Wednesday, April 1, 2009

सिनेमॅटीक लिबर्टी की नो कॉमन सेन्स ?

प्रतिक्रिया: 
काही चित्रपटांमध्ये 'कॉमन सेन्स' का खाल्ला जात असावा, याचा पत्ताच लागत नाही. सिनेमॅटीक लिबर्टी ठीक आहे पण गरज नाही तिथेही सिनेमा वाढवण्याची गरज आहे का?

'सत्ते पे सत्ता' हा चित्रपट मी निदान तीन-चार वेळा तरी पाहिला असेल. प्रत्येक वेळेला मला हा प्रश्न पडला की 'रवि' म्हणजे जो खरा अमिताभ असतो, तो आणि 'बाबू' म्हणजे जो 'डुप्लिकेट' असतो तो, त्यांच्या एकसारखं दिसण्यामध्ये त्या रवि चा काय दोष होता बरं. त्या अमजद खानने आधी त्याला पाज पाज दारू पाजली, 'दारू पिने से लिव्हर खराब होता है', हे चार-पाच वेळा ऐकून घेतलं नि मग त्याला मस्त झोपून दिलं.

दारू पिने से लिव्हर खराब होता है।


सकाळी हा रविभैया, गाणं गुणगुणत आपल्या घरी जात असताना, त्याच्या डोक्यावर मारुन त्याला बेशुद्ध केलं आणि त्याची चेन त्या डुप्लिकेटला म्हणजे बाबूला दिली. मग रविभैयाला मारुन कुटून, हातपाय बांधून बंद करून ठेवलं. हेच सर्व तो रवि दारू पिऊन आऊट झालेला असताना करता येत नव्हतं का? तसं केलं असतं तर, डुप्लिकेट अमिताभ कॉन्टॅक्ट लेन्स घालून ओरिजिनल बनताना दाखवता नसता आला का?

तीच कथा, तेरे मेरे सपने ह्या नवीन चित्रपटाची. ख्रिश्चैन चंद्रचूड सिंगला, दक्षिण भारतीय हिंदू, प्रिया गिलशी करायचं असतं असं दाखवलं आहे .

तेरे मेरे सपने


प्रियाचे वडील चंद्रचूडच्या ख्रिश्चoन असण्यावर आक्षेप घेतात पण नंतर मुलीच्या प्रेमाखातर नमतं घेतात आणि चंद्रचूडने हिंदू धर्म स्विकारल्यास लग्न करता येईल असे सांगतात. पण हे सांगण्याआधी एक धर्मनिष्ठ व्यक्ती आणि मुलीचा बाप यांच्यामधील त्यांच्या मनाची जी घालमेल दाखवली आहे, ती दाखवण्यासाठी मुलीच्या वडिलांना रॉकिंग चेअरवर बसवून बॅकग्राउंडला काय वाजवलं तर, 'शांताकारं भुजगशयनम्.......?" काय समजायचं प्रेक्षकांनी?

4 comments:

 1. ha ha! chaan analysis aahe he!
  Visit my blog paras-daar.blogspot.com

  ReplyDelete
 2. Thank you for you commnet, Veda. I will visit your blog soon.

  ReplyDelete
 3. तुम्ही सिनेमा पाहताना इतका विचार करता हे दिग्दर्शकाने विचारात घेतलेच नाही ;-)

  ReplyDelete
 4. ही पोस्ट लिहिण्याआधी मी सत्ते पे सत्ता हा सिनेमा बहुतेक चौथ्या वेळेस मित्रमैत्रीणींसोबत पाहिला. प्रत्येकाला तेच वाटत होतं जे मला वाटलं. अगदी त्याच्या दुस-याच दिवशी त्याच मित्र-मैत्रीणींसोबत ’तेरे मेरे सपने’ पहावा लागला. जे वाटलं ते पटकन लिहून टाकलं. काही वेळा सिनेमॅटीक लिबर्टी ही आवश्यकच असते पण काही ठिकाणी तिचा अनाठायी वापर केला जातो.

  ReplyDelete