Monday, December 1, 2008

जीवन गाणे

प्रतिक्रिया: 
असे जीवन गाणे गावे
भावनांचे सूर छेडावे
रंगेल तराणे सुखाचे
परि विराणीतही रंगून जावे

स्पर्श गुलाबी कोमलतेचा
त्याआधी जाणीव काट्याची
वेदेनेचे त्या राखूनच भान
स्वप्नांकित गंधी धुंद व्हावे

ना तुझे काही, ना माझे
तरीही रीत येथे हक्कची
परंपरा बनवून निराळी
समर्पणातले सुख शोधावे

वेळ ठरलेलीच असते
प्रत्येकाचा निरोप घेण्याची
चकित व्हावे मॄत्यूनेही
इतक्या सहज निघावे

1 comment: