंत तू कधीच फ़ेल झाला नाहीस, पण माझी ही पहिलीच वेळ आहे.."

"कोणतीही गोष्ट माणूस कधीतरी पहिल्यांदा करतोच ना, शेखर. मी काय जन्मापासून बिझनेस करत होतो? तुझंच उदाहरण घे ना ...सहा-सात महिन्यांपूर्वी तु ’यज्ञ’ला जॉईन झालास... आज तुला सर्व माहीती आहेच ना. तुझ्यात जर हे प्रोजेक्ट सांभाळण्याचे पोटेन्शिअल्स नसते, तर मी तुला विचारलंच नसतं."

"तरीही मला वाटतं की तु पुन्हा एकदा विचार करावास, देव."

त्याच्या मनातील शंका देवदत्तांनी बरोबर ओळखली होती. ते शेखरला म्हणाले, "शेखर, धंदा म्हटला म्हणजे नफ़ा-तोटा, माणसं तुटणं-जोडणं, हे सर्व आलंच. हे प्रोजेक्ट तुझ्या हातून सक्सेसफ़ुल होईल याची पुर्ण खात्री आहे मला. तुला जो काही सपोर्ट हवा असेल, त्यासाठी मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. अॅण्ड डोंट वरी, दुर्दैवाने जर हे प्रोजेक्ट नाही पुर्ण झालं तर त्याची खंत बाळगू नकोस. तुझ्यावर कोणीही कसलाच आरोप ठेवणार नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, तु ह्या बिझनेसचा फ़िफ़्टी परसेंट पार्टनर होणार आहेस तेव्हा तुझं मतही तितकंच महत्वाचं असेल, जितकं माझं किंवा काकांच. सो बी प्रिपेअर्ड फ़ॉर दॅट. "

शेखरला अजूनही विश्वांस वाटत नव्हता. देवदत्तांनी आपल्या ब्रिफ़केसमधून एक फ़ाईल काढून शेखरच्या हातात दिली आणि म्हटलं, "ह्याच्यात माझ्या मिटींगचे मिनट्स आहेत, अॅग्रीमेंट आहे, आणखीही काही डॉक्युमेंट्स आहेत, ते सर्व काळजीपूर्वक वाच. नाही समजलं तर काकांना मदतीला घे. त्यांनी काही म्हटलं तर राग मानू नकोस. आपण त्यांना दाखवून द्याायचं आहे की यू रिअली डिझर्व टू बी अ फ़िफ़्टी परसेंट पार्टनर ऑफ़ धिस कंपनी."

त्यांच्या हातातून फ़ाईल घेताना शेखरला भास झाला की त्यांचे डोळे पाणावलेत. तो काही बोलला नाही. देवदत्तांनी त्याच्याशी हात मिळवून त्याला ’गुडलक’ विश केलं आणि शेखर त्यांच्या केबीनबाहेर पडला.

कामात व्यत्यय येऊ नये म्हणून देवदत्त आणि दिनकरराव ऑफ़िसमध्ये कधीच जेवत नसत पण आज देवदत्तांनी दिनकररावांना खास जेवणासाठी म्हणून थांबायला सांगितलं.

"आजपासून आपण एकत्र जेवायचं काका," देवदत्त म्हणाले.

"अरे पण मध्येच काम आलं तर कोणीतरी मोकळं हवं ना?"

"त्यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. कधी आपण दोघं, कधी मी आणि शेखर, तर कधी तुम्ही आणि शेखर असं आपण...."

"ए बाबा, काय भलभलत्या कल्पना येतायेत तुझ्या डोक्यात? मी शेखरसोबत जेवायला बसू?"

"का नाही?"

"अरे पण..."

"काका, जबाबदारी पडली ना की शेखर ती बरोबर सांभाळतो, हे लक्षात आलंय माझ्या."

"खरं सांगू देव, माझ्याही ते लक्षात आलं होतं रे, पण म्ह्टलं तु काय बोलशील की आता मुलाची बाजू घेतात."


ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्याl.

No comments:

Post a Comment